कविता न सुचलेली.....

कविता--कविता न सुचलेली.....

समोर पांढरा शुभ्र उन्हाळ्यातल्या ढगासारखा,
रेषा नसलेला कागद
नजर शुन्यात,मन माञ कवितेच्या शोधात
इकडुन तिकड नुसत्या येरझारा मारत होत
मागे हात बांधून
स्थळ शोधत असलेल्या पोरीच्या बापा सारख
मन कुठ कुठ गेल नाही म्हणून सांगु!
मन गावाकडे गेल
भुतकाळात डोकावल
दिसल्या नुसत्या वाड्याच्या पडक्या भिंती
ज्या भिंतीला धरुन आम्ही पावल टाकायला शिकलो
गाव माञ होत तसच
माणसं माञ बदलेली
वाचनालयात कमी
पानटपरी समोर पोरं माञ दिसली
त्यांना काही सुचत नाही  

  कारण पाऊस पडत नाही इथे पावसाचा अन शब्दांचाही दुष्काळ आहे

मन रिकाम्या हाताने पुन्हा वर्तमानात
मन शेतात आल
चिखल तुडीत पांदितला
पाऊस पडुन गेलेला
मानसं शेतावर निघालेली
दावनितली गुर सुटलेली
शाळेला दांडी मारुन पोर डोंगरावर चाल्लेली
आठवलं इथेच सुचलेली पहिली कविता
वाहनार्या संथ पाण्यात
नदिच्या किनारी
त्या चिंचेच्या झाडाखाली
पन आज कविता सुचली नाही
एकही शब्द सापडला नाही
आज शब्दांचा संप आहे की गणपतीची सुट्टी
आता मन भविष्य पाहत होत
कल्पनेच्या जगात शिरल होत
नविन घरात रमल होत
प्रमोशनही झाल होत अनेक कविता संग्रह
आणि नवोदित कविचा पुरस्कारही मिळाला होता
माञ आज कवितेने दगा दिला होता
विचार करत करत
पेन कागद बाजूला ठेवला

डोळ्याला डोळा लागनारच होता
इतक्यात आवाज
दरवाजाचा आणि सौचा सोबतच
'आहो भाजी काय करावी सुचतच नाही,भाजीला काहीच नाही
अन घरातील सामान संपलय'
काही क्षनातच
त्या पाढर्या शुभ्र रेषा नसलेल्या कोर्या कागदावर
सामानाची यादी आवतरली
साखर-२कि,रवा-१किलो.पालक,मेथी
अमुक तमुक...
पांढरा कागद काळा अन
डोळ्या देखत
कवितेचा भाजीपाला
न सुचलेल्या.......

कवी-श्री.दत्ता ल.ढाकणे-बावीकर
ता.शिरुर का. जि.बीड
मो.नं.९८६७०६२३९८




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Principles of Outstanding Classroom Management

The Rage of young Teachers and Government Employees.