पोस्ट्स

एप्रिल १, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा-शिक्षक

इमेज
*मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा - शिक्षक* मी ३० वर्षांपूर्वी ऑक्‍सफर्डमधून पदवी घेऊन परतलो, तेव्हा भूतानमध्ये शिक्षकाची नोकरी करण्यासाठी वर्तमानपत्रातली जाहिरात पाहून अर्ज केला होता. मला ती नोकरी मिळाली नाही. नंतर आयुष्याला वेगळं वळण मिळालं व ती महत्त्वाकांक्षा अपुरी राहिली. पुढं आयुष्यात अनेक प्रकारच्या संधी मिळाल्या व अनेक प्रकारच्या संधी हातातून निसटल्यासुद्धा; पण मला भूतानमधली ती शिक्षकाची नोकरी न मिळाल्याची हुरहूर एकसारखी वाटते. कधी कधी अजूनही शिक्षक व्हावंसं वाटतं मला. स्वीडन व डेन्मार्क या दोन देशांच्या सीमेवर; पण स्वीडनच्या हद्दीत लुंड विद्यापीठ आहे. गेल्या ५०० वर्षांपासून ते आजतागायत हे विद्यापीठ ज्ञानप्रसाराचं काम करतं. मात्र, ते काळानुसार बदलतं. सध्या तिथं २१ व्या शतकाशी सुसंगत अशा आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानावर भर आहे. विद्यापीठाच्या परिसरात अमेरिकेतल्या ‘सिलिकॉन व्हॅली’सारखाच ‘स्कॉने कौंटी’ हा विभाग नवीन तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकतेनं गजबजलेला आहे. या विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय विषयावर भाष्य व विश्‍लेषण करणारं एक नियतकालिक निघतं. त्याचा दर्जा ‘टाइम’, इकॉनॉमिस्ट’ अशा स