पदोन्नती प्रक्रिया लवकरच

 पदोन्नती प्रक्रिया  लवकरच
   
      पालघर दि. 4 डिसें.(द टिचर्स व्ह्यूज) ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन, बिंदू नामावली प्रक्रिया पुर्ण नसणे आणि शिक्षकांच्या विकल्प बदल्या इत्यादी कारणास्तव  मागील सहा वर्षापासून रखडलेली शिक्षकांच्या विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया लवकरच पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.  
         या विषयी सविस्तर माहिती अशी कि, ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन सहा वर्ष उलटले तरीही पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया पार पडलेले नाही,तशेच शिक्षकांचे आनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पालघर जिल्हा पेसा  अंतर्गत येतो आणि आदिवासी बहुल जिल्हा आहे या ठिकाणी शिक्षक,मुख्याध्यापक  केंद्रप्रमुख,  विस्तार अधिकारी या पदांच्या आनेक जागा रिक्त आहेत यामुळे शैक्षणिक प्रगतीवर याचा विपरीत परिणाम होत आहे. सदर पदांची पदोन्नती प्रक्रिया मागील सहा वर्षापासून रखडलेली आहे. यामुळे  नवीन भरती प्रक्रिया राबवता येत नाही आणि यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये वरील विविध पदाच्या रिक्त जागा आहेत अनेक वर्षापासून शिक्षक संघटना भरती प्रक्रिया करावी यासाठी पाठपुरावा करत आहेत.      परंतु  बिंदुनामावली प्रक्रिया अद्ययावत  नसल्यामुळे कोणत्या पदाच्या आणि कोणत्या जात संवर्गाच्या किती जागा रिक्त आहेत याची ठराविक आकडेवारी नाही आणि ठाणे पालघर विकल्प बदल्यांची प्रक्रिया आजुनही पुर्ण होत नसल्याने पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होत नाही. 
      याचबरोबर आनेक शाळेत शिक्षक संख्या पुरेशी नसणे, डीसिपीएस योजनेतून झालेल्या कपातिचा हिशोब, पदवीधर शिक्षकांना 4300 रु.वेतनश्रेणी, स्थगिती बदली प्रक्रिया  भाषा विज्ञान विषयाचे पदवीधर पदोन्नती प्रक्रिया, विस्थापित शिक्षकांचा प्रश्न, शिक्षकांना देण्यात येणारी  चटोपाध्याय वेतन श्रेणी,24 वर्षं सेवा झाल्यावर मिळणारी वेतन श्रेणी प्रस्ताव, शिक्षकांचे राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन प्रक्रिया, शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामें कमि करणे  अशे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची सोडवणूक वेळेवर होत नाही यामुळे पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगती वर परिणाम होत आहे. 
           यासंदर्भात दि.4 डिसेंबर रोजी पालघर जिल्हा  कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने  जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी  यांची भेट घेतली व वरिल विषयी सविस्तर माहिती देऊन प्रश्नांचे गांभीर्य लक्षात आणून दिले. "बिंदूनामावली प्रक्रिया लवकरच अद्ययावत करण्यासाठी शिक्षण विभागाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या आत पुर्ण करण्याच्या सक्त सुचना देण्यात येतिल तशेच पदोन्नती प्रक्रिया लवकरच राबविण्यात यावी अशा सुचना शिक्षण विभागाला देऊ  तशेच शिक्षकांच्या बदल्या व इतर प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण विभागाची लवकर मिटींग घेण्यात येईल अशे अश्वासन दिले. तशेच बदली प्रक्रियेत ज्या महिला  शिक्षकांवर अन्याय झाला आशेल त्यांनी वैयक्तिक निवेदन द्यावे ,खरोखर अन्याय झाला आशेल,गैरसोय झाली अशेल तर त्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करण्यात येईल अशे अतिरिक्त मु.का.अधिकारी मा.वाघमारे यांनी अश्वासन दिले.  
        शिक्षकांच्या विविध  प्रश्ना संदर्भात कास्ट्राईब संघटनेच्या वतीने आमदार मा.श्रीनिवास वनगा, पालघर जिल्हा जिल्हाधिकारी मा.माणिक गुरसल शिवसेना जिल्हाअध्यक्ष राजेश शहा, महिला व बालकल्यान समिती अध्यक्षा मा.अनुष्का ठाकरे,अतिरिक्त मु.का.अधिकारी मा. वाघमारे इत्यादी अधिकारी व पदाधिकारी यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. 
  शिक्षण विभाग व शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक तात्काळ करुन पालघर जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु व सहकार्य करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले.
    या शिष्टमंडळा मध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ जाधव,उपाध्यक्ष संदिप पाटील, कार्याध्यक्ष गणेश जाधव, सरचिटणीस दिलिप दूपारे, कास्ट्राईब  संघटनेचे सचिव तथा जुनी पे.हक्क संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख दत्ता ढाकणे, पालघर तालुका अध्यक्ष राजन गरूड यांचा सहभाग होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस