नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी जतिन कदम व प्रतिभा कदम यांचे सूत्रसंचालन विषयावर लेखन;

नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी जतिन कदम व प्रतिभा कदम यांचे सूत्रसंचालन विषयावर लेखन; डॉ.वंदना महाजन व डॉ.पृथ्वीराज तौर यांचे विशेष मार्गदर्शन सफाळे दि.4 नोव्हें. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडच्या नवीन पदवी अभ्यासक्रमातील ' व्यक्तिमत्त्व विकासासाठी : संभाषण व लेखन कौशल्ये ' या संपादित ग्रंथाचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले सर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र कुलगुरू डॉ.जोगेन्द्रसिंग बिसेन व अधिष्ठाता डॉ.भगवान जाधव यांनी कन्टेन्ट आणि उत्कृष्ठ निर्मितीसाठी कौतुक केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवि सरोदे, माजी कुलसचिव डॉ. रमजान मुलांनी, डॉ केशव सखाराम देशमुख, प्रतीक्षा तालंगकर, सचिन कथले, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी हे मान्यवर पुस्तक सोहळ्यास उपस्थित होते. प्रकाशक युवराज माळी आणि पाठलेखिका प्रतीक्षा तालंगकर यांचा यावेळी कुलगुरू सरांनी प्रातिनिधिक सत्कार केला. विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांनी मराठी अभ्यास मंडळाचे मनापा...