त्या वृत्तीचा शिक्षकांमध्ये तिव्र संताप

त्या वृत्तीचा शिक्षकांमधे तिव्र संताप

सफाळे दि.8. मास्तरड्यांनो काम केले तर मराल काय? या शीर्षकाखाली संपादकीय लेख प्रसिद्ध करणाऱ्या एका तथाकथित वृतपञाच्या संपादका विरोधात राज्यातील शिक्षक तिव्र संताप व्यक्त करत असून व संपादकाच्या मनोवृत्तीचा निषेध करत आहेत.
      या विषयी सविस्तर माहिती अशी कि राज्य शासनाने शिक्षकांना दिवाळीच्या सुट्ट्या वाढवून देण्याचा शासन निर्णय पारित केला आहे यामुळे शिक्षकांमधे आनंदाचे वातावरण आहे परंतु काही शिक्षक विरोधी वृत्तींना ही गोष्ट पचली नाही. यामुळे त्यांचा तिळपापड झाल्यामुळे ते शिक्षकां विरोधात खालच्या भाषेत टिका करत आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथील एका स्थानिक वृत्तपत्राने केला आहे.
   आपल्या संपादकीय लेखात शिक्षकां विरोधात आगदी खालच्या दर्जाची भाषा वापरुन टिका केली आहे. शिक्षकांचा मास्तरड्या असा उल्लेख करुन 'काम केले तर मराल काय?'या शीर्षकाखाली लेख लिहीला . त्यामध्ये '... तुम्ही सरकारचे जावाई अहात काय?हत्ती च्या कानातून उतरले काय,सगळं जग म्हणतंय काम हवंय आणि तुम्हाला कशाला रे सुट्ट्या?मास्तरड्यांनो जरा जास्त काम केले तर मराल काय?' अशा पद्धतीने आगदी हीन भाषा वापरुन शिक्षकांवर टिका केली आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच राज्यातील शिक्षकांमध्ये तिव्र संताप उमटला असून जाहीर निषेध केला जात आहे.
     शिक्षक हा राष्ट्रनिर्माता आहे असे मत भारताच्या सर्वोच्च न्याय संस्थेने गौरविले असे असताना शिक्षकांना मास्तरड्या म्हणणाऱ्या या संपादकाचे मानसिक स्वास्थ्य ढळलेले दिसत आहे.
सुट्टी ही विद्यार्थ्यांना आहे, शिक्षकांना नाही. बहुतांश शिक्षक बांधवांनी कोवीड सेंटर, चेक नाके येथे रात्रंदिवस या कालावधीत ड्युट्या केल्या.घरोघर जाऊन तपासण्या केल्या, रेशनिंगचे दुकानावर काम केले, भाजीपाला- किराण्याचे ओझे घरपोहच केले, पोलीसांच्या बरोबरीने आर. एस. पी. शिक्षकांनी रात्रीचा दिवस केला तेही कुठल्याही सुरक्षितता प्रदान करणाऱ्या साधनांच्या शिवाय.
      विद्यार्थी हे आमचे दैवत आहे तसेच भारताचा आधारस्तंभ. शाळा सुरु झालेनंतर या आधारस्तंभालाचा जर कोरोनाचा विळखा बसला तर कित्येक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. आम्हाला आमच्या पेक्षा विद्यार्थ्यांची काळजी आहे. आजही आमचे ऑनलाईन अभ्यासक्रमाचे काम चालू आहे. कंटेंट निवडा, व्हिडीओ शुट करा, इडीट करा, मिक्सींग करा, टेस्ट तयार करा, फिडबॅक घ्या, ऑनलाईन मिटींग करा, विद्यार्थी-पालक संपर्क करा, गृहभेटी घ्या, स्वाध्याय तपासा, न समजणाऱ्या घटकाचे समुपदेशन करा, ऑनलाईन मूल्यांकन करा, नोंदी ठेवा, मुख्याध्यापक, संस्था व शासनास अहवाल सादर करा या धावपळीत दिवसाचे 12 ते 15 तास निघून जातात. शाळा सात घंट्यांचीच असते, त्या पेक्षा दुप्पट काम सध्या शिक्षक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता करत आहेत.
तरिही काही निच प्रवृत्ती शिक्षकांच्या विरोधात गरळ ओकत आहेत अपमान करत आहेत.अशा लोकांनी शिक्षकांची जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई ला सामोरे जावे असा इशारा विविध शिक्षक संघटनांनी दिला आहे.

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस