पोस्ट्स

फेब्रुवारी २६, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आम्ही आहोत मराठी पण टाळतो मराठी!

इमेज
आम्ही आहोत मराठी,पण बोलताना टाळतो मराठी!                            लेखक-दत्ता ढाकणे-बावीकर        दरवर्षी प्रमाणे यावर्षिही  मराठी राज भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय.हा दिवस जवळ आला की आपल्या मराठी तरुण वर्गाला (खास करुन शहरी)या निमित्ताने मराठी विषयी प्रेमाचे उबाळे येतात.विशेषतःसोशल मिडीयावर मराठी विषयी प्रेम उतू जाते.मराठी टिकली पाहिजे, मराठीचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे,प्रत्येकांनी मराठी बोललं पाहिजे,मराठी शाळा टिकल्या पाहिजेत याविषयी खुप लिहील आणि बोललं जातं.आमची मुलं इंग्रंजी माध्यमात शिकतात अन तरिही आम्ही माञ  बेंबिच्या देठापासुन  मराठी दिनाच्या शुभेच्छा माञ द्यायला विसरत नाही. मराठी भाषा दिनाचे जसे जसे वर्ष वाढत चाललेत तशि तशि मराठी दीन होत चालली आहे .याला मराठी माणूसच कारणिभूत आहे, हे नाकारता येणार नाही.आम्ही फक्त बेलतो पण करत काहिच नाही.लाभले आम्हास भाग्य बोलते मराठी ,ऐकतो मराठी! हे जरी खरे असले तरी आता शुद्ध मराठी कानावर पडतच नाही.कारण आम्ही शुद्ध मराठी बोलतच नाही.       याचे कारण आपण चांगलेच जाणतो. आम्हाला शहरात गेल्यावर मराठी बोलायला लाज वाटते.स्वतःच्या बोलीभाषे