पोस्ट्स

एप्रिल १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षक करणार एनपीएसचा बहिष्कार

इमेज
शिक्षक करणार एनपीएसचा बहिष्कार       पालघर दि.10 (प्रतिनिधी दि टिचर्स व्ह्यूज) जुनी पेन्शन योजना बंद केली अन डिसिपीएस (अंशदायी निवृत्ती वेतन योजना) योजना लागू करुन शासनाने 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची  खुप मोठी फसवणूक केली आहे .या योजनेतील तृटी , जमा रकमेचा हिशोब न देणे,शासनाचा दहा टक्के हिस्सा जमा न करणे, भविष्यातील स्पष्टता नसणे, अमंलबजावणी तील अनियमितता यामुळे आगोदरच शिक्षका हैराण आहेत, डीसिपीएस योजने विरोधात संताप व्यक्त करत आहेत.आणि अशातच शिक्षण विभागाने डिसिपीएस धारक शिक्षकांना एनपीएस (राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना) योजनेचे खाते खोलण्यासाठी फॉर्म भरण्याचे फर्मान काढले आहे.पालघर जिल्ह्यातील 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या डिसिपीएस धारक शिक्षकांनी एनपीएस च्या सक्ती विरोधात जोरदार मोहिम सुरु केली असुन एकञीत बहिष्काराचे अस्ञ उपसले आहे. डीसिपीएस आणि एनपीएस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीही योजना कर्मचारी/शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने घातक आहेत. आगोदरच डिसिपीएस योजनेमुळे पिचलेले शिक्षक एनपीएस योजनेमुळे आणखीनच आर्थिक विवंचनेत सापडणार आहेत.डिसिपीएस योजनेत मागील