पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डेमॉस्थेनिस

इमेज
डेमॉस्थेनिस ...! बोलणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. काही माणसे इतके सुंदर बोलतात की समोरच्या माणसाला बघता बघता खिशात टाकतात. काही आपल्या मनातील इप्सित समोरच्याला पटवून देतात, काही समोरच्यांवर इतके गारुड घालतात की समोरची व्यक्ती त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होते. ही देणगी आहे उत्तम वक्तृत्वाची.प्राचीन काळीही राजे महाराजे आपल्या सैन्याला युद्धासाठी भाषणातूनच चैतवायचे. अलेक्झांडरचे सैन्य जग जिंकायला निघाले ते त्याने केलेल्या उत्तम वक्तृत्वामुळेच. छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेताना आपल्या सवंगड्यांना आपल्या प्रभावी वाणीनेच स्वराज्याचे स्फुरण चढविले होते. आजपर्यंत झालेल्या सर्व युद्धांमध्ये सेनापतीने आपल्या सैन्याला उत्तेजित केल्यामुळेच ती युद्धे जिंकली गेल्याचे उल्लेख आहेत. आधुनिक काळात उत्तम वक्त्याचे हे गुण राजकारणात लोकांना आकर्षति करण्यासाठी उपयोगी पडतात. मार्टनि ल्युथर किंग यांचे ‘आय हॅव अ ड्रीम’ हे जगप्रसिद्ध भाषण, हिटलर, लेनिन आणि बोल्व्हेशिक क्रांतीतील भाषणे ते स्वामी विवेकानंद यांचे धर्म परिषदेतील अजरामर भाषण हे वक्तृत्व कलेचीच देणगी.भारतीय स्वातंत्र्य