पोस्ट्स

माझी कविता

कविता न सुचलेली.....

इमेज
कविता--कविता न सुचलेली..... समोर पांढरा शुभ्र उन्हाळ्यातल्या ढगासारखा, रेषा नसलेला कागद नजर शुन्यात,मन माञ कवितेच्या शोधात इकडुन तिकड नुसत्या येरझारा मारत होत मागे हात बांधून स्थळ शोधत असलेल्या पोरीच्या बापा सारख मन कुठ कुठ गेल नाही म्हणून सांगु! मन गावाकडे गेल भुतकाळात डोकावल दिसल्या नुसत्या वाड्याच्या पडक्या भिंती ज्या भिंतीला धरुन आम्ही पावल टाकायला शिकलो गाव माञ होत तसच माणसं माञ बदलेली वाचनालयात कमी पानटपरी समोर पोरं माञ दिसली त्यांना काही सुचत नाही     कारण पाऊस पडत नाही इथे पावसाचा अन शब्दांचाही दुष्काळ आहे मन रिकाम्या हाताने पुन्हा वर्तमानात मन शेतात आल चिखल तुडीत पांदितला पाऊस पडुन गेलेला मानसं शेतावर निघालेली दावनितली गुर सुटलेली शाळेला दांडी मारुन पोर डोंगरावर चाल्लेली आठवलं इथेच सुचलेली पहिली कविता वाहनार्या संथ पाण्यात नदिच्या किनारी त्या चिंचेच्या झाडाखाली पन आज कविता सुचली नाही एकही शब्द सापडला नाही आज शब्दांचा संप आहे की गणपतीची सुट्टी आता मन भविष्य पाहत होत कल्पनेच्या जगात श

डेमॉस्थेनिस

इमेज
डेमॉस्थेनिस ...! बोलणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. काही माणसे इतके सुंदर बोलतात की समोरच्या माणसाला बघता बघता खिशात टाकतात. काही आपल्या मनातील इप्सित समोरच्याला पटवून देतात, काही समोरच्यांवर इतके गारुड घालतात की समोरची व्यक्ती त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होते. ही देणगी आहे उत्तम वक्तृत्वाची.प्राचीन काळीही राजे महाराजे आपल्या सैन्याला युद्धासाठी भाषणातूनच चैतवायचे. अलेक्झांडरचे सैन्य जग जिंकायला निघाले ते त्याने केलेल्या उत्तम वक्तृत्वामुळेच. छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेताना आपल्या सवंगड्यांना आपल्या प्रभावी वाणीनेच स्वराज्याचे स्फुरण चढविले होते. आजपर्यंत झालेल्या सर्व युद्धांमध्ये सेनापतीने आपल्या सैन्याला उत्तेजित केल्यामुळेच ती युद्धे जिंकली गेल्याचे उल्लेख आहेत. आधुनिक काळात उत्तम वक्त्याचे हे गुण राजकारणात लोकांना आकर्षति करण्यासाठी उपयोगी पडतात. मार्टनि ल्युथर किंग यांचे ‘आय हॅव अ ड्रीम’ हे जगप्रसिद्ध भाषण, हिटलर, लेनिन आणि बोल्व्हेशिक क्रांतीतील भाषणे ते स्वामी विवेकानंद यांचे धर्म परिषदेतील अजरामर भाषण हे वक्तृत्व कलेचीच देणगी.भारतीय स्वातंत्र्य

सी एस आर फंड शाळा विकासातील आधारस्तंभ

इमेज
सी एस आर फंड शाळा विकासातील आधारस्तंभ  शाळा म्हटली म्हणजे तेथे शिकण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या आवश्यक असतात मग त्यामध्ये पुस्तकं, वह्या, दप्तर, लेखन साहित्य , शाळेसाठी लागणारे इतर साहित्य जसं मुलांसाठी , बेचं , कपाट  ,पंखे  टीव्ही , प्रोजेक्टर अशा अनेक वस्तूंची शाळेत आवश्यकता असते , ज्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी व शाळेच्या विकासासाठी हातभार लावत असतात . शहरी भागातील मोठमोठ्या शाळांमध्ये हा निधी फिच्या माध्यमातून उभारला जाऊ शकतो . तसच आपल्याकडीलही काही मोठ्या शाळांमध्ये हा निधी सहज उपलब्ध होतो . परंतु मराठी शाळा विशेषतः जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये शासनाकडून येणाऱ्या निधीमधून या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही . मग अशासाठी ह्या शाळांना आधार वाटतो, गुणवत्तेसाठी आधारस्तंभ ठरतो तो लोकसहभाग यातून जमा झालेला फंड म्हणजेच सीएसआर फंड , आमची जिल्हा परिषद शाळा नवघर आज गुणवत्ता पूर्ण झालेली आहे , सर्व सुविधांनी सज्ज झालेली आहे . आनंददायी वातावरण आहे सर्व साहित्याने परिपूर्ण आहे हे कशातून घडलं तर या सीएसआर फंडातूनच . पालकांशी साधलेला संवाद, व

मी तिरंगा बोलतोय....

इमेज
मी तिरंगा बोलतोय..... झेंडा उँचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा... असे गीत तुम्ही मुले उत्साहाने गात असता. हे गीत ज्याच्याविषयी तुम्ही गाता तोच तुमचा तिरंगा, राष्ट्रध्वज आहे मी! मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय. आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे. सर्व भारतीय  माझा आदर करतात.       बाल मिञांनो! या वर्षी आपण स्वातंञ्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.देशात स्वातंत्र्याचा उत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. लहान- थोर सर्वांच्या मी मना-मनात आहेच परंतु  आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी 'हर घर तिरंगा' हे अभियान सुरु केल्यामुळे  आता मी प्रत्येक भारतीयांच्या घरा घरात पोहचलो आहे. यामुळे मी अतिशय आनंदात आहे.         बाल मिञांनो!माझी डिझाइन पिंगली वैंकया यांनी तयार केली आणि 22 जुलै 1947 रोजी पार पडलेल्या संविधान सभेत मला मान्यता देण्यात आली. त्याग , शांतता आणि समृद्धी चे प्रतिक असणारे तीन  रंग व त्यावर मधोमध शोभणारे अशोक चक्र यामुळे मी दिमाखदार दिसतो आणि तसा

महा TET 2021 Answer key.

इमेज
  रविवार 21 नोव्हेंबर 2021 रोजी पार पडलेल्या महाटीईटी परीक्षेतील पेपर 1 व दोन ची उत्तर सूची खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता https://mahatet.in/InterimAnswerKey.aspx

मावरी शाळेतील जीवन

इमेज
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6842192967868766"      crossorigin="anonymous"></script> मावरी ही न्यूझीलंड मधील आदिवासी जमात .या जमातीची बोली भाषा ही मावरीच परंतु  तेथे या भाषेपेक्षा इंग्रजीचेच जास्त वर्चस्व. या दोन भाषेतील समाजामध्ये सुप्त व उघड संघर्ष सतत चालू असतो.या संस्कृती संघर्षामुळे मावरी मुले मागासलेली गणली गेलेली.या मागास जमातीच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही वेगळे प्रयत्न करणे आवश्यक असलेले तरी ते केवळ पठडीबाज असून उपयोगी नव्हते त्यासाठी वेगळ्या वाटेचा शोध घेणारा व त्या वाटेने जाण्याचे धैर्य दाखवू शकणारा शिक्षक असणे गरजेचे होते. 'शिक्षक या पदाचा पगार घेणे म्हणजे शिक्षक असणे नव्हे!' सिल्व्हिया वॉर्नरचा शब्दात सांगायचे तर 'शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांची लग्नच करणे असते!' सिल्व्हिया चे असे लग्न लागलेले होते. त्यामुळेच तिने या कामात आपले सर्वस्व ओतले.       ही गोष्ट आहे न्यूझीलंड या देशातील  सिल्व्हिया वॉर्नर या शिक्

शिक्षक करणार एनपीएसचा बहिष्कार

इमेज
शिक्षक करणार एनपीएसचा बहिष्कार       पालघर दि.10 (प्रतिनिधी दि टिचर्स व्ह्यूज) जुनी पेन्शन योजना बंद केली अन डिसिपीएस (अंशदायी निवृत्ती वेतन योजना) योजना लागू करुन शासनाने 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची  खुप मोठी फसवणूक केली आहे .या योजनेतील तृटी , जमा रकमेचा हिशोब न देणे,शासनाचा दहा टक्के हिस्सा जमा न करणे, भविष्यातील स्पष्टता नसणे, अमंलबजावणी तील अनियमितता यामुळे आगोदरच शिक्षका हैराण आहेत, डीसिपीएस योजने विरोधात संताप व्यक्त करत आहेत.आणि अशातच शिक्षण विभागाने डिसिपीएस धारक शिक्षकांना एनपीएस (राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना) योजनेचे खाते खोलण्यासाठी फॉर्म भरण्याचे फर्मान काढले आहे.पालघर जिल्ह्यातील 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या डिसिपीएस धारक शिक्षकांनी एनपीएस च्या सक्ती विरोधात जोरदार मोहिम सुरु केली असुन एकञीत बहिष्काराचे अस्ञ उपसले आहे. डीसिपीएस आणि एनपीएस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीही योजना कर्मचारी/शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने घातक आहेत. आगोदरच डिसिपीएस योजनेमुळे पिचलेले शिक्षक एनपीएस योजनेमुळे आणखीनच आर्थिक विवंचनेत सापडणार आहेत.डिसिपीएस योजनेत मागील

पदोन्नती प्रक्रिया लवकरच

इमेज
 पदोन्नती प्रक्रिया  लवकरच           पालघर दि. 4 डिसें.(द टिचर्स व्ह्यूज) ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन, बिंदू नामावली प्रक्रिया पुर्ण नसणे आणि शिक्षकांच्या विकल्प बदल्या इत्यादी कारणास्तव  मागील सहा वर्षापासून रखडलेली शिक्षकांच्या विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया लवकरच पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.            या विषयी सविस्तर माहिती अशी कि, ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन सहा वर्ष उलटले तरीही पालघर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया पार पडलेले नाही,तशेच शिक्षकांचे आनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पालघर जिल्हा पेसा  अंतर्गत येतो आणि आदिवासी बहुल जिल्हा आहे या ठिकाणी शिक्षक,मुख्याध्यापक  केंद्रप्रमुख,  विस्तार अधिकारी या पदांच्या आनेक जागा रिक्त आहेत यामुळे शैक्षणिक प्रगतीवर याचा विपरीत परिणाम होत आहे. सदर पदांची पदोन्नती प्रक्रिया मागील सहा वर्षापासून रखडलेली आहे. यामुळे  नवीन भरती प्रक्रिया राबवता येत नाही आणि यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये वरील विविध पदाच्या रिक्त जागा आहेत अनेक