सी एस आर फंड शाळा विकासातील आधारस्तंभ

सी एस आर फंड शाळा विकासातील आधारस्तंभ 

शाळा म्हटली म्हणजे तेथे शिकण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या आवश्यक असतात मग त्यामध्ये पुस्तकं, वह्या, दप्तर, लेखन साहित्य , शाळेसाठी लागणारे इतर साहित्य जसं मुलांसाठी , बेचं , कपाट  ,पंखे  टीव्ही , प्रोजेक्टर अशा अनेक वस्तूंची शाळेत आवश्यकता असते , ज्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी व शाळेच्या विकासासाठी हातभार लावत असतात . शहरी भागातील मोठमोठ्या शाळांमध्ये हा निधी फिच्या माध्यमातून उभारला जाऊ शकतो . तसच आपल्याकडीलही काही मोठ्या शाळांमध्ये हा निधी सहज उपलब्ध होतो . परंतु मराठी शाळा विशेषतः जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये शासनाकडून येणाऱ्या निधीमधून या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही . मग अशासाठी ह्या शाळांना आधार वाटतो, गुणवत्तेसाठी आधारस्तंभ ठरतो तो लोकसहभाग यातून जमा झालेला फंड म्हणजेच सीएसआर फंड , आमची जिल्हा परिषद शाळा नवघर आज गुणवत्ता पूर्ण झालेली आहे , सर्व सुविधांनी सज्ज झालेली आहे . आनंददायी वातावरण आहे सर्व साहित्याने परिपूर्ण आहे हे कशातून घडलं तर या सीएसआर फंडातूनच . पालकांशी साधलेला संवाद, विविध सेवाभावी संस्थेची साधलेला संवाद शाळेत चाललेले विविध उपक्रम अशा संस्थांपर्यंत पोहोचवले शाळेला कसली गरज आहे .  त्यातून गुणवत्ता कशी निर्माण होऊ शकते याचा प्रत्यक्ष आढावा त्यांना दिला आणि खरोखर मदतीचा एक ओघ सुरू झाला विविध संस्थांच्या माध्यमातून आमच्या शाळेला आज शंभर टक्के भौतिक सुविधा प्राप्त झालेले आहेत आणि खरोखर या सीएसआर फंडातूनच आमची शाळा एक परिपूर्ण शाळा झालेली आहे . सीएसआर मुळे शाळेमध्ये टीव्ही आणि संगणक यासारखी तंत्रस्नेही माध्यम आली ज्यामुळे विद्यार्थ्याला चालू असणाऱ्या नवनवीन घडामोडी कार्यक्रम याची प्रत्यक्ष ओळख झाली . लॉकडाऊनच्या काळामध्ये तर खरोखर या तंत्रज्ञानाचा खूपच शाळेला उपयोग झाला . विद्यार्थ्यांसाठी साप्ताहिक उपक्रम, प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, पालकांची संवाद साधणे या सर्व साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थी सहज शिकले .  कुठेही लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला नाही . आज आमच्या शाळेला खेळाच्या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थीना कॅरम, क्रिकेट, दोरी उड्या सर्व प्रकारचे साहित्याचा यामध्ये समावेश . तसेच संगीताचे साहित्यही आम्हाला पुरेशा प्रमाणात मिळालेले आहे हे सर्व साहित्य आम्हाला इनरव्हील क्लबच्या माध्यमातून मिळाले . ज्यामुळे शाळेमध्ये शाळेच्या सर्व कार्यक्रमाला उपयुक्त होऊ शकेल असे बँड पथक आम्ही तयार केले . लेझीम पथकही त्यामुळे तयार झाले . शाळेला मिळणारे हे विविध साहित्य विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी तर उपाय करत ठरतेच आहे पण त्याबरोबर त्यांच्या विविध कलागुणांना ही ते प्रेरक ठरत आहे . वाचनास मुबलक प्रमाणात पुस्तके उपलब्ध झाली त्यामुळे आमच्या संकल्पनेतला एक छानसं वाचनालय थोडक्यात आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा एक सुसज्ज असं वाचनालय आहे असं आम्ही अभिमानाने सांगू शकतो . शाळेचं अंतरंग आणि बाह्यरंग हे दोन्ही बदलण्यासाठी आम्हाला सीएसआर फंडातून खूप मोठी मदत झालेली आहे . त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात मोलाचा जो वाटा घेतला तो सक्षम फाउंडेशनच्या माध्यमातून . शालेय रंगरंगोटी , बोलक्या व चित्ररूप वर्गखोल्या, संगणक , e लर्निंग अभ्यासक्रम , दप्तर व लेखन साहित्य , वर्गखोली दुरुस्ती त्यांच्यामुळे आम्हाला शाळेच संपूर्ण रूपच पालटलेलं पाहायला मिळालं . आज आमचे विद्यार्थी आनंदाने शाळेत येत आहे एकही विद्यार्थी शाळाबाह्य नाही एवढेच नाही तर कोणी गैरहजरही नसते म्हणजेच शाळेची उपस्थिती वाढली पटसंख्या वाढली आणि गुणवत्ताही वाढत आहे . शाळेच्या भौतिक व पायाभूत सुविधातील महत्वाचे अंग म्हणजे पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेसाठी पाण्याची सुविधा या सुविधेसाठी आम्हाला मदतीचा हात दिला तो लायन्स क्लब या सेवाभावी संस्थेने त्यामुळे शालेय वातावरण परिसर सदैव हिरवागार व फुललेला तर असतोच तसेच विद्यार्थ्यांना पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी मुबलक पाणीही उपलब्ध झाले . संकल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली दोन वर्ष मुलांना लेखन साहित्य किट पुरविले जात आहेत . लॉक डाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा अभ्यास योग्य पद्धतीने सुरु रहावा यासाठी प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्यात आल्या होत्या .
अशा प्रकारे सीएसआर फंड हा केवळ आमच्या शाळेसाठीच नाही तर परिसरातील सर्वच लहान मोठ्या शाळांसाठी आधारस्तभ ठरत आहे .

सौ.माधुरी राऊत
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद शाळा नवघर
ता.जि.पालघर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस