वर्ष नवे! संकल्प जुनेच.....

      वर्ष नवे ! संकल्प जुनेच....सतराच्या सतरा तऱ्हा

      सरले ! आणखी एक वर्ष सरले! कसा काळ गेला काहि कळलेच नाही, या एका वाक्यात २०१६ चे वर्णन करावेशे वाटते.२०१७च्या पुर्व संधेलाआम्ही मावळतीकडे तोंड करुन उभे होतो.साश्रु नयनांनी नाही परंतु जड हताने आम्ही सरत्या २०१६ला निरोप देत होतो.तो आस्ताला जानारा सुर्य नारायण आमच्याकडे लाल भडक नजरेने पाहत होता.जरासा रागावलेला दिसत होता.येरवी येवढा लालबुंद झालेला तो आम्ही पाहिला नव्हता?की आमचे त्याच्याकडे लक्षच नव्हते? कधि उगवायचा अन कधि मावळायचा?आम्ही कशाला त्याच्याकडे लक्ष दिलयं? दररोजच्या जगरहाटीत आमचे त्याच्याकडे जरा दुर्लक्षच झाले होते.तो त्याच्या दिनचक्रात व्यस्त आम्ही आमच्या दिनक्रमात मग्न.
     ...घटिका भरली ,तो बुडाला,२०१६चा आंत झाला.सृष्टीवर काळोख पसरला.असंख्य लोकांप्रमाणे आम्हीही नविन वर्षाच्या पुर्व संध्येला  मनातली मनात नवे नवे संकल्प करत राञ होण्याची वाट पहात होतो.आणि आश्चर्य ! आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.आमचे मन फ्लँशबँकflashback मध्ये गेले.थेट मागच्या वर्षिची थर्टी फर्स्ट ची राञ आठवली.तेव्हाही आम्ही आगदी आनंदात जुन्या वर्षाला लाथा मारुन नविन वर्षाच्या स्वागतात गुगंलो होतो.तेव्हा आम्ही मनसोक्त मदधुंद होऊन घोटा गणिक इतरांप्रमाने आनेक कठोर संकल्प सोडले होते.संकल्पांची ब्ल्यू प्रिंटच तयार केली होती म्हणा किंवा वचननामा, जाहिरनामा म्हणा हव तर.पहिला संकल्प आम्ही सोडला होता जो आमच्या प्रगतित बाधा आणत होता तो म्हणजे बापकमाईवर जगायचे नाही,स्वत: कमायचे आणि मजा करायची.तशेत इतर आऩेक संकल्प केले होते जशे की रोज लवकर उठून व्यायाम करायचा,रोज न चुकता डायरी लिहायची, कोणत्याच पोरींकडे वाईट नजरेने पहायचे नाही फक्त कॉलेजातल्या पोरी आपवाद,कट्ट्यावर धूर सोडीत बसण्या पेक्षा दोन पुस्तक जास्तीची वाचायची,बापाच्या पैशाने नेट-पँकpack  मारुन राञंदिवस मिञ-मैञिंनीशी गप्पाchat करत बसायचे नाही,मुलिंची छेड तर नकोच,पानटपरी समोर गुटखा व मावा खाऊन पिचकाऱ्या मारत बसण्यापेक्षा बापाला कामात मदत करायची,दारुला तर स्पर्शही करायचा नाही,कॉलेजला जेवढा खर्च लागतो तेवढेच पैशे बापाला मागायचे प्रँक्टीकल practical च्या नावाखालि बापाचा खिसा रिकामा करुन मजा मारायची नाही,जराशी समाजसेवाही करायची,आळस तर बिलकुलच करायचा नाही,आईबापाच्या रोज पाया पडायचे,  हेल्मेट घालुनच गाडी चालवायची,हाति धरलेले काम वेळेतच पुर्ण करायचे,कामावर वेळेतच पोहचायचे,कधि कुणाला खोटे अश्वासन द्यायचे नाही,रागावर कंट्रोल करायचे,कुटूंबाला जास्त वेळ द्यायचा,विधायक कामात सहभाग घ्यायचा,आडचणित मदत करायची,बचतिची सवय लावायची,नवनविन गोष्टी शिकायच्या,स्वत:च्या कामात नैपुण्य मिळवायचे,  लबाडी कोणाची फसवणूक करायची नाही इत्यादी आनेक संकल्प आम्ही सोडले होते. एखाद्या मुरब्बी राजकिय नेता जशे निवडणुक आल्यावरअश्वासनांची खैरात करतो पण पुर्ण एकही करत नाही.त्या प्रमाणे आम्ही संकल्पामची  खैरात केली होती. वर्षाच्या प्रहरापासुन सगळे संकल्प आगदि बिनबोभाट सिद्धीस लावण्याच्या  शपताही घेत होतो,दोस्त मंडळींशी पैजाही लावत होतो.सर्व संकल्प पुर्ण करुन स्वत:ची प्रगती साधायची पक्की घुनगाठ मनाशी बांधून आम्ही नववर्षाचे सेलिब्रेशन करत होतो.गाठोड भर संकल्प डोक्यावर घेऊन आम्ही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जागरण करत होतो.मागिल वर्षभरातिल आनेक कटू-गोड आठवणिंना ऊजाळा देत आम्ही डोळ्यात ञान आणून बाराच्या ठोक्याची वाट पाहत होतो....आणि आचानक हसण्या खिदळण्याचा आवाज क्षीण होत गेला.हतातला पेला गळाला,धरणिला पाठ टेकली.आम्हाला निद्रेने कवेत घेतले.कधि जुने वर्ष लुप्त होऊन  नवे आले,कधि चौदा सरले अन पंधरा उजाडलं कळलेच नाही.
         ....अचानक जाग आली आम्ही डोळे चोळत झोकांड्या देत आ!! करत उठलो तेव्हा सुर्य नारायन माथ्यावर आले होते.म्हणजे आमच्या डोक्यावर तांडव नृत्यच करत होते.आग ओकत होते .थंडीच्या दिवसातही आम्हाला घाम फुटला होता.सुर्य नारायन आम्हाला जणू विचारत होते ''वारे माणसा! चांगले स्वागत केलेस नव्या सालाचे? संकल्प सोडले होतेस ना?लबाड माणसा तु नाही सुधरणार,ठरवलेस तर काहिही करु शकतोस पण मुलखाचा आळशी आहे.सारे जग नववर्षाच्या स्वागतात रमले असताना तु पेंगत पडलास''.आम्ही जरा डोक्याला तान देऊन काहि आठवण्याचा प्रयत्न केला तर डोक फणफणत होत .कसले संकल्प? काहिच आठवत नव्हतं.फक्त पसारा अस्ताव्यस्त पडलेला दिसत होता.आळस आला होता.काहिच करावेशे वाटत नव्हते...
       आम्ही एका ताज्या वर्षाचे अशा प्रकारे स्वागत केले होते.नविन वर्षे नव्या उमेदिचे,नव्या उत्साहाचे,नवि प्रेरणा देणारे आसते.आणि आम्ही काय केले? पेंगत बसलो.एका वर्षापुर्वी याच क्षणाला   २०१६ची सुरुवात झाली होती.आणि आज शेवट होत आहे.नव्या वर्षाचे संकल्प करावेत आशे शहाणि माणस सांगतात.आम्ही संकल्प केले पण सिद्धीस एकही गेला नाही.आम्हाला प्रश्न पडलाय,काय केले आम्ही वर्षभर?आला दिवस लोटला.दिस येतिल दिस जातिल आम्ही आशेच कधि रे  सुधरणार? २०१७सुरु झालय.यंदाही आम्ही जुनेच संकल्प केलेत.२०१६ हे धोक्याच ठरतयं की मोक्याच येणारा काळच ठरवेल.परंतू एक माञ नक्की वर्ष  नवे संकल्प जुनेच! कधि पुर्ण करणार? जो मनात ठरवलेले संकल्प पुर्ण करिन तोच प्रगती करिल.जो आळसाला मिठी मारुन बसेल त्याच्यासाठी सोळाव वरिस धोक्याचचं आसणार यात शंकाच नाही.तुम्ही सोडून.
   आसुद्या! तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना नववर्ष सुखाचे,समृद्धिचे,आरोग्यमय जावो हिच सदिच्छा.नविन वर्षाच्या मनपुर्वक शुभेच्छा.यावर्षी इतकेच.

    श्री.दत्ता ढाकणे-बावीकर
   शिक्षक,Blog write,Poet
Freelance journalist
पालघर-९८६७०६२३९७
poetddl.blogspot.com
   
       


Happy new year  2017
Happy new year 2017

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस