जुनी पेन्शन आंदोलन! एक लोक चळवळ!

जुनी पेन्शन आंदोलन! एक लोक चळवळ.

स.न.वि.वि.....
  महाराष्ट्रातिल तमाम dcps धारक शिक्षक / राज्य कर्मचारी बंधू भगिनिंना आमचा सप्रेम नमस्कार तशेच स्वातंञ्य दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा! मिञहो! नागपूर येथिल हिवाळी आधिवेशनावर काढलेल्या  यशस्वी आक्रोश मोर्चा पुर्वी म.रा.जुनी पेन्शन हक्क संघटना म्हणजे ''पोरखेळ'' अशि हेटाळणी आनेक तथाकथित शिक्षक नेत्यांनी केली होती. परंतु नागपुरचा ऐतिहासिक/ प्रचंड आक्रोश मोर्चा पाहून आनेकांनी तोंडात बोटे घातली. त्यानंतर १५ मार्च रोजी तर आपल्या संघटनेने कहरच केला.स्वत:ला प्रस्थापित म्हणून घेणाऱ्या शिक्षक संघटनांना मागिल आनेक वर्षात जे जमले नाही ते आपन करुन दाखविले.आपल्या आजाद मैदानावरिल  भव्यदिव्य धरणे आंदोलनाने राज्यकर्त्यांना खडबडून जागे केले व विधानभवनात आपला आवाज पोहचला.(तरुण शिक्षक,कर्मच्याऱ्यांच्या संघटनेकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे आहे  हे त्यांना समजले.
    मिञहो! आपली संघटना आजून बरिच नवखी आसली तरी संघटनेचे यश मोठे आहे. नागपुरचा आक्रोश मोर्चा अन आनेक आमदारांनी दिलेला पाठिंबा(तो तात्पूरता का अशेना) ही आपली खुप मोठी उपलब्धी होती,त्यानंतर आपन आजाद मैदान गाजविले.आणि इतर प्रस्थापित संघटनां व मतलबी नेते खडबडून जागे झाले  व दिखाव्यापुरता का होईना त्यानी जुनी पेन्शनचा मुद्दा उचलुन धरला.मृत्यू पावलेल्या कर्मच्याऱ्यांच्या कुटूंबियांना निवृत्ती वेतनाचा  लाभ देण्यासाठी शासनाने समिती स्ताथापन केली हे आजाद मैदानावरिल धरणे आंदोलनाचे खुप मोठे यश म्हणावे लागेल.२६ व २७ जुलै च्या विधान भवन ''घेराव''आंदोलनाने तर कहरच केला.आवघ्या दोन दिवसात पन्नास आमदार व दहा मंञांना भेटून निवेदन देणे हे अशक्य वाटणारे काम आपल्या संघटनेच्या शिलेदारांनी करुन दाखविले. शासनाने नियुक्त केलेल्या समितीत आपल्या संघटनेचा प्रतिनिधी असावा सासाठी आपन प्रयत्न करत आहोत,राज्यपाल महोदयांना भेटून लवकरच आपल्या प्रयत्नांना यश मिळेल अशि आशा करुया.
     मिञहो! तालुका स्तरावरिल मोर्चे, निवेदन,आंदोलनाच्या माध्यमातुन dcps विरोधी लढा तिव्र होत आहे.शिक्षक,ग्रामसेवक,तलाठी आरोग्य सेवक वलइतर विभागातिल कर्मचारी आता जागृत होत आहेत करणे , dcps धारक मयत शिक्षक बांधवांची माहिती संकलन तशेच त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी होत आसलेले प्रयत्न  आणि डीसीपीएस आंतर्गत झालेल्या कपातिचा हिशोब मागण्याचे धाडस फक्त आपल्या संघटनेच्या माध्यमातुनच शक्य झाले.तालुका व जिल्हा पातळीवरिल आंदोलनाचे आपले महत्वाचे व सर्वात मोठे यश म्हणजे राज्यातिल आनेक पंचायत समिती व काही जिल्हापरिषदांमध्ये डीसिपीएस विरोधी ठराव मंजूर करुन घेण्यात आपल्या संघटनेला यश मिळाले आहे.  जिल्हापरिषदेला डीसिपीएस विरोधी ठराव घेण्यास भाग पाडले हे आहे.आनेक जिल्ह्यात कपात बंद केली व  राज्यातिल आनेक जिल्ह्यातिल शिक्षक डीसिपीएस वर सामुहिक बहिष्काार टाकू शकले फक्त आपल्या संघटनेच्या पाठिंब्यामुळेच.डीसिपीएस वर बहिष्कार अन होत आसलेलीह कपात थांबविणे म्हणजे जुनी पेन्शन मिळविण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य होत आहे. 
       मिञहो! जुनी पेन्शनची क्रांती व्हावी यासाठी आपन आंदोलनाची मशाल हाती घेतली आहे, परंतू कोणतिही क्रांती लोक सहभागाशिवाय शक्य झाली नाही.क्रांती/बदल घडून आणण्यासाठी सामाजीक  चळवळ उभी करणे महत्तवाचे आहे.संघटनेला लोकसहभागाची साथ लाभली तर प्रश्न सुटतात,शासनाला जाग येते.आपल्या महाराष्ट्राला सामाजीक चळवळिचा इतिहास आहे.संत ग्यानेश्वर,तुकारामांच्या आध्यात्मीक चळवळी पासुन ते शिवरायांची स्वराज्याची चळवळ,टिळक- आगरकर -सावरकरांची देश स्वातंञ्याची चळवळ,फुले-शाहु-आंबेडकरांची शिक्षण व समतेची चळवळ ते पुढे अखंड महाराष्ट्राची रक्तरंजीत चळवळ आणि आपन सर्वांनी डोळ्यानी पाहीलेली मा. अण्णा हजारेंची माहिती आधिकारची चळवळ, या सर्व चळवळिंचा अभ्यास केला असता आपल्या लक्षात येती की बदल चुटकी सरसी घडत नसतात,लोकसहभाग आणि समाजाला प्रश्नाची व अन्यायाची जाणिव करुन देणे महत्वाचे असते.
        मिञहो!जुनी पेन्शन मिळविण्यासाठी राजकिय,शासकिय व सामाजीक पातळीवर प्रयत्न करणे आत्यंत महत्तवाचे आहे.आणि राजकिय व शासन सत्तेला जागे करणे म्हणावे तितके सोपे नसते.समाजाचा रेटा व दबाव वाढला की राजसत्तेला हादरे बसतात हे आपन जाणतोच.आपले संघटन शक्ती वाढविण्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळणे गरजेचे आहे.जुनी पेन्शनचे आंदोलन फक्त कर्मचारी वर्गापुरते मर्यादित न राहता समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यत पोहचायला हवे.जुनी पेन्शन ही प्रत्येकाची गरज आहे.आज आपन नोकरी करत आहोत पुढे आपली पिढी नोकरी करत आशेल.शिक्षक,ग्रामसेवक,तलाठी,आरोग्यसेवक.पुलिस,एसटी कर्मचारी,जिप-महसूल-वन खाते-जलसंधारण इत्यादी विभागातिल लाखो कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय म्हणजे फक्त महाराष्ट्रातिलच करोडो लोकांच्या वर्तमान व भविष्यासाठी आपण लढत आहोत.याची जाणिव त्यांना करुन देणे गरजेचे आहे.कोणतिही जातपात,धर्माच्या भिंती ओलांडून संघटनेच्या माध्यमातून दबावगट निर्माण करणे गरजेचे आहे. संघटनेच्या तालुका व जिल्हा कार्यकारिनीचे काम जोमाने सुरु आहे.आनेक प्रसार माध्यम आपल्या आंदोलनाची दखल घेत आहेत,आपला आवाज जनतेपर्यंत पोहचत आहे.आणखी प्रयत्न केल्यास आपले आंदोलन पोरखेळ न राहता सर्वसमावेशक होईल.संयम बाळगून काम करावे लागेल.जुनी पेन्शन चे आंदोलन एक लोक चळवळ झाल्यास शासनाच्या बापाला जुनी पेन्शन लागू करावी लागेल.समाज्याच्या माध्यमातून आपल्या प्रश्नाचे गांभिरे शासन व राजकिय नेत्यांच्या कानावर घालावे लागेल.आणि जो पर्येंत मतपेटीतून राजकारण्यांना दणका बसत नाहा तोपर्यंत ते खडबडून जागे होणार नाहात.  शेवटी जनताच ठरवते राज्यकर्ते कोण असावेत ते?ब्रिटीशांना हाकलून लावण्याची ताकत लोक चळवळीतून निर्माण झाली हे आपन विसरायला नको.
       मिञहो! डीसीपिएस ते तोटे आपन जानताच.या अन्यायकारी पेन्शन योजनेमुळे आनेक बांधवांचे संसार उघड्यावर पडले आहेत.आपल्यानंतर आपल्या कुटूंबाचा वाली कोण? मायबाप शासनाने तर आपल्याला वाऱ्यावर सोडलेच आहे.आपन खुपच काहि सधन कुटूंबातले नाहित किंवा आपन ब्लँकमनिही छापत नाही.आपन सर्वानिच विविध कामासाठी लोन घेतले आहे.यामुळे कुटूंबाच्या गरचा भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे,अन अशातच आपल्या पगारावर डिसीपिएस चा दरोडा पडला आहे.डीसीपिएस चा हप्ता कपात होत आसल्याने पुन्हा शिक्षण सेवकांप्रमाणे मानहानिकारक जिवन जगावे लागत आहे.म्हणुनच आपन डिसीपिएस या अण्यायकारी योजनेला विरोध करुन जुनी पेन्शनचा लढा सुरु केला आहे
      मिञहो! कोणतेही प्रस्थापित नेतृत्व नसताना आपले संघटन जोमाने वाढत आहे.फक्त जुनी पेन्शन मिळविने हे एकच उदात्त ध्येय समोर ठेऊन आपन लाखोंच्या संख्येने संघटित होत आहोत.हे आपले तरुणांचे संघटन कोणत्याहि राजकिय,आर्थीक ,सामाजिक परिणाम व लाभाचा विचार न करता उभा राहिले आहे.केंद्र,बिट,तालुका ,जिल्हा,विभाग व राज्य पातळिवर संघटनेचे आतिशय परिणाम कारक कार्य सुरु आसून डीसीपिएस ची कपात कापात रद्द करुण जुनी पेन्शन लागू करावि यासाठी प्रशासकिय,राजकिय व न्यायलयिन पातळिवर संघर्ष सुरु आहे.आपन सर्व लाखोंच्या सहकार्याने व संर्षातुन आपन नक्कीच यशस्वी होऊ यात तिळमाञ शंका नाहि.रस्ता कठिन असला तरि आपला हेतू उदात्त आहे.आपन आपल्या हक्काच्या न्याय मागणिसाठी लढत आहोत.आपन कोणाला विरोधही करत नाहि किंवा आपन कोणाचे विरोधक आसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.आपन सर्वांचे आहोत सर्व आपलेच आहेत.कोणतिच शिक्षक संघटना किंवा राजकिय पक्ष किंवा नेता आपल्याला वर्ज नाही, तो मुळीच आपला उद्देश नाही.एक माञ नक्की आपली एकता व संघटन पाहून काहिंचा जळफळाट नक्कीच होत आहे.आपल्याला सर्वांच्या सहकार्याने आपली जुनी पेन्शनची मागणि पुर्ण करुन घ्यायची आहे.
      मिञहो! आपला जुनी पेन्शन चा लढा प्रशासकिय,राजकिय व न्यायालयीन पातळीवर सुरु आहे.डिसीपिएस ची कपात रद्द करावी या मागणिसाठी आपन औरंगाबादच्या न्यायालयात केस दाखल केली आहे आपल्या बाजूने कधिही निर्णय लागू शकतो.परंतू संघटनेच्या औरंगाबाद येथिल राज्यस्तरिय मिटींगमध्ये अँड.कुलकर्णी यांनी सांगितल्या प्रमाणे ''न्यायालयाचा जो निर्णय लागेल त्याचा लाभ फक्त संघटनेच्या अधिकृत सदस्यांनाच मिळू शकेल' म्हणजे जे संघटनेचे सदस्य नाहीत त्यांना लाभ मिळणार नाही!'' ज्या प्रकारे २००५ पुर्वी सेवेत लागलेले परंतू २००५ नंतर कायम झालेल्या शिक्षकांच्या बाबतीत घडले तसा हा प्रकार. याचा विचार करुन कोणत्याही शिक्षकावर व कर्मच्याऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अँड.कुलकर्णी यांच्या सुचनेनूसार आपन संघटनेचे अधिकृत सदस्य नोंदणी अभियान राबवित आहोत.त्यासाठी आपल्याला फक्त एक फॉर्म भरुन ३०० रु.ची एक पावती घ्यायची आहे.तुम्ही जर पावती फाडून सदस्य झाले तर संघटना तुमच्याशि बांधिल आशेल,तुमच्यावर अन्याय होणार नाही.
       मिञहो! वेळ कमि आहे, न्यायालयाचा निकाल कधिही लागू शकतो त्या आगोदर आपल्याला फॉर्म भरुन व पावती फाडून संघटनेचे सदस्य व्हायचे आहे.काहींना ३०० रुपये जास्त वाटतील पन जर ६ ते ७ हजाराचा हप्ता बंद हेणार अशेल तर ३०० देण्यास काहिही हरकत नसावी.मिञहो १० रुपयाचा हिशोब ठेवणारे आपण शिक्षक तिनशे रुपय सहजासहजी देतिल काय? पन द्यावेच लागतिल . यासाठी केंद्र ,बिट स्तरावर जाऊन आपल्याला जनजागृती करायची आहे.प्रत्येक शिक्षक बंधू भगिनींना व इतर विभागातिल डिसीपीएस धारक कर्मचारी सदस्य नोंदणी अभियानात सहभागी  करुन घ्यायचे आहे.जुनी पेन्शन आंदोलन एक लोक चळवळ उभि करायची आहे, या व आंदोलनात सामिल व्हा.
     मिञहो! सदस्य नोंदणीवअभियान यशस्वी करण्यासाठी आपले कार्यकर्ते दिवस राञ मेहनत घेत आहेत.जेव्हढी सदस्य संख्या वाढेल त्यावरच आपल्या जुनी पेन्शन ची पुढील वाटचाल ठरणार आहे.म्हणूनच आपण सदस्य व्हायचे आहे व इतरांणा होण्यास प्रवृत्त करायचे आहे.आनेक आडचनि येतिल काहि विरोध करतिल परंतू आपल्याला जायचेच आहे.आपल्या मयत बांधवांचा उघड्यावर पडलेल्या संसार पुन्हा उभा करण्यासाठी , आपल्या कुटूंबासाठी , निवृत्ती नंतरचे आयष्य सुखकारक करण्यासाठी आपल्याला लढायचे आहे,आभियानात सहभागी व्हायचे आहे. आपल्याला डीसिपीएस चे भिक नको आहे, आपल्याला हवी आहे आपल्या हक्काची जुनी पेन्शन आणि ति आपण मिळविणारच!
     मिञहो! निवृत्ती नंतर भिक मागायचे नशेल तर सामिल व्हा! चला जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सदस्य बनूया!! शेवटी एकच Be united fight and achieve....एकञ या लढा मिळवा.
   Help/join म.रा.जुनी पेन्शन हक्क संघटना to help yourself.

   आपलाच
श्री.दत्ता ढाकणे -बाविकर
जिल्हा प्रशिद्धी प्रमुख
म.रा.जु.पे.हक्क संघटना-पालघर
Poetddl.blogspot.com
9867062398

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस