माणूसकी आजून जीवंत आहे...!जीवंत नाही तो माणूस!

                                             माणूसकी आजून शिल्लक आहे...
मयत शिक्षकाच्या कुटूंबाच्या मदतिसाठी हॉट्स अँप गृप च्या माध्यमातून शिक्षकांनी जमवले पावनेचार लाख रुपये.

    समाजात माणूसकी शिल्लक राहिली नाही, इथे कोणी कोणाचा विचार करत नाही,धावपळिच्या युगात इतरांचा विचार करण्यास वेळ नाही! ही ओरड आपन नेहमीच करतो.परंतू पालघर जिल्ह्यातील शिक्षकांनी 'माणूसकी आजूनही जीवंत आहे' हे आपल्या कृतितून दाखवून दिले आहे.तब्बल पावने चार लाख रुपयाची रक्कम आठ दिवसात जमा करुन मयत शिक्षकाच्या कुटूंबाला मदतिचा हात दिला आहे. समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
   या विषयी सविस्तर माहिती अशी की,जि.प.शाळा पऱ्हाडपाडा केंद्र आंबेदे ता.पालघर येथिल शिक्षक संतोष दुंदा ढेंगळे हे ६ मे रोजी त्यांच्या १ वर्षाच्या मुलिच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुळ गावी पिंपरवाडी ता.जुन्नर जि.पुणे येथे मोटारसायकले जात असताना मोटारसायकलच्या आपघातात डोक्याला मार लागून निधन झाले होते.
   सहा वर्षापुर्वी १२/५/२०१०रोजी ते शिक्षक म्हणून पालघर तालूक्यात आले होते.नुकतेच दोन वर्षापुर्वी त्यांचे लग्न झाले होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी उज्वला ढेंगळे एक वर्षाची मुलगी यज्ञा,आई वडिल,दोन भाऊ व एक बहिन  असा परिवार आहे.मोठ्या भावाच्या दोन किडन्या खराब आसल्यामुळे ते आंथरुनाला खिळून असतात.संतोष ढेंगळे यांच्यावर त्यांच्या सर्व कुटूंबियांची जबाबदारी होती.घरची परिस्थिती आतिषय बेताची, आई वडिल शेतकरी दुष्काळाशि दोन हात करत आहेत.मोठा भाऊ आंथरुणाला खिळून आहे.एक बहिण शिकत आहे.आणि अशातच घरचा कर्ता पुरुष सोडून गेल्याने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संतोष ढेंगळे यांनी भावाचा इलाज करण्यासाठी व बहिणीच्या लग्नासाठी पतपेढीचे कर्ज घेतले होते.संतोष ढेंगळे हे १ नोव्हें २००५ नंतर शासकिय सेवेत लागले आसल्याने सरकारी नियमानुसार त्यांच्या कुटूंबियांना निवृती वेतनाचा लाभ मिळणार नाही व घरात दुसरा आर्थीक स्ञोत नसल्याने कुटूंबा समोर आर्थीक संकट  आ वासुन उभे आहे.अशा दुःख प्रसंगी संतोषच्या आई वडिलांना कोणापुढे आर्थीक मदतिसाठी याचना करावी लागू नये व त्यांच्या पत्नी व मुलीच्या भविष्याचा विचार करुन पालघर जिल्ह्यातिल शिक्षकांनी मदतिचा हात दिला आहे.
    'संतोष ढेंगळे मदतनिधी' या नावाने हॉट्स अँप गृप तयार करुन तशेच शिक्षकांच्या विविध गृप वर मेसेज व वर्तमानपञातील बातमी पाठवून पालघर जिल्ह्यातिल व राज्यातिल शिक्षकांना आर्थीक मदतिचे आवाहण करण्यात आले होते. शिक्षकांनी या आवाहणाला प्रतिसाद देऊन भरभरुन आर्थीक मदत केली.स्व इच्छेने शिक्षकांनी दोनशे रुपया पासुन पाच हजार रुपया पर्येंत रक्कम जमा करुन  आठ दिवसात तब्बल पावणे चार लाख रुपयाची मदत एकट्या पालघर जिल्ह्यातून  मिळाली आहे.मदतिचा ओघ आजूनही सुरु आहे.
    मयत संतोष ढेंगळे यांच्या जवळच्या शिक्षकांनी सदर रक्कम पिंपरवाडी-जुन्नर येथे जाऊन पत्नी व आई वडिलांच्या हाती सुपूर्द केली.वडिल दुंदा ढेंगळे,पत्नी उज्वला ढेंगळे व मुलगी यज्ञा हिच्या नावे सदर रक्कम बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करुन ठेवण्यात आली आहे.या बहुमुल्य मदतिबद्दल ढेंगळे यांच्या पत्नी व आई वडिलांनी जिल्ह्यातिल सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.
  यापुढेही जर एखाद्या शिक्षकाच्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडली अन कुटूंबापुढे आर्थीक संकट उभा राहिले तर मदतिचा हात देण्याचा मनोदय शिक्षकांनी व्यक्त केला आहे. सदर मदत निधी जमा करण्यासाठी अशोक चव्हाण,सिद्धेश्वर मुंढे,दत्ता ढाकणे-बावीकर,सोमनाथ कोळी,प्रदिप गायकवाड,सत्यप्रेम गिरी,कैलास अमोघे,लक्ष्मण बाराते,विक्रम दळवी,विष्णु ठोंबरे,पोपट करे या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
    शिक्षकांची संवेदनशिलता वरिल उदाहरणातून दिसुन येते.प्राचीन काळापासुन शिक्षकांची समाजाप्रती आसलेली माणूसकिची भुमिका आजही दिसुन येते.अध्यापना बरोबरच शिक्षक समाजात आदर्श निर्माण करण्यायाठी व समाज हितासाठी मेहनत घेतात.परंतू महाराष्ट्रात  आशे आनेके संतोष ढेंगळे यांच्या सारखे तरुण शिक्षक आपला संसार उघड्यावर टाकून अकालि निघुन गेले आहेत.शिक्षक होऊन तुटपुंज्या पगारात कुटूंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.बहिणीचे लग्न ,भावाचे शिक्षण आईवडिलांचा दवाखाना,घराचा हाप्ता,डिसीपिएस चा हप्ता ,कुटूंबाचा उदरनिर्वाह करताना  शिल्लक उरतेच काय? शासनाने तर तरुण शिक्षकांना वाऱ्यावर सोडलेच आहे.तिन वर्ष तुटपुंज्या मावधनावर वेठबिगारी करायची अन सेवेत कायम केल्यानंतर डिसीपिएस चे भुत मानगुटीवर बसलेले आहेच.अकाली मृत्यु आल्यास कुटूंबाचा वाली कोण? पेन्शन नाही,अन हताशि काही शिल्लक नाही! पोराबाळांनी कोणाच्या तोंडाकडे पहायचे? शासनाने याचा विचार करावा व जुनी पेन्शन योजना लागु करुन मयत शिक्षकांच्या कुटूंबियांना न्याय द्यावा येव्हढीच आपेक्षा.

श्री.दत्ता ढाकणे-बावीकर
Teacher/Blog writer
पालघर-9867062398

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस