पोस्ट्स

डिसेंबर ३, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यकर्ते तरुण शिक्षकांचा "आक्रोश" ऐकतिल काय?

इमेज
राज्यकर्ते तरुण शिक्षकांचा ''आक्रोश" ऐकतिल काय!    महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेञात सध्या अस्थिर वातावरण दिसत आहे. आनेक  घटना घडत आहेत  यामुळे शिक्षण क्षेञ ढवळून निघत आहे. पायाभुत चाचणीचा गोंधळ,एनपीआर चे काम,सरल ची डोकेदुखी,संच मान्यतेचे भिजत घोंगडे,आतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न,थकलेले पगार,बदल्यांचा गोंधळ,डीसीपीएस-नविन अंशदायी निवृती वेतन योजनेतील आर्थीक फसवणूक आशे आनेक प्रश्न ज्यामुळे शिक्षण क्षेञात कमालिचा गोंधळ दिसुन येत आहे.    वरिल प्रश्नांपैकी आंतरजिल्हा बदली व डीसीपीएस या अन्यायकारी प्रश्नांवर तरुण शिक्षक( जे २००५ नंतर सेवेत आलेत )खुप आक्रमक होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातिल शिक्षक व इतर खात्यांमधिल कर्मच्या-यांना डी.सी.पी,एस(अंशदायी पेन्शन योजना) लागू होऊन  ३१ऑक्टोबर रोजी दहा वर्ष पुर्ण झालि आहेत.या अन्यायकारी पेन्शन योजनेचा निषेध करण्यासाठी  राज्यातिल शिक्षक व इतर खात्यांमधिल कर्मच्या-यांनी ३१ ऑक्टोबर हा काळा  दिवस पाळला होता.राज्यभर या आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता..शिक्षकांनी तर या दिवशी काळ्या फिती लावून अध्यापन केल होते. जुनी पेन्शन योजना लागू करुन घेतल