अभ्यास फेरी उपक्रमांतुन शाळा बंद शिक्षण सुरु

     सफाळे दि. कोरोना महामारी च्या कारणामुळे मागील मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद आहे या शैक्षणिक वर्षातही पहिले सत्र संपत आले आहे तरी शाळा बंदच आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात कायम ठेवण्यासाठी शासन स्तरावरून ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबिली जात आहे ही शिक्षण पद्धती शहरी भागामध्ये निमशहरी भागांमध्ये प्रभावी ठरत आहे परंतु ग्रामीण भागात सुविधांचा अभावमुळे ऑनलाइन शिक्षणात खूप आडचणी  येत आहेत.
         पालघर सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागात तर ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबणे खूप कठीण काम ठरत आहे या लॉकडाउन च्या काळात  आदिवासी भागात बेरोजगारी वाढली आहे लोकांचे रोजगार  बंद आहेत. काम मिळत नाही.हाताला काम नाही यामुळे  एक वेळ खाण्याची भ्रांत आहे अशा बिकट परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी सुविधा स्मार्ट  अँड्रॉइड फोन यासारखी सुद्धा अगदी बोटावर मोजण्याइतक्या पालकांकडे उपलब्ध आहे अशा परिस्थितीत शिक्षण पद्धती ऑनलाईन शिक्षण पद्धती   कुचकामी ठरत आहे.  विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी शासन स्तरावरून अनेक ऑनलाइन शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत.शिक्षकांनी कितीही प्रयत्न केले तरी फक्त  10 ते 20 टक्के विद्यार्थ्यां पर्यंतच हे उपक्रम पोहोचत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील शिक्षक  विविध उपक्रम राबवून  विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
          असाच एक उपक्रम जिल्हा परिषद शाळा करवेलपाडा  केंद्र सफाळे तालुका पालघर या शाळेत सुरू आहे या शाळेतील शिक्षक श्री दत्ता लक्ष्‍मण ढाकणे यांनी अभ्यास तेरी उपक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवण्याचे काम सुरू ठेवले आहे हा उपक्रम राबवून आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांचे अध्यापन आणि  नियमित अभ्यास सुरु आहे.  अभ्यास फेरी या उपक्रमाच्या माध्यमातून आठवड्यातील तीन दिवस विद्यार्थ्यांच्या भेटी घेणे विद्यार्थ्यांच्या ज्या ठिकाणी असतील तेथे जाऊन त्यांचा दीड ते दोन तास अभ्यास घेतला जातो. शाळा बंद आणि पालक कामानिमित्त घराबाहेर असल्याने पाड्यावरची मुलं दिवसभर इकडे तिकडे फिरत असतात काही मुलं पाखरे मारायला जातात काही चिंबोऱ्या पकडायला काही गावातील गल्लीत गोटया खेळत असतात अशा ठिकाणी या शाळेतील शिक्षक पोहोचतात. ज्या  ठिकाणी विद्यार्थी खेळत आहेत त्याठिकाणी शिक्षक पोहोचतात चार ते पाच विद्यार्थ्यांना एकत्र करतात आणि त्यांचा अभ्यास घेतात. कविता-गाणी गोष्टी तसेच पाढे बोलणे, पाढे पाठांतर, प्रश्न उत्तर  या पद्धतीचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. पाठ्यपुस्तकातील जो घटक कठिण आहे त्या विषयी मार्गदर्शन केले जाते. काही वेळी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जातात आणि विद्यार्थी व पालकांना अभ्यासा विषयी तशेच स्वच्छते विषयी  मार्गदर्शन करतात. ज्यांच्याकडे  साधा फोन नाही उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना आठ दिवसाचा अभ्यास दिला जातो. शाळेतील उपलब्ध शैक्षणिक साहित्य तशेच भाषा गणित, चिञकला या विषयाचे अभ्यासाचे पीडीएफ फाईल झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना दिल्या जातात आणि त्यांना  मार्गदर्शन करून आठ दिवसाचा अभ्यास दिला जातो. पुन्हा दुसर्या अभ्यास फेरीच्या वेळी मागचा अभ्यास तपासून न समजलेल्या घटका विषयी मार्गदर्शन केले जाते. जे विद्यार्थी शाळेजवळ राहतात त्यांना शाळेच्या फळ्यावर दोन दिवसाचा अभ्यास लिहून दिला जातो.
       त्या ठिकाणी विद्यार्थी खेळत असतात त्या ठिकाणी शिक्षक पोहोचतात आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतात यामुळे विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटतो आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. शाळा बंद असताना शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात त्यांचा अभ्यास घेतात त्यामुळे पालकांनाही खूप बरे वाटते आणि ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देतात. आदिवासी पाड्यावर शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे.अभ्यास फेरी उपक्रमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी करण्याचा शिक्षक प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना पालकांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले जाते जो ऑनलाईन अभ्यास पीडीएफ फाईल येतात त्याची झेरॉक्स देणे विद्यार्थ्यांच्या वहीवर अभ्यास देणे इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास पोहोचण्याचे कार्य शिक्षक करत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघत आहे आणि विद्यार्थी अभ्यासाच्या प्रवाहात राहत आहेत त्यामुळे हा उपक्रम खूपच प्रभावी ठरत असून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे. अभ्यास फेरी उपक्रम य राबवताना सोशल डिस्टनशिंग नियमांचे काटेकोर पालन केले जाते. तशेच अभ्यासा वेळी विद्यार्थी व शिक्षक तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधलेला असतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस