वंजारी समाज बांधवांनो दलितांच्या वाटेने जाऊ नका.

   वंजारी समाज बांधवांनो दलितांच्या वाटेने जाऊ नका!

  पंकजा ताई मुंढे यांच्यावर सध्या जे बिनबूडाचे आरोप होत आहेत आणि त्यांच्या विरोधात ज्या पेड न्यूज चालवल्या जात आहेत हे पाहून आम्हाला पुन्हा एकदा एक वैचारिक व राजकिय पुनरावृत्ती होते की काय अशे वाटते.  ज्यांना मुंढे साहेबांनी मोठं केल तेच लोक आता ताई साहेबांच्या विरोधात कटकारस्थान रचत आहेत,यांच्या कारस्थानाला बळी पडू नका. नाहीतर तुमची गत दलित बांधवांसारखी होईल.भारतरत्न डॉ.आंबेडकरांसारखे नेतृत्व लाभले असतानाही सध्या दलित नेत्यांची आवस्था ना घर का न घाट का अशी झाली आहे.दलित समाज गटातटात विभागला गेलाय.देशाचे नेतृत्व करण्याची ताकत असतानाही दलित नेत्यांना आता कवडीमोल किंमत राहिली नाही.कॉग्रेस ,राष्ट्रवादीने आणि भाजपाने फोडा आणि राज्य करा  या धोरणामुळे दलित समाज एकसंघ राहिला नाही.आनेक नेते आपली चूल मांडून बसले आहेत़ परंतू समाजाची ताकत विखुरली गेली यामुळे राजकिय फायदा इतरांनाच होत आहे.सत्तेसाठी आता दलितांना सत्ताधारी पक्षांचे उंबरठे झिजावे लागत आहेत.बाबासाहेबांची शिकवन त्यांनी बासनात गुंडाळून ठेवली आहे.देशात दलित समाज खुप मोठ्या संख्येने  आहे परंतू आनेक राजकिय गटात विभागला गेला आहे.आठवले गट प्रकाश आंबेडकर गट,मायावती,कवाडे इत्यादी.डॉ.आंबेडकरांनी दिलेली शिकवन हे नेते विसरले आणि आता हेच नेते डॉ. आंबेडकरांचे नाव घेऊन सत्तेसाठी लाचार झाले आहेत.आंबेडकरांची मेहनत व विचार या नेत्यांनी पायदळी तुडविली आहेत.
    सध्याची राजकिय व सामाजिक स्थिती पाहून वंजारी समाजही दलितांच्या वाटेने वाटेने जातो की काय अशे वाटत  आहे.गोपीनाथ मुंढे यांनी जिवाचे रान करुन समाजाची एक मुठ बांधली होती.दिन दुबळ्या कष्टकरी समाजाला सत्तेची स्वप्न दाखविली होती.त्यांच्या हयातित त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता तरिही त्यांनी न डगमगता बहूजन समाजाला सत्तेच्या प्रवाहात आणले होते.दुर्दैवाने त्यांचे  अप-घाती अकालि निधन झाले.बहूजन वंजारी समाज दुखात बुडाला त्यांना सावरण्याचे मोठे काम पंकजा ताईंनी केले व त्यांच्या दारात सत्ता आणून ठेवली.ताईंची लोकप्रियता व वाढत आसलेली राजकिय ताकत काहि लोकांना डोळ्यात खुपत आहे.मुंढे साहेबांच्या अपघाती निधनाने मुंढे यांचा विचार व मुंढे गट संपुष्टात येईल अशि अटकळ काही विरोधकांनी व घरातिल लोकांनी बांधली होती परंतू त्यांचे मनसूबे सफल झाले नाहीत.उलट पंकजा ताईंनी सत्ता खेचून आणली.हे काही नतदृष्ठ मंडळींना पाहवले नाही म्हणूनच  पक्षातिल व पक्षाबाहेरिल विरोधक पंकजा ताईंच्या लोकनेतृत्वाला शह देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आडचणि निर्माण करत आहेत. ताईंचे नेतृत्व आडचणित  आणल्यास समाज विभागला जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच ताईंवर वेळोवेळी कधित आरोप केले जात आहेत.ताईंच्या विरोधात पेड न्यूज चालवल्या जात आहेत.काही लोकांना हाताशि धरून  भगवान गडावरिल दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.आशे झाल्यास समाज्याची खुप मोठी हानी होणार आहे.गोपिनाथ मुंढे साहेबांमुळे वंजारी व बहूजन समाज एकसंघ झाला होता.एक मोठी राजकिय ताकत निर्माण झाली होती.पंकजा मुंढेही त्याच मार्गाणे जात आहेत.आपन त्यांचे नेतृत्व स्विकारले आहेच परंतू काही लोक समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.पडद्यामागे खुप मोठे कारस्थान रचले जात आहे.poetddl.blogspot.com
     समाज बांधवांनो कळकळिचि विनंती करतो की,भूलथापांना बळी पडू नका.आत्ताच वेळ आहे योग्य विचार करण्याची लबाडांना साथ द्यायची कि ताईंना.ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही त्यांना लाल दिवा मिळतोय फक्त ताईंना संपविण्यासाठीच.ज्या लोकांना वंजारी व बगूजन समाचा विकास नको आहे अशे काही राजकिय नेते धनंजय मुंढे व पंकजा ताई मुंढे यांच्यात समाजाची विभागणि  करु पाहत आहेत.एकदा समाजाचे टूकडे पाडले की नेतृत्व संपुष्ठात येईल व वंजारी बहूजन समाज पुन्हा मागास राहिल ही काही लोकांची धारणा आहे.दलित समाज्याची जी गत केली तिच गत वंजारी समाजाची केल्यास राजकिय ताकत संपुष्ठात येईल .अशाने आपला समाज पुन्हा पन्नास वर्ष मागे जाईल.म्हणूनच आपली शक्ती ताईसाहेबांच्या सोबत आसुद्या.ताईंची सर कोणालाही  येणार नाही. ....हातचे बाहूले आहे.ताईंची सर कोणालाही येणार नाही.ताईंनी सत्तेत आल्यावर कामाचा धडाका लावला आहे.बीड जिल्ह्या बरोबरच महाराष्ट्राचा सर्वांगिन विकास ताईच करतिल.ताई एक दिवस मुख्यमंञी नक्कीच होतिल.आपल्या समाज्याचा विकास होऊ नये आपन ऊसतोडणिच करावी अशे काहिंना वाटत आहे तेच लोक आपले नेतृत्व संपवायला निघाले आहेत.सध्या जे लोक ताईंना टार्गेट करत आहेत त्यांचा वापर करुन घेतला जात आहे.त्यांनी त्यांचा स्वाभिमान गहान ठेवला आहे.मुंढे साहेबांचे व भगवान बाबांचे नाव घेऊन हे लोक घाणेरडे राजकारण करत आहेत.त्यांची मती गेली आहे.माती होण्यास वेळ लागणार नाही.आपन सर्व  जाणते अहात.ते कोणाच्या जिवावर उड्या मारत आहे आपन जाणताच.पालीच्या शेपटाची वळवळ किती काळ टिकणार? ज्यांनी मुंढे साहेबांना छळले ते समाजाचे काय भले करणार? अशा लोकांसाठी आपन आपली शक्ती वाया का घालावी?
      दलितांचे जे झाले ते आपले होऊ नये यासाठी आपन आत्ताच एकसंघ राहून विरेधकांचे मनसुबे उधळून लावायला हवेत.गोपिनाथ मुंढे साहेबांनी मोठ्या संघर्षाने जे कमवले ते आपल्याला गमवायचे नाही.आपन संपुर्ण ताकतिनिशी पंकजा ताईंना पाठबळ देऊन आपले नेतृत्व बळकट  करुया.
मुंढे साहेबांना हिच खरी श्रध्दांजली ठरेल.चला ताईंना साथ देऊया,साहेबांचे स्वप्न साकार करुया!

श्री.दत्ता ढाकणे-बावीकर
शिक्षक,पञकार
पालघर-poetddl.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस