सी एस आर फंड शाळा विकासातील आधारस्तंभ  शाळा म्हटली म्हणजे तेथे शिकण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या आवश्यक असतात मग त्यामध्ये पुस्तकं, वह्या, दप्तर, लेखन साहित्य , शाळेसाठी लागणारे इतर साहित्य जसं मुलांसाठी , बेचं , कपाट  ,पंखे  टीव्ही , प्रोजेक्टर अशा अनेक वस्तूंची शाळेत आवश्यकता असते , ज्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी व शाळेच्या विकासासाठी हातभार लावत असतात . शहरी भागातील मोठमोठ्या शाळांमध्ये हा निधी फिच्या माध्यमातून उभारला जाऊ शकतो . तसच आपल्याकडीलही काही मोठ्या शाळांमध्ये हा निधी सहज उपलब्ध होतो . परंतु मराठी शाळा विशेषतः जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये शासनाकडून येणाऱ्या निधीमधून या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही . मग अशासाठी ह्या शाळांना आधार वाटतो, गुणवत्तेसाठी आधारस्तंभ ठरतो तो लोकसहभाग यातून जमा झालेला फंड म्हणजेच सीएसआर फंड , आमची जिल्हा परिषद शाळा नवघर आज गुणवत्ता पूर्ण झालेली आहे , सर्व सुविधांनी सज्ज झालेली आहे . आनंददायी वातावरण आहे सर्व साहित्याने परिपूर्ण आहे हे कशातून घडलं तर या सीएसआर फंडातूनच . पालकांशी सा...
 
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा