शिक्षक करणार एनपीएसचा बहिष्कार

शिक्षक करणार एनपीएसचा बहिष्कार

      पालघर दि.10 (प्रतिनिधी दि टिचर्स व्ह्यूज) जुनी पेन्शन योजना बंद केली अन डिसिपीएस (अंशदायी निवृत्ती वेतन योजना) योजना लागू करुन शासनाने 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची  खुप मोठी फसवणूक केली आहे .या योजनेतील तृटी , जमा रकमेचा हिशोब न देणे,शासनाचा दहा टक्के हिस्सा जमा न करणे, भविष्यातील स्पष्टता नसणे, अमंलबजावणी तील अनियमितता यामुळे आगोदरच शिक्षका हैराण आहेत, डीसिपीएस योजने विरोधात संताप व्यक्त करत आहेत.आणि अशातच शिक्षण विभागाने डिसिपीएस धारक शिक्षकांना एनपीएस (राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना) योजनेचे खाते खोलण्यासाठी फॉर्म भरण्याचे फर्मान काढले आहे.पालघर जिल्ह्यातील 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या डिसिपीएस धारक शिक्षकांनी एनपीएस च्या सक्ती विरोधात जोरदार मोहिम सुरु केली असुन एकञीत बहिष्काराचे अस्ञ उपसले आहे.
डीसिपीएस आणि एनपीएस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीही योजना कर्मचारी/शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने घातक आहेत. आगोदरच डिसिपीएस योजनेमुळे पिचलेले शिक्षक एनपीएस योजनेमुळे आणखीनच आर्थिक विवंचनेत सापडणार आहेत.डिसिपीएस योजनेत मागील पंधरा वर्षापासून होत असलेली दहा टक्के वेतन कपातीचा हिशोब मिळत नाही. जमा झालेली लाखोची रक्कम कुठे आहे याचा पत्ता नाही.अशातच एनपीएस योजनेची सक्ती होत असल्यामुळे शिक्षक तिव्र संताप व्यक्त करत आहेत. आंदोलन करण्याचा प्रयत्नात आहेत.
पालघर जिल्ह्यातील जिल्ह्यातील तमाम डीसिपीएस धारक शिक्षक कर्मचारी आगोदर निवेदन देऊन सनदशीर मार्गाने विरोध करणार आहेत.तरिही प्रशासनाने सक्ती केल्यास तिव्र मोर्चा काढणार आहेत.शासनाने आगोदर डिसिपीएस योजनेतील रक्कम आणि कपातिचा हिशोब द्यावा , फॅमिली पेन्शन, ग्रॅच्युइटी लागू करावी नंतरच एनपीएस योजनेचा विचार करावा अशि मागणी शिक्षक करत आहेत. जोपर्यंत वरील बाबींची पूर्तता केली जात नाही तोपर्यंत शिक्षकांनी एनपीएस चा तिव्र विरोध करावा, बहिष्कार करावा, जुनी निवृत्ती वेतन योजना मिळविणे  हे आपले ध्येय आहे.त्यासाठी डिसिपीएस एनपीएस सारख्या अमिशाला बळी पडू नका  अशे आवाहन पालघर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस