पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बरे झाले आगीत तेल ओतले.....!

इमेज
बरे झाले आगीत तेल ओतले.......!                        Bloger- दत्ता ढाकणे-बावीकर            काल महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व चिञ पहायला मिळाले. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर घंट्याच्या निनादाने व 'एकच मिशन जुनी पेन्शन', पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची,'23/10चा शासन निर्णय रद्द करा' या घोषणेने  दुमदुमला होता.शाळेत वाजणारी घंटा शहराच्या गर्दीत निनादत होती. डोक्यावर टोपी,पांढरा शर्ट अन काळी पॅण्ट या वेशातिल    हजारो लोकांची गर्दी, शिस्तीत दिसत होती.माञ घोषणा व वक्त्याच्या  भाषणात राज्यकर्त्यां विषयी रोष दिसत होता,आन्याय करुन आगीत तेल ओतल्याची भावना दिसत होती.निमित्त होते 'घंटानाद आंदोलनाचे'  अवघ्या महाराष्ट्रातील तरुण शिक्षक/कर्मचारी  हातामधे घंटा घेऊन रस्त्यावर उतरले होते.यामध्ये तरुण शिक्षकांची संख्या लक्षणीय दिसत होती. तरुणांच्या नेतृत्वाखाली  तरुणांचे आंदोलन सुरू होते. शासनाला जागे करण्यासाठी,न्याय मागण्यासाठी. गर्दी तरुणांची मागणी माञ पेन्शनची. हा जरी विरोधाभास वाटत होता माञ वास्तव परिस्थिती जाणून घेतल्यावर आं