गुरु परमात्मा परेशु.....माझी गुरु वंदना!

माझी गुरु वंदना....!!
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि
अखंड वाहणारा झरा
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरु म्हणजे आदर्श आणि
प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक
आजपर्यंत कळत - नकळतपणे ज्ञान देणाऱ्या माझ्या सर्व गुरु जनांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे शब्द सुमनांनी वंदन !....!

गुरु आधार
गुरु उदार
गुरु भांडार ज्ञानाचे
गुरु माऊली
गुरु सावली
गुरु वाली जीवनाचे
गुरु स्वाभिमान
गुरु आभिमान
गुरु वरदान देवाचे
गुरु विश्वास
गुरु श्वास
गुरु प्रकाश दावितसे
गुरु आचार
गुरु विचार
गुरु सार जिवनाचे
गुरु वंदना
गुरु प्रेरणा
गुरु साधना शिष्याची
गुरु कृपाळू
गुरु दयाळू
गुरु कनवाळू मातेसमान
गुरु अक्षर
गुरु नश्वर
गुरु इश्वर मानवाचा
गुरु माता
गुरु पिता
गुरु दाता सर्वस्वी
गुरु स्मरावा
गुरु पुजावा
गुरुचे आचरण मनोभावे
गुरु साकार
गुरु निराकार
गुरु व्यापक ञिभुवनी
गुरु सगुण
गुरु निर्गुण
गुरु अवगुण घालितसे
गुरु कष्टती
गुरु तिष्टती
गुरु सोबती आयुष्याचे

श्री.दत्ता ढाकणे-बावीकर
Poetddl.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Principles of Outstanding Classroom Management

The Rage of young Teachers and Government Employees.