आगरी व्हर्जन-- आमलावं पायजे मोबाईल ! (सुर्यकांत सराफ यांच्या आम्हांलाही हवाय मोबाईल.इ.४थी च्या बालभारती पुस्तकातील नाट्यछटेचे आगरी व्हर्जन.)

                          आमलावं पायजे मोबाईल !

       माझ एकदा आयकतय का, आई? मी आथां मोठी झालय अस तु निका सांगतय? मग मानाव सगल्यान सारका एक मस्त मोबाईल पायजे का नी.क्याचे साठी पायजे म्हनजे काय? बोलायसाटी ना हाय फोन?वा गंमत हाय,ताईन मांगला का लगेच मिलतय फोन दादा त कॉलेजलाव नेतय त्याचा मोबाईल.
     बाबाचे जवल त दोन दोन मोबाईल हान,ना मीन मांगल्यावर तू सांगतस तुला काय गरज हाय त्याची.ओय ताई,नुसती काय पन बोलू नको,तुला मोबाईल दिलात तवा मी काय बोललू का? हॉं हॉं आमाना महत्वाची कामा व आसतान,महत्वाच बोलायचा असतय.दादाचा फोन  मी घेताव कवा कवा.पन फक्त गेम खेलाय,बोलय काय करु मंग?
        आई पुढचे मयनेन माझा वाढदिवस येतय,माझे मिञांना मैञिनींना पार्टीला बोलवया कवरी मजा येल! 'अरं उंद्या सांचे माझे घरा गच्चीवर बड्डे पार्टी हाय.तु जरा लवकर येल ना?मस्त,भारी,आपू जाम मजा करु!आथा सगल्यांना फोनवर सांगता,बाय'. वा कवडा बरां वाटल असा फोन करताना.आई, अगं शालेन अचानक सुट्टी घेयाची असली का,नसती सरांची बोलनी खाया लागतन.त्यापेक्षा पप्पा कसं घरशास फोन करतान,तसा सरांना शालेन फोन करायचा. 'हँलो! गूड मॉर्नींग सर,माना आज सुट्टी मिलन  का? जरा महत्वाचा काम हाय घरा.हो सर उंद्ये नक्की येन सर.थँक्यू सर!'
       जँम कामा करता येतान असा.तू सांगना बाबाला.ताईचे वेलेला तु नी का सांगला बाबाला. ताई तुजी लाडकी हाय ना मी काय दोडकी हाय का गं? आथां तुजे जवल नसला मोबाईल म्हनून मानाव नको का मोबाईल?अगं माजे जवल मोबाईल आल्यावर आपू दोघी व वापरु. नक्की.आजी तू नग आईवर चिडू.काय बोलतंय?तुम्हाना पोरांना मोबाईलवर कवडां बोलायचा त्याचा भानच नसतयं.अगं,मोबाईलशा आपण कोनलाव फोन करुन बोलू शकतन.दादा सारका मिञांना सांगतय,'अरं,मी ग्रंथालयान अभ्यास करताव.'तू बोलतय त्यां खरां हाय,पण मोठी मानसां करतान. तसा आमी पोरं नि करणार.देऊन त बघ आदी आमचे हातानं मोबाईल.पप्पाला तर हांग बघ काय होतय त्या.

इयत्ता ४थी-  -नाट्यछटा     
आम्हांलाही हवाय मोबाईल!
मुळ लेखक-सुर्यकांत सराफ
         
आगरी भाषेत भाषांतर-
-दत्ता ढाकणे-बावीकर
-कल्पेश पाटील                                      
poetddl.blogspot.com
                                              
                                                    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस