पोस्ट्स

नोव्हेंबर १, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रात शिक्षक/कर्मच्या-यांमध्ये तिव्र असंतोष पेन्शन व आंतरजिल्हा बदली आंदोलनाचा वनवा भडकनार! Blog by दत्ता ढाकणे-बावीकर

              महाराष्ट्रात शिक्षक/कर्मच्या-यांमध्ये तिव्र असंतोष पेन्शन व आंतरजिल्हा बदली आंदोलनाचा वनवा भडकनार!       Blog by दत्ता ढाकणे-बावीकर     महाराष्ट्रातिल शिक्षक व इतर खात्यांमधिल कर्मच्या-यांना डी.सी.पी,एस(अंशदायी पेन्शन योजना) लागू होऊन  ३१ऑक्टोबर रोजी दहा वर्ष पुर्ण झालि आहेत.या अन्यायकारी पेन्शन योजनेचा निषेध करण्यासाठी  राज्यातिल शिक्षक व इतर खात्यांमधिल कर्मच्या-यांनी ३१ ऑक्टोबर हा काळा  दिवस पाळला.राज्यभर या आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.जुनी पेन्शन योजना मिळेपर्यंत शांत बसायचे नाही आंदोलन तिव्र करायचे असा निर्धार केला.शिक्षकांनी तर या दिवशी काळ्या फिती लावून अध्यापन केले.१नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेले सर्व शिक्षक आणि कर्मचारी तरुण आहेत.बदल घडून आणन्याची ताकत त्यांच्याकडे आहे.म.रा.जुनी पेन्शन हक्क कृती समिती/संघटन च्या नेतृत्वाखाली राज्यातिल सर्व कर्मचारी एकञ येऊन हा पेन्शनचा लढा देत आहेत.मोर्चे,निवेदन ,धरणे आंदोलन इत्यादि विधायक मार्गाने शिक्षक/कर्मचारी लढा देत आहेत.स्वत:च्या हक्कासाठी सर्वांनी वज्रमुठ आवळली आहे.जिल्हा बदली आंदोलनाने तर पुर्वीच जोर धरला आहे.