नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी जतिन कदम व प्रतिभा कदम यांचे सूत्रसंचालन विषयावर लेखन;

नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी जतिन कदम व प्रतिभा कदम यांचे सूत्रसंचालन विषयावर लेखन; 
 डॉ.वंदना महाजन व डॉ.पृथ्वीराज तौर यांचे विशेष मार्गदर्शन

              सफाळे दि.4 नोव्हें. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडच्या नवीन पदवी अभ्यासक्रमातील ' व्यक्तिमत्त्व विकासासाठी : संभाषण व लेखन कौशल्ये ' या संपादित ग्रंथाचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले सर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र कुलगुरू डॉ.जोगेन्द्रसिंग बिसेन व अधिष्ठाता डॉ.भगवान जाधव यांनी कन्टेन्ट आणि उत्कृष्ठ  निर्मितीसाठी कौतुक केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवि सरोदे, माजी कुलसचिव डॉ. रमजान मुलांनी, डॉ केशव सखाराम देशमुख, प्रतीक्षा तालंगकर, सचिन कथले, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी हे मान्यवर पुस्तक सोहळ्यास उपस्थित होते. प्रकाशक युवराज माळी आणि पाठलेखिका  प्रतीक्षा तालंगकर यांचा यावेळी कुलगुरू सरांनी प्रातिनिधिक सत्कार केला.
    विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांनी मराठी अभ्यास मंडळाचे मनापासून आभार व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, आमच्यावर विश्वास दाखवला व संपादनाची जबाबदारी दिली,ती पूर्ण करण्यासाठी अनेकांचे हातभार लागले.नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉ. शैलेन्द्र लेंडे आणि मुंबई विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. वंदना महाजन यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सूचना व मार्गदर्शनामुळेच हे संपादन दर्जेदार व विद्यार्थीकेन्द्री झाले. या ग्रंथाचे लेखक डॉ. राजेंद्र थोरात,  डॉ शैलेश त्रिभुवन, डॉ रवींद्र बेम्बरे, पालघर येथील जतीन कदम व प्रतिभा कदम, डॉ पुंडलिक कोलते, प्रतीक्षा तालंगकर, डॉ विनायक पवार, प्रा रवि पवार आणि राजकुमार तांगडे यांनी प्रस्तुत संपादित ग्रंथासाठी मुलाखतीची पूर्वतयारी, सूत्रसंचालन, वक्तृत्व, गीत लेखन, जाहिरात लेखन आणि संवादलेखन या विषयावर लेखन केले आहे. जतिन कदम व प्रतिभा कदम यांनी सूत्रसंचालन या विषयावर उत्तम लेखन केले आहे. व्यावसायिक सूत्रसंचालक होण्यासाठी आवश्यक साहित्याचा यात समावेश करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Principles of Outstanding Classroom Management

The Rage of young Teachers and Government Employees.