दुष्काळ पाण्याचा अन विचारांचा!

दूष्काळ इथेही अन तिथेही                  
दूष्काळ आवकाळी अन सुलतानी        
पाण्याचा अन विचारांचा
खालपासुन वरपर्येंत दुष्काळ!
या देशात गरिब अन विचार रोजच मरतात
दोघांनाही वाली नाही
आक्रोश करतात मरणारे मरतात
गरिबाच्या पदरात पडतच काय!
योजना येतात उपयोग काय?
कागदी घोडे नाचून जातात
खानारे खातात अजिर्ण होइपर्येंत
पेपरच्या गठ्ठ्यात सगळे आलबेल आहे
विचारांचे माञ मुडदे पडलेत
दूष्काळातल्या गुराढोरांसारखे
विचारवंतांना सुगीचे दिवस आलेत
कोण काय बोलतय कोण काय छापतय
टीआरपी च्या दिवसात काहिही खपतय
सकाळी घडलेल संध्याकाळी बिघडतयं
भ्रष्टाचार अन बलात्काराचा सुकाळ आहे माञ
देऊनच टाका स्वतंञ्य भ्रष्टाचार अन बलात्काराचे
दोन्हीही दिवस राञ सुरुच आसतात राजरोसपणे
भारत अन इंडिया कधिच वेगळे झालेत
पुन्हा एकदा फाळणि झाली समनजलेही नाही
कोण जिना कोण गांधी कळलेही नाही
कसली जात अन कसला धर्म
आम्हा एकवेळच्या खान्याची भ्रांत
दुष्काळी आमचा प्रांत
सहिष्णुतेच्या पुजाऱ्यांने
जरा आमच्या दावनिला पहा
मुके जनावर लाहीलाहि करुन मरत आहेत
जगाचे पोशिंदे फासावर चढत आहेत
आम्ही शेतकरी हाडाची काड
अन पोटमारा करुन पोटासाठी झटायचं
आसच कुठपर्यंत जगायच?
राब राब राबायचं मातीतून सोन पिकायचं
अन कवडीमोलान विकायचं आस किती काळ सोसायचं?
का आम्हीच झिजतो?
का आम्हीच कर्माचि फळ भोगतो!
का आम्हीच आश्रुला ढाळतो!
आम्हीच का दूनियेची काळजि वाहतो?
कधि आस्मानी,कधी सुलतानी
वादळात आमचचं घरट का मोडतं?
आम्हीच इतके का अभागी!
दैव आमच्यावरच का कोपत?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस