मावरी शाळेतील जीवन

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6842192967868766"
     crossorigin="anonymous"></script>

मावरी ही न्यूझीलंड मधील आदिवासी जमात .या जमातीची बोली भाषा ही मावरीच परंतु  तेथे या भाषेपेक्षा इंग्रजीचेच जास्त वर्चस्व. या दोन भाषेतील समाजामध्ये सुप्त व उघड संघर्ष सतत चालू असतो.या संस्कृती संघर्षामुळे मावरी मुले मागासलेली गणली गेलेली.या मागास जमातीच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही वेगळे प्रयत्न करणे आवश्यक असलेले तरी ते केवळ पठडीबाज असून उपयोगी नव्हते त्यासाठी वेगळ्या वाटेचा शोध घेणारा व त्या वाटेने जाण्याचे धैर्य दाखवू शकणारा शिक्षक असणे गरजेचे होते. 'शिक्षक या पदाचा पगार घेणे म्हणजे शिक्षक असणे नव्हे!' सिल्व्हिया वॉर्नरचा शब्दात सांगायचे तर 'शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांची लग्नच करणे असते!' सिल्व्हिया चे असे लग्न लागलेले होते. त्यामुळेच तिने या कामात आपले सर्वस्व ओतले.
      ही गोष्ट आहे न्यूझीलंड या देशातील  सिल्व्हिया वॉर्नर या शिक्षिकेची तीने आपल्या टीचर या 1963 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातुन आपल्या संघर्षाने भरलेल्या शैक्षणिक कारकिर्दीचे व अभिनव  शैक्षणिक प्रयोगाचे वर्णन केले.या पुस्तकातुन शिक्षकांना ओतपोत भरलेली प्रेरणा मिळते.वाचताना अंगावर काटा येतो व शिक्षक असल्याचा सुखद अभिमान वाटतो.आनेक शिक्षकांना वाटेल आरे आपणही आपल्या विद्यार्थ्यांसाठी हेच तर करतोय आणि अनेकांना वाटेल आपणही  अशेच करावे अन बदलून टाकावी पारंपारिक व्यवस्था,बदलून टाकावे विद्यार्थ्यांचे जीवन.बनावे प्रेरणा शैक्षणिक विश्वासाठी.
     सिल्व्हिया वॉर्नर आपल्या एका रोजनिशीच्या पानावर लिहीते, " मावरी मुलांशी तुमचे कसे काय जुळते आहे? शाळेत आलेल्या नवीन अतिथी शिक्षकाने मला विचारले .'उफ! ऊर्जा अखंड उर्जा! हीच खरी समस्या आहे.माझे विद्यार्थी  सदैव काहीतरी करायला धडपडत असतात.  पण एकदा तुम्ही त्यांच्या मानेवर तुमचा पाय दिला की मग ते ठीक  होतात. समजते आहे,मला समजते आहे, मला मला समजते आहे, अगदी खरे आहे मला समजते आहे.... पण या विषयी बोलत नाही. आमच्या नव्या पिढीत ऊर्जचा जोम किती आहे याचे वर्णन इतरांना सांगण्याचा मी प्रयत्नच करीत नाही. मी जेव्हा 'उसळती ऊर्जा' म्हणून त्याचे वर्णन करते तेव्हा ते खरे तर त्याचे खूपच अपुरे वर्णन असते. ते खरे म्हणजे एखाद्या ज्वालामुखीचे सतत होणारे स्फोटच असतात माझ्या शाळेत अशा ज्वालामुखी वर उभे राहून पारंपरिक शांत पद्धतीने शिकवणे म्हणजे वेडेपणा. हत्या वा आध्यात्मिक मृत्यू यापैकी एक काही तरी करण्यासारखेच आहे. पण त्यावर उभे न राहता शिकवणे हे तर अशक्यच आहे. मी नेमके तेच करते एखाद्या संस्थेच्या अध्यक्षा प्रमाणे मी स्वतः मागे राहून त्यांना स्वतःला शिकू देते एकच गोष्ट शिकवण्यासाठी मी पुढे सरसावते ती म्हणजे शैली! तुमचा विश्वास बसो किंवा ना बसो पण खरेच मी फक्त शैलीच शिकवते. बाकी सर्व आपोआप होते."
  सिल्व्हिया वॉर्नर पुढे आनेक प्रश्न होते.मावरी मुलांसाठी त्याच्या संस्कृतीतून आलेले शब्द वापरणारी पुस्तके का नसावीत?ही युरोपियन 'जॉन आणि जेनेट'ची कृञीम दुनिया त्यांच्यावर का लादावी?पुस्तकातले शब्द त्यांचे होण्यापेक्षा त्यांचे शब्द पुस्तकाने का घेऊ नयेत? तीला मावरी विषयी अपार प्रेम होते.इतर युरोपियन शिक्षिकांपेक्षा ती इथे वेगळी होती.मावरींची जीवन शैली ही कनिष्ठ असल्याने, त्यांना मुख्य प्रवाहात सामील करायचे,तर त्यांना हे सर्व सोडायला लावले पाहिजे, हा गोर्यांचा अट्टाहास तिला मावरींचे व्यक्तिमत्व दुभंगवणारा वाटतो.ती चाकोरीबध्द पद्धतीला फाटा देत शिक्षणात नावीण्य आणते. मावरींच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवन शैलिला शिक्षणाचा भाग बनवते. त्यांच्या बोलीभाषेला प्राधान्य देते,त्यांच्या भाषेत पुस्तक लिहून शैक्षणिक साधनांची निर्मिती करते.या वेळी ती अनेक आव्हानांचा,संकटाचा सामना करते परंतु ती डगमगली नाही, ती 'सहज शिक्षणाच्या " वाटेने ती आपल्या सावळ्या कान्ह्यांबरोबर चालू लागते.मावर्यांच्या जीवनात शैक्षणिक क्रांती घडवून आणते.......

(सिल्व्हिया वॉर्नर यांच्या 'टीचर' या पुस्तकातून साभार)

 (महाराष्ट्रातील अति दुर्गम आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील शाळेत काम करणार्या. विविध संकटाचा सामना करित तेथिल विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी मेहनत घेणार्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींना हा ब्लॉग समर्पित. )

दत्ता ढाकणे-बावीकर 
शिक्षक/ब्लॉग लेखक 
पालघर/बीड 
9867062398

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस