पोस्ट्स

ऑगस्ट २, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आगरी व्हर्जन-- आमलावं पायजे मोबाईल ! (सुर्यकांत सराफ यांच्या आम्हांलाही हवाय मोबाईल.इ.४थी च्या बालभारती पुस्तकातील नाट्यछटेचे आगरी व्हर्जन.)

इमेज
                          आमलावं पायजे मोबाईल !        माझ एकदा आयकतय का, आई? मी आथां मोठी झालय अस तु निका सांगतय? मग मानाव सगल्यान सारका एक मस्त मोबाईल पायजे का नी.क्याचे साठी पायजे म्हनजे काय? बोलायसाटी ना हाय फोन?वा गंमत हाय,ताईन मांगला का लगेच मिलतय फोन दादा त कॉलेजलाव नेतय त्याचा मोबाईल.      बाबाचे जवल त दोन दोन मोबाईल हान,ना मीन मांगल्यावर तू सांगतस तुला काय गरज हाय त्याची.ओय ताई,नुसती काय पन बोलू नको,तुला मोबाईल दिलात तवा मी काय बोललू का? हॉं हॉं आमाना महत्वाची कामा व आसतान,महत्वाच बोलायचा असतय.दादाचा फोन  मी घेताव कवा कवा.पन फक्त गेम खेलाय,बोलय काय करु मंग?         आई पुढचे मयनेन माझा वाढदिवस येतय,माझे मिञांना मैञिनींना पार्टीला बोलवया कवरी मजा येल! 'अरं उंद्या सांचे माझे घरा गच्चीवर बड्डे पार्टी हाय.तु जरा लवकर येल ना?मस्त,भारी,आपू जाम मजा करु!आथा सगल्यांना फोनवर सांगता,बाय'. वा कवडा बरां वाटल असा फोन करताना.आई, अगं शालेन अचानक सुट्टी घेयाची असली का,नसती सरांची बोलनी खाया लागतन.त्यापेक्षा पप्पा कसं घरशास फोन करतान,तसा सरांना शालेन फोन करायचा. 'हँलो! गूड मॉर्नीं