पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज!

इमेज
   भगवान गडावर दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज! --दत्ता ढाकणे-बावीकर        मागील काही दिवसांपासून भगवान गडावरील दसरा मेळाव्या विषयी ज्या उलट-सुलट बातम्या येत आहेत त्या ऐकुन सामान्य माणसांच्या मनाला वेदना होत आहेत.दसरा मेळावा होणार की नाही?पंकजा ताई गडावर येतिल की नाही? ताईंचे भाषण होईल कि नाही? दसरा मेळाव्याला विरोध कुणाचा? की या फक्त आफवा आहेत?अशे आनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मागिल ताळीस वर्षापासुन दसरा मेळावा आणि स्व.गोपिनाथ मुंढे साहेबांचे आतूट नाते होते.संत भगवान बाबांच्या आशिर्वादाने मुंढे साहेबांनी सामान्य,गोरगरिब,बहुजन समाज्याच्या कल्यानाचे स्वप्न पाहीले व सत्ता त्यांच्या पायाशि आणून ठेवली.सध्याची तरुण पिढी त्यांचे विचार ऐकत ऐकत मोठी झाली.मुंढे साहेबांनी आपल्या नेतृत्व व वक्तृत्व कौशल्याने लोकांना राजकिय व सामाजिक संस्कार दिला.ज्या प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा त्याच प्रमाणे भगवान गडावरिल दसरा मेळाव्याची परंपरा.बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात मराठी व हिंदूत्वाची आस्मिता

जुनी पेन्शन आंदोलन! एक लोक चळवळ!

इमेज
जुनी पेन्शन आंदोलन! एक लोक चळवळ. स.न.वि.वि.....   महाराष्ट्रातिल तमाम dcps धारक शिक्षक / राज्य कर्मचारी बंधू भगिनिंना आमचा सप्रेम नमस्कार तशेच स्वातंञ्य दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा! मिञहो! नागपूर येथिल हिवाळी आधिवेशनावर काढलेल्या  यशस्वी आक्रोश मोर्चा पुर्वी म.रा.जुनी पेन्शन हक्क संघटना म्हणजे ''पोरखेळ'' अशि हेटाळणी आनेक तथाकथित शिक्षक नेत्यांनी केली होती. परंतु नागपुरचा ऐतिहासिक/ प्रचंड आक्रोश मोर्चा पाहून आनेकांनी तोंडात बोटे घातली. त्यानंतर १५ मार्च रोजी तर आपल्या संघटनेने कहरच केला.स्वत:ला प्रस्थापित म्हणून घेणाऱ्या शिक्षक संघटनांना मागिल आनेक वर्षात जे जमले नाही ते आपन करुन दाखविले.आपल्या आजाद मैदानावरिल  भव्यदिव्य धरणे आंदोलनाने राज्यकर्त्यांना खडबडून जागे केले व विधानभवनात आपला आवाज पोहचला.(तरुण शिक्षक,कर्मच्याऱ्यांच्या संघटनेकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे आहे  हे त्यांना समजले.     मिञहो! आपली संघटना आजून बरिच नवखी आसली तरी संघटनेचे यश मोठे आहे. नागपुरचा आक्रोश मोर्चा अन आनेक आमदारांनी दिलेला पाठिंबा(तो तात्पूरता का अशेना) ही आपली खुप मोठी उपलब्धी होती,त्यानंतर आप

गुरु परमात्मा परेशु.....माझी गुरु वंदना!

इमेज
माझी गुरु वंदना....!! गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक आजपर्यंत कळत - नकळतपणे ज्ञान देणाऱ्या माझ्या सर्व गुरु जनांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे शब्द सुमनांनी वंदन !....! गुरु आधार गुरु उदार गुरु भांडार ज्ञानाचे गुरु माऊली गुरु सावली गुरु वाली जीवनाचे गुरु स्वाभिमान गुरु आभिमान गुरु वरदान देवाचे गुरु विश्वास गुरु श्वास गुरु प्रकाश दावितसे गुरु आचार गुरु विचार गुरु सार जिवनाचे गुरु वंदना गुरु प्रेरणा गुरु साधना शिष्याची गुरु कृपाळू गुरु दयाळू गुरु कनवाळू मातेसमान गुरु अक्षर गुरु नश्वर गुरु इश्वर मानवाचा गुरु माता गुरु पिता गुरु दाता सर्वस्वी गुरु स्मरावा गुरु पुजावा गुरुचे आचरण मनोभावे गुरु साकार गुरु निराकार गुरु व्यापक ञिभुवनी गुरु सगुण गुरु निर्गुण गुरु अवगुण घालितसे गुरु कष्टती गुरु तिष्टती गुरु सोबती आयुष्याचे श्री.दत्ता ढाकणे-बावीकर Poetddl.blogspot.com

The RAINY DAYS....

इमेज
Poem--The RAINY DAYS..... Cloudy cloudy sky And wind so much blow heavy heavy rain And river overflow    Water in the pits and mud in the way how i can reach my home is away    My tummy became hungry So I am in hurry I carry my raincoat Friends don't worry     Bring enough tiffin My mother always says Its happen every year In the rainy days. Poet-Datta Dhakane-Bavikar Poetddl.blogspot.com

HAPPY FATHERS DAY....मलाही एक बाबा हवेत....!

इमेज
मलाही एक बाबा हवेत......!                                                                                                                      मलाही एक बाबा हवेत चॉकलेट घेउन येनारे कामावरून आल्यावर घरचा अभ्यास घेनारे मलाहि एक बाबा हवेत शाळेत नेहून सोडनारे जरासा उशिर झाल्यावर टिचरला फोन करनारे मलाहि एक बाबा हवेत सुट्टीत घरी राहनारे जराशि आई रुसल्यावर पिक्चरला घेउन जानारे मलाही एक बाबा हवेत गुड बॉय बोलनारे पहिला नंबर आल्यावर पेढे घेउन येनारे मलाहि एक बाबा हवेत फिरायला घेउन जानारे झोपाळ्यावर बसल्यावर हळुवार झोका देनारे मलाहि एक बाबा हवेत माझ्या सोबत खेळनारे स्वत: हरुन मला जिंकु देनारे मलाहि एक बाबा हवेत चुकल्यावर रागावनारे थोडासा रुसवा अन गोड गोड पप्पी घेनारे. Poet-datta dhakane-bavikar

माणूसकी आजून जीवंत आहे...!जीवंत नाही तो माणूस!

इमेज
                                             माणूसकी आजून शिल्लक आहे... मयत शिक्षकाच्या कुटूंबाच्या मदतिसाठी हॉट्स अँप गृप च्या माध्यमातून शिक्षकांनी जमवले पावनेचार लाख रुपये.     समाजात माणूसकी शिल्लक राहिली नाही, इथे कोणी कोणाचा विचार करत नाही,धावपळिच्या युगात इतरांचा विचार करण्यास वेळ नाही! ही ओरड आपन नेहमीच करतो.परंतू पालघर जिल्ह्यातील शिक्षकांनी 'माणूसकी आजूनही जीवंत आहे' हे आपल्या कृतितून दाखवून दिले आहे.तब्बल पावने चार लाख रुपयाची रक्कम आठ दिवसात जमा करुन मयत शिक्षकाच्या कुटूंबाला मदतिचा हात दिला आहे. समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.    या विषयी सविस्तर माहिती अशी की,जि.प.शाळा पऱ्हाडपाडा केंद्र आंबेदे ता.पालघर येथिल शिक्षक संतोष दुंदा ढेंगळे हे ६ मे रोजी त्यांच्या १ वर्षाच्या मुलिच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुळ गावी पिंपरवाडी ता.जुन्नर जि.पुणे येथे मोटारसायकले जात असताना मोटारसायकलच्या आपघातात डोक्याला मार लागून निधन झाले होते.    सहा वर्षापुर्वी १२/५/२०१०रोजी ते शिक्षक म्हणून पालघर तालूक्यात आले होते.नुकतेच दोन वर्षापुर्वी त्यांचे लग्न झाले होते.त्यांच्या पश्

वंजारी समाज बांधवांनो दलितांच्या वाटेने जाऊ नका.

इमेज
   वंजारी समाज बांधवांनो दलितांच्या वाटेने जाऊ नका!   पंकजा ताई मुंढे यांच्यावर सध्या जे बिनबूडाचे आरोप होत आहेत आणि त्यांच्या विरोधात ज्या पेड न्यूज चालवल्या जात आहेत हे पाहून आम्हाला पुन्हा एकदा एक वैचारिक व राजकिय पुनरावृत्ती होते की काय अशे वाटते.  ज्यांना मुंढे साहेबांनी मोठं केल तेच लोक आता ताई साहेबांच्या विरोधात कटकारस्थान रचत आहेत,यांच्या कारस्थानाला बळी पडू नका. नाहीतर तुमची गत दलित बांधवांसारखी होईल.भारतरत्न डॉ.आंबेडकरांसारखे नेतृत्व लाभले असतानाही सध्या दलित नेत्यांची आवस्था ना घर का न घाट का अशी झाली आहे.दलित समाज गटातटात विभागला गेलाय.देशाचे नेतृत्व करण्याची ताकत असतानाही दलित नेत्यांना आता कवडीमोल किंमत राहिली नाही.कॉग्रेस ,राष्ट्रवादीने आणि भाजपाने फोडा आणि राज्य करा  या धोरणामुळे दलित समाज एकसंघ राहिला नाही.आनेक नेते आपली चूल मांडून बसले आहेत़ परंतू समाजाची ताकत विखुरली गेली यामुळे राजकिय फायदा इतरांनाच होत आहे.सत्तेसाठी आता दलितांना सत्ताधारी पक्षांचे उंबरठे झिजावे लागत आहेत.बाबासाहेबांची शिकवन त्यांनी बासनात गुंडाळून ठेवली आहे.देशात दलित समाज खुप मोठ्या संख्येने  आह

कविता न सुचलेली.....

इमेज
कविता--कविता न सुचलेली..... समोर पांढरा शुभ्र उन्हाळ्यातल्या ढगासारखा, रेषा नसलेला कागद नजर शुन्यात,मन माञ कवितेच्या शोधात इकडुन तिकड नुसत्या येरझारा मारत होत मागे हात बांधून स्थळ शोधत असलेल्या पोरीच्या बापा सारख मन कुठ कुठ गेल नाही म्हणून सांगु! मन गावाकडे गेल भुतकाळात डोकावल दिसल्या नुसत्या वाड्याच्या पडक्या भिंती ज्या भिंतीला धरुन आम्ही पावल टाकायला शिकलो गाव माञ होत तसच माणसं माञ बदलेली वाचनालयात कमी पानटपरी समोर पोरं माञ दिसली त्यांना काही सुचत नाही     कारण पाऊस पडत नाही इथे पावसाचा अन शब्दांचाही दुष्काळ आहे मन रिकाम्या हाताने पुन्हा वर्तमानात मन शेतात आल चिखल तुडीत पांदितला पाऊस पडुन गेलेला मानसं शेतावर निघालेली दावनितली गुर सुटलेली शाळेला दांडी मारुन पोर डोंगरावर चाल्लेली आठवलं इथेच सुचलेली पहिली कविता वाहनार्या संथ पाण्यात नदिच्या किनारी त्या चिंचेच्या झाडाखाली पन आज कविता सुचली नाही एकही शब्द सापडला नाही आज शब्दांचा संप आहे की गणपतीची सुट्टी आता मन भविष्य पाहत होत कल्पनेच्या जगात श