पोस्ट्स

डिसेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वर्ष नवे! संकल्प जुनेच.....

इमेज
      वर्ष नवे ! संकल्प जुनेच....सतराच्या सतरा तऱ्हा       सरले ! आणखी एक वर्ष सरले! कसा काळ गेला काहि कळलेच नाही, या एका वाक्यात २०१६ चे वर्णन करावेशे वाटते.२०१७च्या पुर्व संधेलाआम्ही मावळतीकडे तोंड करुन उभे होतो.साश्रु नयनांनी नाही परंतु जड हताने आम्ही सरत्या २०१६ला निरोप देत होतो.तो आस्ताला जानारा सुर्य नारायण आमच्याकडे लाल भडक नजरेने पाहत होता.जरासा रागावलेला दिसत होता.येरवी येवढा लालबुंद झालेला तो आम्ही पाहिला नव्हता?की आमचे त्याच्याकडे लक्षच नव्हते? कधि उगवायचा अन कधि मावळायचा?आम्ही कशाला त्याच्याकडे लक्ष दिलयं? दररोजच्या जगरहाटीत आमचे त्याच्याकडे जरा दुर्लक्षच झाले होते.तो त्याच्या दिनचक्रात व्यस्त आम्ही आमच्या दिनक्रमात मग्न.      ...घटिका भरली ,तो बुडाला,२०१६चा आंत झाला.सृष्टीवर काळोख पसरला.असंख्य लोकांप्रमाणे आम्हीही नविन वर्षाच्या पुर्व संध्येला  मनातली मनात नवे नवे संकल्प करत राञ होण्याची वाट पहात होतो.आणि आश्चर्य ! आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.आमचे मन फ्लँशबँकflashback मध्ये गेले.थेट मागच्या वर्षिची थर्टी फर्स्ट ची राञ आठवली.तेव्हाही आम्ही आगदी आनंदात जुन्या वर्षाला ल

दुष्काळ पाण्याचा अन विचारांचा!

इमेज
दूष्काळ इथेही अन तिथेही                   दूष्काळ आवकाळी अन सुलतानी         पाण्याचा अन विचारांचा खालपासुन वरपर्येंत दुष्काळ! या देशात गरिब अन विचार रोजच मरतात दोघांनाही वाली नाही आक्रोश करतात मरणारे मरतात गरिबाच्या पदरात पडतच काय! योजना येतात उपयोग काय? कागदी घोडे नाचून जातात खानारे खातात अजिर्ण होइपर्येंत पेपरच्या गठ्ठ्यात सगळे आलबेल आहे विचारांचे माञ मुडदे पडलेत दूष्काळातल्या गुराढोरांसारखे विचारवंतांना सुगीचे दिवस आलेत कोण काय बोलतय कोण काय छापतय टीआरपी च्या दिवसात काहिही खपतय सकाळी घडलेल संध्याकाळी बिघडतयं भ्रष्टाचार अन बलात्काराचा सुकाळ आहे माञ देऊनच टाका स्वतंञ्य भ्रष्टाचार अन बलात्काराचे दोन्हीही दिवस राञ सुरुच आसतात राजरोसपणे भारत अन इंडिया कधिच वेगळे झालेत पुन्हा एकदा फाळणि झाली समनजलेही नाही कोण जिना कोण गांधी कळलेही नाही कसली जात अन कसला धर्म आम्हा एकवेळच्या खान्याची भ्रांत दुष्काळी आमचा प्रांत सहिष्णुतेच्या पुजाऱ्यांने जरा आमच्या दावनिला पहा मुके जनावर लाहीलाहि करुन मरत आहेत जगाचे पोशिंदे फासावर चढत आहेत आम्ही शेतकरी हाडाची काड अन पोटमारा कर

बालगीत - चँऊ मँऊ....

इमेज
कविता -  चँऊ मँऊ....        चँऊ मँऊ चँऊ मँऊ      थोडासा खाऊ       मला देना ताऊ       चँऊ मँऊ... डब्यातले लाडू चिवडा काढू आईची परवानगी आगोदर घेऊ    चँऊ मँऊ...    चिंचा बोरे   आवळा पेरु    रानात आपन फिरायला जाऊ चँऊ मँऊ... द्राक्षे केळी आंबा चिक्कू एक सफरचंद रोज खाऊ चँऊ मँऊ...      दाळ भात      चपाती भाजी      रोज सकाळी दूध पिऊ       चँऊ मँऊ... केक आईस्क्रीम कँडबरी चॉकलेट्स नेहमिच नको दूकानातला खाऊ चँऊ मँऊ...     खुप खेळू     अभ्यास करु     रोज आपन वेळेवर जेऊ    चँऊ मँऊ... लवकर उठू लवकर झोपू तरच आपन निरोगी राहू चँऊ मँऊ...        कवि - श्री.दत्ता ढाकणे -बावीकर                मो.नं.९८६७०६२३९७ >      ईमेल-dldhakne@gmail.com

अनाथांचा नाथ.....गोपिनाथ...

इमेज
मा.गोपिनाथरावजी मुंढे साहेबांना भावपुर्ण आदरांजली....साहेब परत या..सामान्य जनतेला शेतकरी कष्टकऱ्यांना तुमची नितांत गरज आहे -नाथ..........!         नाथ तुझ्या जान्याने  गोदाकाठ हळहळला होता  अनाहुत परिक्रमा अशिही  काळाने घात केला होता.... चार तपाचा संघर्ष फळाला आला होता दिवस चांगले आले होते पण काळाने घात केला होता....  आक्रोशली आनंत ह्रदये  घराघरात दिवा विझला होता  सजली होती हार तुरे  पण काळाने घात केला होता...  ज्याचा धरला हात   तोच सोडून गेला होता   अशि आक्रोशली जनता   जसा बाप गेला होता अनाथांचा नाथ तो बहुजनांचा वाली होता सर्वांचा साहेब तो वंजा-यांचा भगवान होता  महाराष्ट्राचा वाघ तो  दिल्लीत गाठला होता  मैदानात तो हरला नाही  म्हणून गनिमी कावा केला होता     दत्ता ढाकणे-बावीकर poetddl.blogspot.com आदरणिय ,पुजनिय,गोपिनाथजी मुंढे साहेबांना शब्दसुमनाने भावपुर्ण आदरांजली......साहेब आम्ही पोरके झालोत...तुमची या देशाला,राज्याला,जिल्ह्याला,प्रत्येक गावाला ,गावातील लहान थोरांना नितांत गरज होती....साहेब तुम्ही जायला नको होत ....साहेब परत या.

राज्यकर्ते तरुण शिक्षकांचा "आक्रोश" ऐकतिल काय?

इमेज
राज्यकर्ते तरुण शिक्षकांचा ''आक्रोश" ऐकतिल काय!    महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेञात सध्या अस्थिर वातावरण दिसत आहे. आनेक  घटना घडत आहेत  यामुळे शिक्षण क्षेञ ढवळून निघत आहे. पायाभुत चाचणीचा गोंधळ,एनपीआर चे काम,सरल ची डोकेदुखी,संच मान्यतेचे भिजत घोंगडे,आतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न,थकलेले पगार,बदल्यांचा गोंधळ,डीसीपीएस-नविन अंशदायी निवृती वेतन योजनेतील आर्थीक फसवणूक आशे आनेक प्रश्न ज्यामुळे शिक्षण क्षेञात कमालिचा गोंधळ दिसुन येत आहे.    वरिल प्रश्नांपैकी आंतरजिल्हा बदली व डीसीपीएस या अन्यायकारी प्रश्नांवर तरुण शिक्षक( जे २००५ नंतर सेवेत आलेत )खुप आक्रमक होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातिल शिक्षक व इतर खात्यांमधिल कर्मच्या-यांना डी.सी.पी,एस(अंशदायी पेन्शन योजना) लागू होऊन  ३१ऑक्टोबर रोजी दहा वर्ष पुर्ण झालि आहेत.या अन्यायकारी पेन्शन योजनेचा निषेध करण्यासाठी  राज्यातिल शिक्षक व इतर खात्यांमधिल कर्मच्या-यांनी ३१ ऑक्टोबर हा काळा  दिवस पाळला होता.राज्यभर या आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता..शिक्षकांनी तर या दिवशी काळ्या फिती लावून अध्यापन केल होते. जुनी पेन्शन योजना लागू करुन घेतल