आम्ही आहोत मराठी पण टाळतो मराठी!

आम्ही आहोत मराठी,पण बोलताना टाळतो मराठी!

                           लेखक-दत्ता ढाकणे-बावीकर

       दरवर्षी प्रमाणे यावर्षिही  मराठी राज भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय.हा दिवस जवळ आला की आपल्या मराठी तरुण वर्गाला (खास करुन शहरी)या निमित्ताने मराठी विषयी प्रेमाचे उबाळे येतात.विशेषतःसोशल मिडीयावर मराठी विषयी प्रेम उतू जाते.मराठी टिकली पाहिजे, मराठीचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे,प्रत्येकांनी मराठी बोललं पाहिजे,मराठी शाळा टिकल्या पाहिजेत याविषयी खुप लिहील आणि बोललं जातं.आमची मुलं इंग्रंजी माध्यमात शिकतात अन तरिही आम्ही माञ  बेंबिच्या देठापासुन  मराठी दिनाच्या शुभेच्छा माञ द्यायला विसरत नाही. मराठी भाषा दिनाचे जसे जसे वर्ष वाढत चाललेत तशि तशि मराठी दीन होत चालली आहे .याला मराठी माणूसच कारणिभूत आहे, हे नाकारता येणार नाही.आम्ही फक्त बेलतो पण करत काहिच नाही.लाभले आम्हास भाग्य बोलते मराठी ,ऐकतो मराठी! हे जरी खरे असले तरी आता शुद्ध मराठी कानावर पडतच नाही.कारण आम्ही शुद्ध मराठी बोलतच नाही.
      याचे कारण आपण चांगलेच जाणतो. आम्हाला शहरात गेल्यावर मराठी बोलायला लाज वाटते.स्वतःच्या बोलीभाषेत संवाद करायला आम्हाला कमिपणा वाटतो.मराठी भाषेचे हे अमृत आम्हाला आता कडू वाटायला लागले आहे.काळानुसार बदलाव,नविन बदल स्विकारावेत परंतू किती याचे आम्हाला भाण राहिलेच नाही.चकचकित,भपकेबाज अन दिखाऊ इंग्रजीने तर आम्हाला पार वेड लावलयं.हिच्या वेडापायी भरजरी पेहरावातल्या मराठी मातेची आम्हाला लाज वाटायला लागली आहे.ज्ञानेश्वर,तुकाराम ते कुसुमाग्रजांची दैवी परंपरा लाभलेल्या मराठी भाषेत बोलताना आमची जीभ आडखळायला लागली आहे.खोट्या प्रतिष्ठेपायी आम्ही शुद्ध मराठीत बोलायला लाजतो.मराठी भाषेत हिंदी अन इंग्रजी शब्दांची भेसळ करुन बोलायची एक नविन पद्धत आजच्या शहरी तरुण पिढीत रुजली आहे.एक नविनच महिंग्लीश भाषा अस्तीत्वात आली आहे. पिज्झा बर्गरच्या जमान्यात आजच्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागेनाशी झाली आहे.मराठी भाषेचे वैभव,अमर्याद शब्द संपदा असुनही आपण बोलताना त्याचा वापर करत नाही.विचार करा आपण रोज किती शब्द मराठीत बोलतो अन किती शब्द हिंदी,इंग्रजीतले बोलतो.काही उदाहरण द्यायची झाली तर poetddl.blogspot.com बादली,पंखा,कागद,बिछाना,समारंभ,बातमी,पिशवी,आई-वडिल,रस्ता,बाजार,बसस्थानक,किंमत....इत्यादी  शब्द बोलायला संकोच वाटतो.हे शब्द फक्त वानगी दाखल घेतले आहेत अशे शेकडो शब्द जे आता लोप पावत चालले आहेत.आपण दैनंदिन व्यवहारात या शब्दां ऐवजी इंग्रजी शब्दांचा बोलताना वापर करतो.दुकानात खरेदी करताना समोरच्याला मराठी येत असुनही आम्ही हिंदीत बोलतो.मिञमैञिनीं सोबत बोलताना आम्ही हिंदीत बोलते.मराठीत बोलताना कमित कमी मराठी शब्दांचा वापर करतो.ग्रामिण भागातिल बोलिभाषांचे तर अस्तित्वच संपले आहे.कोकणात,मराठवाडा,विदर्भ,खान्देशात खुप गोड आणि रसाळ बोली भाषा बोलल्या जात होत्या त्या आता शेवटच्या घटका मोजत आहेत.या बोलीभाषेतिल पारंपारिक कविता,गीत,कथा इत्यादी समृद्ध साहित्य जतन करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.आम्हाला हिंदीतला धांगडधिंगा आवडतो पण आमच्या आजी-आजोबांचे लोकगीत व पारंपारिक चालिरीती आवडत नाहीत.
    हॉट्सअँप,फेसबुक,ट्विटरवर गप्पा मारताना,संदेश पाठविताना आमच्या मोबाईलच्या कळफलकावर आम्हाला मराठि दिसतच नाही.इंग्रजी आम्हाला सोपि वाटते.अर्थ उमगला नाहा तरी चालेल पण आम्ही इंग्रजी वर्तमानपञ पहिले चाळतो.प्रतिष्ठा म्हणुन एखादे इंग्रजी किंवा हिंदी पुस्तक सोबत बाळगतो.इंग्रजी शाळांनी तर वाटच लावली आहे.घरी मराठी अन शाळेत आर्धी इंग्रजी अन आर्थी हिंदी.त्यातच पुन्हा वर्गात बहूभाषिक विद्यार्थी असतील तर मग कहरच!सगळी खिचडी. गुजराती,तेलगू,भोजपुरी,राज्यस्थानी !शाळेत नेमकी कोणती भाषा विद्यार्थी शिकत असतिल?पालकांनो सांगा तुम्ही काय शिकतील तुमची लेकरं?मराठीची तर वाट लागतेच पण डजनभर भाषा दिवस भरात कानावर पडत असतिल तर खरचं तुमची लेकर इंग्रजी शिकतात? इंग्रजीच्या हट्टापायी आपण धड मराठी निट शिकवतोय,ना इंग्रजी.तुम्ही तुमच्या लेकरांना इंग्रजी शाळेत घालू नका अशे माझे मत नाहीच परंतु जर तुम्हाला चांगल इंग्रजी येत आशेल आणि शाळेत खरोखर इंग्रजी शिकवल,बोललं जात अशेल तर नक्की घाला. आज जिकडे तिकडे इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे.भू-छञाप्रमाणे गल्लोगल्लीत इंग्रजी शाळांचे दुकान सुरु आहेत.दर्जा अन गुणवत्ता शोधूनही दिसत नाही.ज्यांच्या भरवशावर आपण आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतोय त्या शिक्षकांनाच इंग्रजी येत नाही.शंभरातून नव्वद शाळेत हिंदीचा सर्रास वापर केला जातो.यामुळे इंग्रजी तर येतच नाही परंतु मराठीची माञ वाच लागते.इंग्रजी शिकण ही काळाची गरज आहे परंतु दर्जा कुठय? या वेडापायी मराठी धोक्यात आहे हे आपल्या लक्षातच नाही.poetddl.blogspot.com
    सगळा खोटा दिखावा अन खोटी प्रतिष्ठा.फक्त बोंबा मारायच्या मराठीचे अस्तीत्व धोक्यात आहे.मराठी टिकली पाहिजे,रुजली पाहिजे.  परंतु हे आमचे काम नाही तुम्ही करा!फक्त लेखक आणि साहित्य कारांणिच का मराठी टिकविण्याचा ठेका घेतला आहे का?भाषा टिकविण्यासाठी समृद्ध करण्यासाठी ती प्रथम बोलली गेली पाहिजे,लिहीली गेली पाहिजे.आज इंग्रजी व हिंदी भाषेने मराठी भाषा गिळंकृत केली आहे.आमच्या मराठी सिने निर्माते  व कलाकारांना मालिकांची नाव मराठित सुचत नाहीत वाटतं?हिंदीत मराठी मिसळुन नावांची नविनच पद्धत सुरु केली आहे.आमचा ओढा हिंदी मालिका व सिनेमांकडे जास्त आहे.हे आमच्या चिञपटांना प्रेक्षकच मिळत नाहीत.परंतु हे चिञ मागिल काहि दिवसांपासुन बदलत आहे.अभिमानाची गोष्ट आहे.मागणी तशी पुरवठा होत नसल्याने आजचा युवा वर्ग इंग्रजी व हिंदीच्या प्रेमात पडत आहे.
मराठी बोलणारे,लिहीणारे वाचणारांची संख्या दिवसेंदिवस कमि होत चालली आहे.आधुनिक तंञज्ञानाच्या युगात मराठीचे अस्तीत्व धोक्यात आहे.मराठी फक्त घरापुरतीच मर्यादित होत चालली आहे ती पण आर्धवट.तरुण पिढीला मराठिची लाज वाटायला लागली आहे.ही धोक्याची घंटा आहे.साहित्य संमेलनात मराठि भाषेच्या संवर्धनासाठी नेमके काय करतात हा संशोधनाचा विषय आहे.आसुद्या टिका करायला आम्ही येव्हढे मोठे नाहीत.मनाला वाटलं म्हणुन मनं हलकं करऩ्यासाठी लिहील. एक माञ नक्की आम्ही आहोत मराठी पण टाळतो मराठी.
  जगभरातिल सर्व मराठी जनांना मराठी राज्यभाषा दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा.मराठी बोला,मराठी लिहा व मराठी वाचवा येव्हढीत इच्छा.

   ब्लॉगर
दत्ता ढाकणे-बावीकर
9867062398
Poetddl.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस