डेमॉस्थेनिस

डेमॉस्थेनिस ...!

बोलणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. काही माणसे इतके सुंदर बोलतात की समोरच्या माणसाला बघता बघता खिशात टाकतात. काही आपल्या मनातील इप्सित समोरच्याला पटवून देतात, काही समोरच्यांवर इतके गारुड घालतात की समोरची व्यक्ती त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होते. ही देणगी आहे उत्तम वक्तृत्वाची.प्राचीन काळीही राजे महाराजे आपल्या सैन्याला युद्धासाठी भाषणातूनच चैतवायचे. अलेक्झांडरचे सैन्य जग जिंकायला निघाले ते त्याने केलेल्या उत्तम वक्तृत्वामुळेच. छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेताना आपल्या सवंगड्यांना आपल्या प्रभावी वाणीनेच स्वराज्याचे स्फुरण चढविले होते. आजपर्यंत झालेल्या सर्व युद्धांमध्ये सेनापतीने आपल्या सैन्याला उत्तेजित केल्यामुळेच ती युद्धे जिंकली गेल्याचे उल्लेख आहेत.

आधुनिक काळात उत्तम वक्त्याचे हे गुण राजकारणात लोकांना आकर्षति करण्यासाठी उपयोगी पडतात. मार्टनि ल्युथर किंग यांचे ‘आय हॅव अ ड्रीम’ हे जगप्रसिद्ध भाषण, हिटलर, लेनिन आणि बोल्व्हेशिक क्रांतीतील भाषणे ते स्वामी विवेकानंद यांचे धर्म परिषदेतील अजरामर भाषण हे वक्तृत्व कलेचीच देणगी.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील टिळक,  सावरकर, गांधीजी, सुभाषचंद्र बोस यांच्या तेजस्वी वाणीने गुलामगिरीतील जनतेच्या मनात इंग्रजांच्या विरोधात आग निर्माण करण्याचे काम केले. आचार्य अत्रे, वाजपेयी आणि सध्याच्या राजकारणतील  देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी , राज ठाकरे यांच्या सभांना लाखाची गर्दी उसळते ती त्यांच्या प्रभावी भाषण शैलीमुळे.

         "वक्ता दशसहस्ञेषु" म्हणजे दहा हजारातून एखादा वक्ता तयार होते अशे म्हणतात. पण मी तुम्हाला आज अशा एका महान वक्त्याची गोष्ट सांगणार आहे तो हजारातून नव्हे तर लाखोतून तयार झाला होता . ही गोष्ट आहे डेमॉस्थेनिस Demosthenes ची. डेमॉस्थेनिस चा जन्म 384 BC मधला.सात वर्षाचा असतानाच अनाथ झाला.... त्याने डोळे उघडे ठेवले . तो परिस्थितीचा अभ्यास करित राहिला, मन बुध्दी जागृत ठेवली. लिहीत राहिला वाचत राहिला .मग मनोभावे बोलत राहिला . तो त्याच्या काळातील वक्तृत्वाचा महामेरू ठरला.

       पण हा महामेरू होण्याचा प्रवास सोपा नव्हता. ग्रीस देशात त्याकाळात लहान सहान राज्य होती ,बोलण दुर्मीळ होते . माणसांची संपर्क क्षमता मर्यादित होती. अशा काळात वक्ता होण्याचे स्वप्न एक युवक पाहत होता. तो काही राजघराण्यातील नव्हता किंवा जमीनदार नव्हता. अंगानेही राजबिंडा नव्हता. आगदी सामान्य. अंगात बळ नव्हते पण मनाची धाव मोठी होती. धावत्या मनामागे दुबळे शरिर ओढले जात होते. काहीतरी प्रचंड करुन दाखविण्याची प्रबळ इच्छाशक्ती त्या दुर्बल शरीरत वास करित होती.

      डेमॉस्थेनिस सात वर्षाचा असताना अनाथ झाला. तो बालपणी तसा मुख दुर्बलच होता.त्याची प्रकृती बेताचीच होती. उच्चारात स्पष्टता नव्हत.  आवाज करता आणि कमकुवत होता. बोलण्यात झेप नव्हती. त्याने बोलावे आणि इतरांनी ऐकावे अशे काहीच नव्हते. तरिही त्याला वक्ता होण्याचे स्वप्न पडत होते. तो त्याचा ध्यास होता.

     वक्ता होण्यासाठी काय लागते , याचे त्याने गणित मांडले. आपले व्यक्तित्व प्रसन्न असले पाहीजे .आपले हावभाव आणि आविर्भाव आकर्षक आणि लक्षवेधी असले पाहीजेत; पण हे कशे संपादन करायचे? अनुकरण करायचे कोणाचे ? मार्गदर्शन तरी घ्यायचे कोणाचे ? तो धडपडत राहीला, मार्ग शोधत राहिला. शेवटी त्याने एका नाटक कंपनीत प्रवेश मिळविला . पडेल ते काम पत्करले.  मंचावरून घडणारा अनेक भूमिकांचा वावर पाहिला . नोटांचा अभिनय,  वाणीचा विलास प्रेक्षकांची दाद यातील सूर अभ्यासले. त्याच्या उपजत बुद्धीला जाग आली, जाण आली.

   त्या काळात बोलणे हे काम तसे  हिमतीचे होते. आजच्या सारखे तेव्हा समोर ध्वनिवर्धक किंवा आवाजातील चढउतार कृञीम रित्या निर्माण करण्यासाठी डॉल्बी साउंड नव्हत.  आणि श्रोताही संस्कारित नव्हता. वेगवेगळ्या पंथाचे,  समुदायाचे विचारसरणीचे अवखळ लोक समोर असत.  त्यांना सावरून सभा संभाळणे मोठे जिकीरीचे काम. सभेत जीव ओतण्यासाठी वक्ताही तसा प्रभावी अन आवाजात दम असणारा असावा लागत होता. अशा वेळी डेमॉस्थेनिस चा कोता , कमकुवत आणि कापरा आवाज हा चमत्कार कसा घडवू शकणार होता? 

     डेमॉस्थेनिस हार मानणारा नव्हता.  तो रोज धावण्याचा सराव करु लागला . टेकड्यावरुन चढउतार करु लागला. त्याची श्वसनशक्ती मजलेदार झाली. पल्लेदार वाक्य धाप न लागता त्याला पेलता येऊ लागले , तरी एक अडचण जाणवली.  आवाज पल्लेदार झाला पण दमदार झाला नाही. त्याला वजन विस्तार आणि व्याप्ती नव्हती . तो घुमत नव्हता.  डेमॉस्थेनिस समुद्र किनार्‍यावर जाऊन मोठ्याने बोलू लागला. लाटांना साक्षी ठेऊन तो महान वक्ता होण्याचा प्रवास करु लागला. काही दिवसात त्याची वाणी खणखणीत झाली. कोणाकडून तरी ऐकले की 'तोंडात गारगोट्या ठेऊन बोलण्याने गावाचे जिभेचे स्नायू बळकट होतात ' तो तसे करु लागला. तो तोंडात गारगोटी ठेऊन बोलण्याचा सराव करु लागला. यामध्ये थोडी गंमत आणि वेडेपणाही होता. 

      डेमॉस्थेनिस ने 18 वर्षाचा असताना आपल्या  पालका विरुध्द न्यायालयात केस लढवली व आपले प्रभावी वक्तृत्व कौशल्य सिध्द केले.  पण तरीही काहीतरी कमि होते . डेमॉस्थेनिस चे समाधान होत नव्हते . बोलण्यासाठी शब्दांचे लावण्य हवे,  भाषेचे सौंदर्य हवे. ते कोठून आणायचे ? तेव्हा त्याने ग्रंथाचा आश्रय घेतला, पुस्तकांना शरण गेला.त्याने त्याकाळातील सर्वश्रेष्ठ लेखकांचे ग्रंथ तोंडपाठ केले. थुसीडिडिज या लेखकाचा इतिहास ग्रंथ अनेकदा वाचला त्याचे पारायण केली.अक्षरशः तो मेंदूत उतरून घेतला. यामुळे त्याच्या ओठात आणि बोटात भाषा भिनली.  रोज वाचत राहिला,  रोज लिहीत राहिला. त्याने डोळे उघडे,  लोकांचे जिवन अनुभवले, ती परिस्थिती वाचली. मग तो मनोभावे बोलतच राहिला.  तो त्याच्या काळातील वक्तृत्वाचा महामेरू ठरला.बालपणी जिव्हाजड असलेला डेमॉस्थेनिस वक्तृत्व कलेत अमर झाला.


लेखक 

दत्ता ढाकणे- बावीकर 

9867062398

poetddl.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!