NPS योजनेला मुदतवाढ

     NPS योजनेला मुदतवाढ

         बीड दि.10, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शिक्षक, तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्द्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर 
कर्मचार्यांना लागू  असलेली DCPS योजना केंद्राच्या NPS योजनेत सामाविष्ट करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदतवाढ शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
     19/09/2019 च्या कार्यपद्धती शासन आदेशाला देण्यात आलेली ही लगातार 5 वी मुदतवाढ आहे. या मुदतवाढी देताना वेळोवेळी वेगवेगळी कारणे देण्यात आलेली आहेत. आजची मुदतवाढ देताना "तांत्रिक अडचण व कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे अंमलबजावणी साठी विलंब होत असल्याचे"  कारण देण्यात आले आहे.
     परंतु NPS ची अंमलबजावणी प्रक्रिया थांबवण्याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने घेतलेली परखड भूमिका हेच आहे. शिक्षक  संवर्गाला 15 वर्षे लागू असलेल्या DCPS योजनेचा पोस्टमार्टेम केले असून, नवीन NPS ची वस्तुनिष्ठ पोलखोल केलेली आहे.राज्यातील शिक्षक संवर्गासाठी 85 टक्क्याच्या वर लागूच नसलेल्या DCPS योजनेची अनिमितता उदाहरणांसह जिल्हा स्तरासह, शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त कार्यालय यांना दाखवून दिलेली आहे.
       त्यासाठीचा आपला सविस्तर आराखडा 25 ऑगस्ट व 12 ऑक्टोबर रोजी आपण त्यांना लेखी दिलेला आहे.
      या या आराखड्याला अनुसरून सचिव, शालेय शिक्षण यांच्याकडे शिक्षण संचालकांनी 27 ऑक्टोबर रोजी मार्गदर्शन मागविले आहे. त्याविषयी कोणतीही कार्यवाही करण्याअगोदर शालेय शिक्षण विभागाला आपल्याशी चर्चा करावीच लागणार आहे.आपल्याला आशा आहे अशी बैठक ते लवकर लावतीलच. अशी बैठक व त्यानंतर च्या अनेक धोरणात्मक बाबी महाराष्ट्र शासनाला केल्याशिवाय पर्यायच नाही. तोपर्यंत अशा कित्येक मुदतवाढी त्यांना द्याव्याच लागणार आहेत. अशी माहिती  संघटनेचे राज्य प्रवक्ते  शिवाजी खुडे यांनी दिली आहे. 
     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस