पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पदोन्नती प्रक्रिया लवकरच

इमेज
 पदोन्नती प्रक्रिया  लवकरच           पालघर दि. 4 डिसें.(द टिचर्स व्ह्यूज) ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन, बिंदू नामावली प्रक्रिया पुर्ण नसणे आणि शिक्षकांच्या विकल्प बदल्या इत्यादी कारणास्तव  मागील सहा वर्षापासून रखडलेली शिक्षकांच्या विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया लवकरच पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.            या विषयी सविस्तर माहिती अशी कि, ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन सहा वर्ष उलटले तरीही पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया पार पडलेले नाही,तशेच शिक्षकांचे आनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पालघर जिल्हा पेसा  अंतर्गत येतो आणि आदिवासी बहुल जिल्हा आहे या ठिकाणी शिक्षक,मुख्याध्यापक  केंद्रप्रमुख,  विस्तार अधिकारी या पदांच्या आनेक जागा रिक्त आहेत यामुळे शैक्षणिक प्रगतीवर याचा विपरीत परिणाम होत आहे. सदर पदांची पदोन्नती प्रक्रिया मागील सहा वर्षापासून रखडलेली आहे. यामुळे  नवीन भरती प्रक्रिया राबवता येत नाही आणि यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये वरील विविध पदाच्या रिक्त जागा आहेत अनेक

NPS योजनेला मुदतवाढ

इमेज
     NPS योजनेला मुदतवाढ          बीड दि.10, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शिक्षक, तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्द्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचार्यांना लागू  असलेली DCPS योजना केंद्राच्या NPS योजनेत सामाविष्ट करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदतवाढ शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.      19/09/2019 च्या कार्यपद्धती शासन आदेशाला देण्यात आलेली ही लगातार 5 वी मुदतवाढ आहे. या मुदतवाढी देताना वेळोवेळी वेगवेगळी कारणे देण्यात आलेली आहेत. आजची मुदतवाढ देताना "तांत्रिक अडचण व कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे अंमलबजावणी साठी विलंब होत असल्याचे"  कारण देण्यात आले आहे.      परंतु NPS ची अंमलबजावणी प्रक्रिया थांबवण्याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने घेतलेली परखड भूमिका हेच आहे. शिक्षक  संवर्गाला 15 वर्षे लागू असलेल्या DCPS योजनेचा पोस्टमार्टेम केले असून, नवीन NPS ची वस्तुनिष्ठ पोलखोल केलेली आहे.राज्यातील शिक्षक संवर्गासाठी 85 टक्क्याच्या वर लागूच नसलेल्या DCPS योजनेची अनिमित

त्या वृत्तीचा शिक्षकांमध्ये तिव्र संताप

त्या वृत्तीचा शिक्षकांमधे तिव्र संताप सफाळे दि.8. मास्तरड्यांनो काम केले तर मराल काय? या शीर्षकाखाली संपादकीय लेख प्रसिद्ध करणाऱ्या एका तथाकथित वृतपञाच्या संपादका विरोधात राज्यातील शिक्षक तिव्र संताप व्यक्त करत असून व संपादकाच्या मनोवृत्तीचा निषेध करत आहेत.       या विषयी सविस्तर माहिती अशी कि राज्य शासनाने शिक्षकांना दिवाळीच्या सुट्ट्या वाढवून देण्याचा शासन निर्णय पारित केला आहे यामुळे शिक्षकांमधे आनंदाचे वातावरण आहे परंतु काही शिक्षक विरोधी वृत्तींना ही गोष्ट पचली नाही. यामुळे त्यांचा तिळपापड झाल्यामुळे ते शिक्षकां विरोधात खालच्या भाषेत टिका करत आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथील एका स्थानिक वृत्तपत्राने केला आहे.    आपल्या संपादकीय लेखात शिक्षकां विरोधात आगदी खालच्या दर्जाची भाषा वापरुन टिका केली आहे. शिक्षकांचा मास्तरड्या असा उल्लेख करुन 'काम केले तर मराल काय?'या शीर्षकाखाली लेख लिहीला . त्यामध्ये '... तुम्ही सरकारचे जावाई अहात काय?हत्ती च्या कानातून उतरले काय,सगळं जग म्हणतंय काम हवंय आणि तुम्हाला कशाला रे सुट्ट्या?मास्तरड्यांनो जरा जास्त काम केले तर मराल काय?' अशा

नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी जतिन कदम व प्रतिभा कदम यांचे सूत्रसंचालन विषयावर लेखन;

इमेज
नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी जतिन कदम व प्रतिभा कदम यांचे सूत्रसंचालन विषयावर लेखन;   डॉ.वंदना महाजन व डॉ.पृथ्वीराज तौर यांचे विशेष मार्गदर्शन               सफाळे दि.4 नोव्हें. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडच्या नवीन पदवी अभ्यासक्रमातील ' व्यक्तिमत्त्व विकासासाठी : संभाषण व लेखन कौशल्ये ' या संपादित ग्रंथाचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले सर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र कुलगुरू डॉ.जोगेन्द्रसिंग बिसेन व अधिष्ठाता डॉ.भगवान जाधव यांनी कन्टेन्ट आणि उत्कृष्ठ  निर्मितीसाठी कौतुक केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवि सरोदे, माजी कुलसचिव डॉ. रमजान मुलांनी, डॉ केशव सखाराम देशमुख, प्रतीक्षा तालंगकर, सचिन कथले, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी हे मान्यवर पुस्तक सोहळ्यास उपस्थित होते. प्रकाशक युवराज माळी आणि पाठलेखिका  प्रतीक्षा तालंगकर यांचा यावेळी कुलगुरू सरांनी प्रातिनिधिक सत्कार केला.     विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांनी मराठी अभ्यास मंडळाचे मनापासून आभार व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, आमच्यावर विश्वा

अभ्यास फेरी उपक्रमांतुन शाळा बंद शिक्षण सुरु

इमेज
     सफाळे दि. कोरोना महामारी च्या कारणामुळे मागील मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद आहे या शैक्षणिक वर्षातही पहिले सत्र संपत आले आहे तरी शाळा बंदच आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात कायम ठेवण्यासाठी शासन स्तरावरून ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबिली जात आहे ही शिक्षण पद्धती शहरी भागामध्ये निमशहरी भागांमध्ये प्रभावी ठरत आहे परंतु ग्रामीण भागात सुविधांचा अभावमुळे ऑनलाइन शिक्षणात खूप आडचणी  येत आहेत.          पालघर सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागात तर ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबणे खूप कठीण काम ठरत आहे या लॉकडाउन च्या काळात  आदिवासी भागात बेरोजगारी वाढली आहे लोकांचे रोजगार  बंद आहेत. काम मिळत नाही.हाताला काम नाही यामुळे  एक वेळ खाण्याची भ्रांत आहे अशा बिकट परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी सुविधा स्मार्ट  अँड्रॉइड फोन यासारखी सुद्धा अगदी बोटावर मोजण्याइतक्या पालकांकडे उपलब्ध आहे अशा परिस्थितीत शिक्षण पद्धती ऑनलाईन शिक्षण पद्धती   कुचकामी ठरत आहे.  विद्यार्थ्यां

काळा दिवस!

इमेज
 डीसिपीएस  कर्मचार्यांच्या जीवनात सोळाव वरीस धोक्याच.   1नोव्हेंबर काळा दिवस         महाराष्ट्र राज्यातील सर्व DCPS/NPS धारक बंधू भगिनी आज 1 नोव्हेंबर हा दिवस कर्मचारी जीवनातील "काळा दिवस" म्हणून साजरा करत आहोत. 15 वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2005 रोजी महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढत कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात "न भूतो ना भविष्यति" असा सर्वात मोठा अन्याय केला आहे. हा अन्याय म्हणजे कर्मचार्यांच्या उतारवायची काठी म्हणून आधार असलेली, संविधानाने जिला "मौलिक अधिकार"चा दर्जा दिला व सर्वोच्च न्यायालयाने ज्यावर कर्मचार्यांचा हक्क सांगत शासनाचे कर्मचार्यांप्रति शासनाचे उत्तरदायित्व वारंवार अधोरेखित केले आहे असे "निवृत्तीवेतन"(पेन्शन) बंद केले आहे. हो हो बंदच केले आहे.ते कसे हे आता अगोदर आपण समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त सर्व शासकीय कर्मचार्यांना म.ना.से निवृत्तीवेतन 1982 आणि म.ना.से. निवृत्तीवेतनाचे अंशराशिकरन 1984 हे 2 नियम 31 ऑक्टोबर 2005 च्या अधिसूचनेने केवळ सुधारणा या शब्दाचा वापर करून पूर्णतः बं

NPS खाते उघडण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्याचे संचालकांचे आदेश.

इमेज
   NPS खाते खाते उघडण्यााची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यााचे संचालकांचे आदेश  जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या लढ्याला यश    सफाळे  दि.1नोव्हेंबर.महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस ) खाते उघडण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवून एनपीएस राबवण्यातील त्रुटी दूर कराव्यात व आक्षेप शंकानिरसन करावे असे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी मुख्य सचिव शालेय शिक्षण यांच्याकडे निवदेन सादर केले आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सध्या सुरु असलेल्या डीसीपीएस योजनेचे एनपीएस मध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून चालू आहे. या प्रक्रियेतील त्रुटी, राबवण्याच्या पध्दतीतील आक्षेप यासाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेने शिक्षण संचालक प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक भेट घेवून निवेदन सादर केले होते मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य माध्यम प्रमुख प्राजक्त झावरे पाटील, राज्य प्रवक्ते शिवाजी खुडे,  पुणे जिल्हा जूनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

इमेज
      ॲ क्सिडेंटल हॉलिडेज...!                   - दत्ता ढाकणे-बावीकर       सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिट झाली आहेत. मी आत्ताच झोपेतून उठलोय आणि नेहमीप्रमाणे  माझ्या घराच्या गॅलरी बसलोय.आज मला समोरचे चिञ निराळे दिसत आहे. रोज पहाटे चार वाजता उघडणारे आमच्या सोसायटीचे गेट आज सात वाजत आले आहेत तरी बंदच आहे. कोंबडा हरवण्याचा आवाज येतोय लोक्स अजूनही साखर झोपेतच असावेत कदाचित. निरव परंतु भितीदायक  शांतता जाणवत आहे. वातावरणात जरासा गारवा आहे. तरिही दररोज  जॉगींग करणारे लोक्स नाहीत, दूर दूर कुठेच माणसं दिसत नाहीत. अजिबात गोंगाट नाही लेकरांचा रडण्याचा हे आवाज नाही . ज्याप्रमाणे पूर्वी कडक शिस्तीचे गुरुजी वर्गात छडी घेऊन येताना दिसल्यावर जसा वर्ग चिडीचूप होत असे तसा समोरचा परिसर चिडीचूप वाटत आहे. आज दूधवाला  दिसत नाही, पेपर वाल्याच्या सायकलचा ट्रिंग ट्रिंग आवाजही येत नाही. आज रविवार  खवय्यांचा खास दिवस असूनही  ' मावरं घे ग, ताई मावरं पाहिजे का ग!' असा आवाज ऐकायला येत नाही. गाड्यांची तर अजिबातच वर्दळ नाही  साधी मोटर सायकल रस्त्यावर धावताना दिसत नाही, धडधडणाऱ्या लोकल गाड्यांचा

मामाच पञ हरवले,आम्हाला नाही सापडले.....बालपणीची आठवण करुन देणारा हा खेळ.

इमेज

आपली बोटे कॅल्क्युलेटर,बोटांची जादू.

इमेज