कविता
मला हव आहे! निळेनिळे आकाश पक्षांचा थवा हिरवेगार डोंगर अन गारगार हवा झाडांची दाटी बहरलेली शेती पाऊल वाट अन मऊ मऊ माती झुळझुळ पाणी वाहणारे झरे हिरव्यागार रानात चरणारी गुरे नाचणारे मोर गाणारे पक्षी हरणाच्या पाठीवर छानछान नक्षी छोटस घर फुललेली फुले अन पाऊस आल्यावर नाचणारी मुले 📝दत्ता ढाकणे- बावीकर