पोस्ट्स

नोव्हेंबर ७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

त्या वृत्तीचा शिक्षकांमध्ये तिव्र संताप

त्या वृत्तीचा शिक्षकांमधे तिव्र संताप सफाळे दि.8. मास्तरड्यांनो काम केले तर मराल काय? या शीर्षकाखाली संपादकीय लेख प्रसिद्ध करणाऱ्या एका तथाकथित वृतपञाच्या संपादका विरोधात राज्यातील शिक्षक तिव्र संताप व्यक्त करत असून व संपादकाच्या मनोवृत्तीचा निषेध करत आहेत.       या विषयी सविस्तर माहिती अशी कि राज्य शासनाने शिक्षकांना दिवाळीच्या सुट्ट्या वाढवून देण्याचा शासन निर्णय पारित केला आहे यामुळे शिक्षकांमधे आनंदाचे वातावरण आहे परंतु काही शिक्षक विरोधी वृत्तींना ही गोष्ट पचली नाही. यामुळे त्यांचा तिळपापड झाल्यामुळे ते शिक्षकां विरोधात खालच्या भाषेत टिका करत आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथील एका स्थानिक वृत्तपत्राने केला आहे.    आपल्या संपादकीय लेखात शिक्षकां विरोधात आगदी खालच्या दर्जाची भाषा वापरुन टिका केली आहे. शिक्षकांचा मास्तरड्या असा उल्लेख करुन 'काम केले तर मराल काय?'या शीर्षकाखाली लेख लिहीला . त्यामध्ये '... तुम्ही सरकारचे जावाई अहात काय?हत्ती च्या कानातून उतरले काय,सगळं जग म्हणतंय काम हवंय आणि तुम्हाला कशाला रे सुट्ट्या?मास्तरड्यांनो जरा जास्त काम केले तर मराल काय?' अशा