अनाथांचा नाथ.....गोपिनाथ...

मा.गोपिनाथरावजी मुंढे साहेबांना भावपुर्ण आदरांजली....साहेब परत या..सामान्य जनतेला शेतकरी कष्टकऱ्यांना तुमची नितांत गरज आहे

-नाथ..........!

        नाथ तुझ्या जान्याने
 गोदाकाठ हळहळला होता
 अनाहुत परिक्रमा अशिही
 काळाने घात केला होता....
चार तपाचा संघर्ष
फळाला आला होता
दिवस चांगले आले होते पण
काळाने घात केला होता....
 आक्रोशली आनंत ह्रदये
 घराघरात दिवा विझला होता
 सजली होती हार तुरे
 पण काळाने घात केला होता...
 ज्याचा धरला हात 
 तोच सोडून गेला होता 
 अशि आक्रोशली जनता 
 जसा बाप गेला होता
अनाथांचा नाथ तो
बहुजनांचा वाली होता
सर्वांचा साहेब तो
वंजा-यांचा भगवान होता
 महाराष्ट्राचा वाघ तो
 दिल्लीत गाठला होता
 मैदानात तो हरला नाही
 म्हणून गनिमी कावा केला होता

    दत्ता ढाकणे-बावीकर
poetddl.blogspot.com

आदरणिय ,पुजनिय,गोपिनाथजी मुंढे साहेबांना शब्दसुमनाने भावपुर्ण आदरांजली......साहेब आम्ही पोरके झालोत...तुमची या देशाला,राज्याला,जिल्ह्याला,प्रत्येक गावाला ,गावातील लहान थोरांना नितांत गरज होती....साहेब तुम्ही जायला नको होत ....साहेब परत या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Principles of Outstanding Classroom Management

The Rage of young Teachers and Government Employees.