काळा दिवस!

डीसिपीएस कर्मचार्यांच्या जीवनात सोळाव वरीस धोक्याच. 1नोव्हेंबर काळा दिवस महाराष्ट्र राज्यातील सर्व DCPS/NPS धारक बंधू भगिनी आज 1 नोव्हेंबर हा दिवस कर्मचारी जीवनातील "काळा दिवस" म्हणून साजरा करत आहोत. 15 वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2005 रोजी महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढत कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात "न भूतो ना भविष्यति" असा सर्वात मोठा अन्याय केला आहे. हा अन्याय म्हणजे कर्मचार्यांच्या उतारवायची काठी म्हणून आधार असलेली, संविधानाने जिला "मौलिक अधिकार"चा दर्जा दिला व सर्वोच्च न्यायालयाने ज्यावर कर्मचार्यांचा हक्क सांगत शासनाचे कर्मचार्यांप्रति शासनाचे उत्तरदायित्व वारंवार अधोरेखित केले आहे असे "निवृत्तीवेतन"(पेन्शन) बंद केले आहे. हो हो बंदच केले आहे.ते कसे हे आता अगोदर आपण समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त सर्व शासकीय कर्मचार्यांना म.ना.से निवृत्तीवेतन 1982 आणि म.ना.से. निवृत्तीवेतनाचे अंशराशिकरन 1984 हे 2 नियम 31 ऑक्टोबर 2005 च्या अधिसूचनेने केवळ सुधारणा या शब्दाचा वापर करून पूर्णतः बं...