पोस्ट्स

जुलै २५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी तिरंगा बोलतोय....

इमेज
मी तिरंगा बोलतोय..... झेंडा उँचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा... असे गीत तुम्ही मुले उत्साहाने गात असता. हे गीत ज्याच्याविषयी तुम्ही गाता तोच तुमचा तिरंगा, राष्ट्रध्वज आहे मी! मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय. आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे. सर्व भारतीय  माझा आदर करतात.       बाल मिञांनो! या वर्षी आपण स्वातंञ्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.देशात स्वातंत्र्याचा उत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. लहान- थोर सर्वांच्या मी मना-मनात आहेच परंतु  आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी 'हर घर तिरंगा' हे अभियान सुरु केल्यामुळे  आता मी प्रत्येक भारतीयांच्या घरा घरात पोहचलो आहे. यामुळे मी अतिशय आनंदात आहे.         बाल मिञांनो!माझी डिझाइन पिंगली वैंकया यांनी तयार केली आणि 22 जुलै 1947 रोजी पार पडलेल्या संविधान सभेत मला मान्यता देण्यात आली. त्याग , शांतता आणि समृद्धी चे प्रतिक असणारे तीन  रंग व त्यावर मधोमध शोभणारे अशोक चक्र यामुळे मी दिमाखदार दिसतो आणि तसा