NPS योजनेला मुदतवाढ

NPS योजनेला मुदतवाढ बीड दि.10, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शिक्षक, तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्द्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना लागू असलेली DCPS योजना केंद्राच्या NPS योजनेत सामाविष्ट करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदतवाढ शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. 19/09/2019 च्या कार्यपद्धती शासन आदेशाला देण्यात आलेली ही लगातार 5 वी मुदतवाढ आहे. या मुदतवाढी देताना वेळोवेळी वेगवेगळी कारणे देण्यात आलेली आहेत. आजची मुदतवाढ देताना "तांत्रिक अडचण व कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे अंमलबजावणी साठी विलंब होत असल्याचे" कारण देण्यात आले आहे. परंतु NPS ची अंमलबजावणी प्रक्रिया थांबवण्याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने घेतलेली परखड भूमिका हेच आहे. शिक्षक संवर्गाला 15 वर्षे लागू असलेल्या DCPS योजनेचा पोस्टमार्टेम केले असून, नवीन NPS ची वस्तुनिष्ठ पोलखोल केलेली आहे.रा...