दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज!

  भगवान गडावर दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज!

--दत्ता ढाकणे-बावीकर

       मागील काही दिवसांपासून भगवान गडावरील दसरा मेळाव्या विषयी ज्या उलट-सुलट बातम्या येत आहेत त्या ऐकुन सामान्य माणसांच्या मनाला वेदना होत आहेत.दसरा मेळावा होणार की नाही?पंकजा ताई गडावर येतिल की नाही? ताईंचे भाषण होईल कि नाही? दसरा मेळाव्याला विरोध कुणाचा? की या फक्त आफवा आहेत?अशे आनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मागिल ताळीस वर्षापासुन दसरा मेळावा आणि स्व.गोपिनाथ मुंढे साहेबांचे आतूट नाते होते.संत भगवान बाबांच्या आशिर्वादाने मुंढे साहेबांनी सामान्य,गोरगरिब,बहुजन समाज्याच्या कल्यानाचे स्वप्न पाहीले व सत्ता त्यांच्या पायाशि आणून ठेवली.सध्याची तरुण पिढी त्यांचे विचार ऐकत ऐकत मोठी झाली.मुंढे साहेबांनी आपल्या नेतृत्व व वक्तृत्व कौशल्याने लोकांना राजकिय व सामाजिक संस्कार दिला.ज्या प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा त्याच प्रमाणे भगवान गडावरिल दसरा मेळाव्याची परंपरा.बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात मराठी व हिंदूत्वाची आस्मिता जागी केली त्याच प्रमाणे भगवान गडावर मुंढे साहेबांनी बहूजन समाजाची दबलेली अस्मीता जागी केली.एकतेची शक्ती व भक्तीचा मेळ घालून आठरा पगड जातींना एकतेच्या मुठीत बांधून सत्तेचा मार्ग तयार केला. समाजाला योग्य मार्ग दाखविला.ज्या प्रमाणे संत भगवान बाबांनी रंजल्या गांजलेल्या गोरगरिब जनतेला भक्ती मार्ग दाखविला व वाईट अऩिष्ठ प्रथा बंद करुन जमाज जाृतिचे कार्य केले त्याच प्रमाणे मुंढे साहेबांनी जनतेला सत्तेच्या माध्यमातून प्रगतिचा मंञ दिला. साहेबांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्याला प्रचंड जनसमुदाय भगवान गडावर जमा होत अशे.साहेबांचे विचार ऐकून लोकांचे मनं प्रफुल्लीत होतं.अन्याय,अत्त्याचारा विरोधात लढण्याची ताकत मिळत अशे.साहेबांनी कधिच जातीभेद केला नाही वंजारी व अठरापगड जातिच्या ऊसतोडणी मजुरांसाठी भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे हे अविभाज्य नाते होते.poetddl.blogspot.com
        श्रद्धेने दसरा मेळाव्याला येणाऱ्या भाविकांना गोपीनाथरावांच्या मार्गदर्शनातुन अतुलनीय उर्जा लाभत असे.गडाचे वैभव असलेले गोपीनाथराव, गडाच्या विकासासाठी कटिबद्ध होते.1972 पासुन गडावर भक्त म्हणून येणार्‍या मुंडेसाहेबांवर गडाच्या भाविकांनी जीव ओवाळून टाकला.गोपीनाथ मुंडे यांचा दसरा मेळावा ही एक परंपरा झाली. गडाचे विश्वस्त असलेल्या गोपीनाथरावांनी आगामी राजकीय वाटचालीचे सुतोवाच भगवानगडावरून करण्याने गडाच्या अनुयायांना आनंदच व्हायचा.राजकीय विरोधकांनी मुंडे यांना अडचणी निर्माण करण्यासाठी गडावर येऊन राजकारण करू पाहता त्यांना धडा शिकवणारे भगवानबाबांचेच अनुयायी होते, कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. माळी,मराठा,धनगर,दलित इत्यादी समाजातील गोरगरिब,दिनदुबळ्या जनतेला जागृत करण्याचे कार्य दसरा मेळाव्याच्या माध्यमातुन साहेबांनी केले.भगवान गडाचा राजकीय वापर त्यांनी कधि केला नाही.माञ ''सत्तेच्या माध्यमातुनच तुमचा विकास शक्य होईल, आणि सत्ता हवी आशेल तर राजकिय ताकत निर्माण करावि लागेल,त्यासाठी तुम्हाला एकजूट व्हावे लागेल'' असे ते जनतेला आवाहण करत.भगवान बाबांच्या गादीचे पाविञ्य त्यांनी कायम जपले, गादिचा वारसा चालविणारे संत भिमसिंह महाराज व महंत नामदेव शास्ञिंच्या पायवर ते नेहमी नतमस्तक होत.
      गोपीनाथ मुंढे साहेबांनी जिवाचे रान करुन समाजाची एक मुठ बांधली होती.दिन दुबळ्या कष्टकरी समाजाला सत्तेची स्वप्न दाखविली होती.त्यांच्या हयातित त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता तरिही त्यांनी न डगमगता बहूजन समाजाला सत्तेच्या प्रवाहात आणले होते.दुर्दैवाने त्यांचे  (अप-घाती )अकालि निधन झाले.बहूजन वंजारी समाजाबरोबरच बहुजन समाज दुखात बुडाला त्यांना सावरण्याचे मोठे काम पंकजा ताईंनी केले व त्यांच्या दारात सत्ता आणून ठेवली.ताईंची लोकप्रियता व वाढत आसलेली राजकिय ताकत काहि लोकांना डोळ्यात खुपत आहे.मुंढे साहेबांच्या अपघाती निधनाने मुंढे यांचा विचार व मुंढे गट संपुष्टात येईल अशि अटकळ काही विरोधकांनी व घरातिल लोकांनी बांधली होती परंतू त्यांचे मनसूबे सफल झाले नाहीत.उलट पंकजा ताईंनी सत्ता खेचून आणली.हे काही नतदृष्ठ मंडळींना पाहवत नाही म्हणूनच  पक्षातिल व पक्षाबाहेरिल विरोधक पंकजा ताईंच्या लोकनेतृत्वाला शह देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आडचणि निर्माण करत आहेत. ताईंचे नेतृत्व आडचणित  आणल्यास बहूजन समाजात विभागला जाईल व ताईंची राजकिय ताकत क्षिण होईल म्हणूनच ताईंवर वेळोवेळी कधित आरोप केले जात आहेत.ताईंच्या विरोधात पेड न्यूज चालवल्या जात आहेत.
     आता तर काही समाज कंटक समाजाच्या श्रद्धेवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत.काही नतदृष्ट लोकांना हाताशि धरून  भगवान गडावरिल दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.आशे झाल्यास समाज्याची खुप मोठी हानी होणार आहे.गोपिनाथ मुंढे साहेबांमुळे वंजारी व बहूजन समाज एकसंघ झाला होता.एक मोठी राजकिय ताकत निर्माण झाली होती.दसरा मेळाव्याच्या माध्यमातून समाज जागृतिचे कार्य होत अशे,समाजामध्ये एक प्रेरणा व उर्जा निर्माण होत असे.पंकजा ताई मुंढे यांच्याकडे ही मुंढे साहेबा प्रमाणे नेतृत्व व वक्तृत्व गुण आहे.गोरगरिब बहूजन समाजाने त्यांचे नेतृत्व स्विकारले आहे. परंतू काही लोक समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.पडद्यामागे खुप मोठे कारस्थान रचले जात आहे.
    सध्याच्या नाट्यामागे गत जानेवारी मध्ये धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर अनुयायांच्या तीव्र रोषाचा केलेला सामना व त्यानंतर धनंजय मुंडे समर्थकांनी महंत नामदेव शास्त्रींचे गावोगावी जाळलेल्या पुतळे याचीही पार्श्वभुमी आहे. गडाच्या विश्वस्त मंडळावरील गोपीनाथ मुंडे यांच्या रिक्त स्थानी पंकजा मुंडे यांना घेण्यास गडाच्या सचिवांनी विरोध करून पुर्ण विश्वस्त मंडळाचीच पुनर्रचना करण्याचे धाटले आहे.  गडाची कन्या म्हणून ज्या न्यायाचार्यांनी पंकजांचा गौरव केला त्याच गडाच्या कन्येला अव्हेरण्याची घाई शास्त्रींनी सचिवांच्या दबावात किंवा मोठ्या दक्षिणेच्या अमिषाने केली काय? असेही बोलले जात आहे. बबनराव ढाकणे, फुलचंद कराड  यांना जे साध्य झाले नाही ते मी करून दाखवले अशा खाजगीत वल्गना करणाऱ्या गडाच्या सचिवांचा बोलविता धनी त्यांच्या "सकाळ" समुहाशी संबंधित असु शकतो असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. बारामतीच्या दरबारात भगवानगडचा नजराना पेश करण्याचा विडा ऊचललेले गडाचे हे अफजलखान त्यामुळेच जनभावनेला पायदळी तुडवुन दसरा मेळाव्याचा आवाज बंद करण्यासाठी डोके फोडण्याची भाषा करत आहेत.गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीत त्यांच्या माणसांना फोडण्याचे राजकारण करणारे पवार कुटुंबीय आता भगवानगडासारख्या प्रतिकांनाही गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीपासुन वेगळं करण्याचे हे षडयंत्र आहे काय? अशीही चर्चा राज्यातिव अनुयायांमध्ये होत असुन त्यांच्या तीव्र रोषाचा सामना गडाच्या महंताला व पदाधिकारी मंडळींना करावा लागेल अशी चिन्हे आहेत.
     समाज बांधवांनो आपनास  कळकळिचि विनंती आहे की,भूलथापांना बळी पडू नका,ताईंना समस्या निर्माण होईल अशे वर्तन करु नका.आत्ताच वेळ आहे योग्य विचार करण्याची लबाडांना साथ द्यायची कि ताईंना!.ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही त्यांना लाल दिवा मिळतोय फक्त ताईंना संपविण्यासाठीच.ज्या लोकांना वंजारी व बहूजन समाचा विकास नको आहे अशे काही राजकिय नेते धनंजय मुंढे व पंकजा ताई मुंढे यांच्यात समाजाची विभागणि  करु पाहत आहेत.एकदा समाजाचे टूकडे पाडले की नेतृत्व संपुष्ठात येईल व वंजारी तशेच बहूजन समाज पुन्हा मागास ठेवण्याची ही काही लोकांची धारणा आहे.दलित समाज्याची जी गत केली तिच गत वंजारी  समाजाची केल्यास राजकिय ताकत संपुष्ठात येईल .अशाने आपला समाज पुन्हा पन्नास वर्ष मागे जाईल.म्हणूनच आपली शक्ती ताईसाहेबांच्या सोबत आसुद्या.ताईंची सर कोणालाही  येणार नाही.ताईंनी सत्तेत आल्यावर कामाचा धडाका लावला आहे.बीड जिल्ह्या बरोबरच महाराष्ट्राचा सर्वांगिन विकास ताईच करतिल.ताई एक दिवस मुख्यमंञी नक्कीच होतिल.आपल्या समाज्याचा विकास होऊ नये आपन ऊसतोडणिच करावी अशे काहिंना वाटत आहे तेच लोक आपले नेतृत्व संपवायला निघाले आहेत.सध्या जे लोक ताईंना टार्गेट करत आहेत त्यांचा वापर करुन घेतला जात आहे.त्यांनी त्यांचा स्वाभिमान गहान ठेवला आहे.मुंढे साहेबांचे व भगवान बाबांचे नाव घेऊन हे लोक घाणेरडे राजकारण करत आहेत.त्यांची मती गेली आहे.माती होण्यास वेळ लागणार नाही.आपन सर्व  जाणते अहात. ज्यांनी मुंढे साहेबांना छळले ते समाजाचे काय भले करणार? अशा लोकांसाठी आपन आपली शक्ती वाया का घालावी?
     भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा अखंड सुरु राहणे हेच समाजाच्या हिताचे आहे,ती एक सामाजीक व वैचारिक गरज आहे ,दसरा मेळावा हा एक विचार आहे,समता,एकता व सामाजिक शक्तीचा स्ञोत व सत्तेचा राजमार्ग म्हणजे दसरा मेळावा आहे.गोपिनाथ मुंढे साहेबांनी मोठ्या संघर्षाने जे कमवले ते आपल्याला गमवायचे नाही.आपन संपुर्ण ताकतिनिशी पंकजा ताईंना पाठबळ देऊन आपले नेतृत्व बळकट  करुया. व दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून विचारांचे सोने लूटुया.चला दसरा मेळावा यशस्वी करुया, ताईंना साथ देऊया,साहेबांचे स्वप्न साकार करुया!

श्री.दत्ता ढाकणे-बावीकर
शिक्षक/कवि
ता.शिरुर जि. बीड
poetddl.blogspot.co
9867062398

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Principles of Outstanding Classroom Management

The Rage of young Teachers and Government Employees.