अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

      ॲक्सिडेंटल हॉलिडेज...!
                  - दत्ता ढाकणे-बावीकर

      सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिट झाली आहेत. मी आत्ताच झोपेतून उठलोय आणि नेहमीप्रमाणे  माझ्या घराच्या गॅलरी बसलोय.आज मला समोरचे चिञ निराळे दिसत आहे. रोज पहाटे चार वाजता उघडणारे आमच्या सोसायटीचे गेट आज सात वाजत आले आहेत तरी बंदच आहे. कोंबडा हरवण्याचा आवाज येतोय लोक्स अजूनही साखर झोपेतच असावेत कदाचित. निरव परंतु भितीदायक  शांतता जाणवत आहे. वातावरणात जरासा गारवा आहे. तरिही दररोज  जॉगींग करणारे लोक्स नाहीत, दूर दूर कुठेच माणसं दिसत नाहीत. अजिबात गोंगाट नाही लेकरांचा रडण्याचा हे आवाज नाही . ज्याप्रमाणे पूर्वी कडक शिस्तीचे गुरुजी वर्गात छडी घेऊन येताना दिसल्यावर जसा वर्ग चिडीचूप होत असे तसा समोरचा परिसर चिडीचूप वाटत आहे. आज दूधवाला  दिसत नाही, पेपर वाल्याच्या सायकलचा ट्रिंग ट्रिंग आवाजही येत नाही. आज रविवार  खवय्यांचा खास दिवस असूनही  ' मावरं घे ग, ताई मावरं पाहिजे का ग!' असा आवाज ऐकायला येत नाही. गाड्यांची तर अजिबातच वर्दळ नाही  साधी मोटर सायकल रस्त्यावर धावताना दिसत नाही, धडधडणाऱ्या लोकल गाड्यांचा ही अजून आवाज आला नाही. आमच्या सोसायटी च्या समोर वागरी समाजाची वस्ती आहे पहाटेपासून सुरू होणारा त्यांचा गोंगाट आणि कोलाहल आज अजिबात ऐकायला येत नाही.                         आज   वातावरणात स्तब्धता आणि स्मशान  शांतता जाणवत आहे.
       समोरच्या बिल्डिंग वर  काही कबूतर गुटूर गू...गुटूर गू! करत आहेत जणू काय ते शांतता संदेश देत आहेत. चिमण्या व कावळे उडताना दिसत आहेत नेहमी कानावर न  पडणारी त्यांची चिव चिव... व काव काव.. , आज स्पष्टपणे कानावर पडत आहे. सिमेंटच्या जंगलातला हा  पक्षांची किलबिल आज  प्रथमच ऐकायला मिळातेय. माणसांच्या वर्दळीत बिचार्या पशु पक्षांचा आवाज दाबला गेला होता. आज तो दाबलेला आवाज वाढला आहे.
      मी आता बाल्कनीतून उठून हॉलमध्ये आलो आहे. टीव्ही सुरू करण्याचा विचार करतोय परंतु ही नीरव शांतता भंग करण्याचे धाडस होत नाही. पण मला आता ही संधी सोडायची नाही.कारण रूपाली टेरेसवर योगा करतेय, आर्यवीर आणि ऋत्वा अजुन झोपेतच आहेत तर मी न्यूज पाहण्याची संधी कसा सोडेल? टीव्ही सुरू केलाय प्रत्येक न्युज चॅनलवर जनता कर्प्यू च्या ब्रेकिंग न्यूज झळकत आहेत. देशातील प्रत्येक लहान-मोठी शहरे ओस पडलेले दिसत आहेत. रस्ते ,मार्केट, हायवे सुनसान आहेत .नेहमी गजबजलेल्या शहरात आज स्वयं घोषित आणिबाणी लागली आहे.  आज सर्वञ लॉक डाऊन परिस्थिती  दिसत आहे.
     आजचा दिवस मला ऐतिहासिक व चमत्कारिक वाटत आहे.  देशांमध्ये आज पर्यंत अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्या अहेत, काही थोर पुरुषांचे मृत्यू ही झाले आहेत. आनेक आंदोलने झाली असतील सार्वजनिक  संप,भारत बंद पुकारले गेले आहेत. परंतु माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यात मी एवढा कडकडीत बंद आणि असे लॉक डाऊन प्रथमच पाहत आहे. 
      मुंबईसारखे शहर 24 तास घड्याळाच्या काट्यावर  सुरु  असते तेथे आज शुकशुकाट दिसत आहे.पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर सांगली, सातारा, नाशिक या ऐतिहासिक शहरात ऐतिहासिक शांतता दिसत आहे .ग्रमीण भागातही   तणावपूर्ण दहशती सारखी शांतता जाणवत आहे. देऊळ,मशीदी बंद झाली आहेत.एरवी मंदिर,मशिदी बंद करण्याची कुणाची एवढी हिंमत?नंग्या तलवारी नाचल्या असत्या,मुडदे पडले आसते,आग लागली असती.
    परंतु  आता तशे तर मुळीच घडणार नाही.कारण आता देव देव्हाॅर्यात राहिलाच नाही. या जगरहाटी ला ठप्प करण्याची एवढी कोणाची   हिम्मत? अवघ्या  विश्वाला दहशतीखाली ठेवण्याची, घरातून बाहेर न पडण्याची धमकी देणारा ,हजारो लोकांच्या मृत्यू ने  आपले हात धुवून  घेऊन घेणारा हा एक सूक्ष्मजीव आहे यावर आपल्याला  विश्वास ठेवावाच लागेल.  हा साधासुधा विषाणू नसून हा भयानक जीवघेणा आजार आहे.
    आजपर्यंत जगभरात हजारो लोकांचे प्राण घेणार्‍या या विषाणूचे नाव मात्र रोमँटिक आहे. बालकापासून ते शंभर वर्षाच्या वयस्कर लोकांच्या तोंडावर आज एकच नाव आहे "कोरोना व्हायरस " CoRONA VIROUS . या कोरोना व्हायरसने लोकांना वेड लावले आहे  अनेकांचे रोजगार बुडाले तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आर्थिक मंदीचे सावट घोंगावत आहे. हा व्हायरस मानव जातीवर  आपला सूड उगवतोय.  हात धुऊन मागे लागला आहे .
   अजून आमचा आवी  आणि पीहू झोपेतून उठले नाहीत. मागील काही दिवसांपासून त्यांची गुड मॉर्निंग हात धूण्यानेच होते .आता हात धूण्यासाठी त्यांना ओरडावे लागत नाही . दिवसातून अनेक वेळा हात आणि पाय स्वच्छ करत असतात. 'हम आपके लिए बिस सेकंड रुकेंगे' ही  जाहिरात लागताच आमची पिहू ' चला चला हात धुवा' म्हणत बाथरुम मध्ये जाऊन हात धुवून येते.
     सध्या आमचा आवी खुशीत आहे. परीक्षाही रद्द तर अभ्यासालाही सुट्टी. आणि आई-बाबा आता रोज घरीच असतात रोज नवीन खेळ आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आई छान छान ड्रॉइंग शिकवते. बाबा आता रोज सोबत नविन नवीन खेळ  खेळतातआणि अधून मधून मोबाईलही मिळतोय आणि  टीव्हीवर मोटू पतलू जोरात सुरू आहे त्यामुळे स्वारी खुश आहे. परंतु आता बाबांसोबत स्टेशनला आणि गार्डनला जायला मिळत नाही आणि काकींच्या घरी खेळायला  जायला आई-बाबांनी बंद केले आहे त्यामुळे आमची पिऊ जरा चिडचिड करते. आता तिलाही मोबाईल किंवा आईचे मेकअप किट हवे असते.
    मित्रांनो  तुमच्या घरातही यापेक्षा काही वेगळी  परिस्थिती नसेल.  या जीवघेण्या कोरोना व्हायरस मुळे प्रत्येक व्यक्तीचे जगणेच बदलले आहे.poetddl.blogspot.com लोकांचे दैनंदिन जीवन बदलून गेले आहे. लोक सध्या भितीच्या व तणावपूर्ण वातावरणात जगत आहेत. परंतु एक मात्र नक्की लोक्स आता स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला लागले आहेत, लोक आपल्या घरी वेळ पोहोचत आहेत, विनाकारण गर्दी करत नाहीत.काही  चांगल्या गोष्टी  घडत आहेत. तरीही आपण त्याला वरदान म्हणू शकत नाही हा मानव जाती मागे  हात धुवून लागलेला भयंकर रोग आहे.   मित्रांनो आता आमची पिहू उठली आहे ,हँड वॉश करायला गेली आहे, तिने डेटॉल ची आख्खी बाटली  हातावर ओतून  घेण्या  अगोदर मला तिच्याकडे  पोहोचायला हवं नाहीतर घरातील शांतता भंग झालीच म्हणून समजा. मित्रांनो! तुम्ही काळजी घ्या नियमित  हात स्वच्छ ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा  आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा  संयम ठेवा आपण सर्वजण मिळून या जीवघेण्या  कोरोना व्हायरस  चा मुकाबला करूया. काही दिवस आपल्याला संयम ठेवावा लागेल. काही गोष्टींना आवर घालावा लागेल, घरात थांबून राहावे लागेल.अफवांना बळी पडू नका, घाबरुन जाऊ नका .प्रशासनाला सहकार्य करा स्वतःच्या कुटुंबाची आपल्या लहान लेकरांची काळजी घ्या  सध्या सुट्टीचे दिवस आहेत हे सुट्टी आपला इंजॉय करण्यासाठी नसून आपल्या आरोग्याची जीविताची काळजी घेण्यासाठी आहे. करोना बाधित रुग्णांची संख्या  दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  माननीय पंतप्रधान मोदीजींच्या  आव्हानाला साथ देऊन आपण आज  जनता कर्फ्यू पाळत आहोत,   कदाचित यापुढेही  काही  दिवस आपल्याला असेच स्वयंस्फूर्तीने होम क्वारंटाइन म्हणून राहण्याची वेळ येऊ शकते. आपल्याला याची मानसिक,शारिरीक  व भौतिक तयारी ठेवावी लागेल.  काही गोष्टींवर नक्कीच मर्यादा येणार आहेत .आपल्या सहन करावा लागेल. आपल्याला  संयम ठेवावा लागेल.  आपण जर एकमेकांना सहकार्य करून घरातच थांबलो गर्दी केली नाही तर नक्कीच आपण या कोरोना  व्हायरस वर मात करू. हे संकटाचे दिवस नक्कीच दूर होतील अशी आपण आशा करूया आता मी थांबतो. 'आम्ही घरी राहणार कोरोना ला हरवणार'! असा निर्धार करुया.

आवडला तर नक्कीच शेअर करा

दत्ता ढाकणे-बावीकर
9867062398
Poetddl.blogspot.com

टिप्पण्या

  1. How To Make Money From Betting In Texas
    The Texas State University is one choegocasino of the few sportsbooks to offer betting 메리트 카지노 in Texas, งานออนไลน์ and they're doing so with a strong reputation. You can bet online

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

डेमॉस्थेनिस