पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सी एस आर फंड शाळा विकासातील आधारस्तंभ

इमेज
सी एस आर फंड शाळा विकासातील आधारस्तंभ  शाळा म्हटली म्हणजे तेथे शिकण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या आवश्यक असतात मग त्यामध्ये पुस्तकं, वह्या, दप्तर, लेखन साहित्य , शाळेसाठी लागणारे इतर साहित्य जसं मुलांसाठी , बेचं , कपाट  ,पंखे  टीव्ही , प्रोजेक्टर अशा अनेक वस्तूंची शाळेत आवश्यकता असते , ज्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी व शाळेच्या विकासासाठी हातभार लावत असतात . शहरी भागातील मोठमोठ्या शाळांमध्ये हा निधी फिच्या माध्यमातून उभारला जाऊ शकतो . तसच आपल्याकडीलही काही मोठ्या शाळांमध्ये हा निधी सहज उपलब्ध होतो . परंतु मराठी शाळा विशेषतः जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये शासनाकडून येणाऱ्या निधीमधून या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही . मग अशासाठी ह्या शाळांना आधार वाटतो, गुणवत्तेसाठी आधारस्तंभ ठरतो तो लोकसहभाग यातून जमा झालेला फंड म्हणजेच सीएसआर फंड , आमची जिल्हा परिषद शाळा नवघर आज गुणवत्ता पूर्ण झालेली आहे , सर्व सुविधांनी सज्ज झालेली आहे . आनंददायी वातावरण आहे सर्व साहित्याने परिपूर्ण आहे हे कशातून घडलं तर या सीएसआर फंडातूनच . पालकांशी साधलेला संवाद, व

मी तिरंगा बोलतोय....

इमेज
मी तिरंगा बोलतोय..... झेंडा उँचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा... असे गीत तुम्ही मुले उत्साहाने गात असता. हे गीत ज्याच्याविषयी तुम्ही गाता तोच तुमचा तिरंगा, राष्ट्रध्वज आहे मी! मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय. आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे. सर्व भारतीय  माझा आदर करतात.       बाल मिञांनो! या वर्षी आपण स्वातंञ्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.देशात स्वातंत्र्याचा उत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. लहान- थोर सर्वांच्या मी मना-मनात आहेच परंतु  आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी 'हर घर तिरंगा' हे अभियान सुरु केल्यामुळे  आता मी प्रत्येक भारतीयांच्या घरा घरात पोहचलो आहे. यामुळे मी अतिशय आनंदात आहे.         बाल मिञांनो!माझी डिझाइन पिंगली वैंकया यांनी तयार केली आणि 22 जुलै 1947 रोजी पार पडलेल्या संविधान सभेत मला मान्यता देण्यात आली. त्याग , शांतता आणि समृद्धी चे प्रतिक असणारे तीन  रंग व त्यावर मधोमध शोभणारे अशोक चक्र यामुळे मी दिमाखदार दिसतो आणि तसा