'सेल्फीस' संघटना!

'सेल्फीस' संघटना!

तालुक्याच्या बाहेर जाण्याची  दहशत वाटते?थोडस जिल्ह्याबाहेरही काम करुन पहा ?*आणि जमलचं तर डिसीपिएसला विरोध करा!

-- दत्ता ढाकणे-बावीकर

    २७/०२/२०१७ रोजी शासनाने जिल्हांतर्गत बदल्यांचे नविन धोरण जाहीर केले आणि हजारो शिक्षकांचे धाबे दणाणले. प्रस्थापित शिक्षक संघटनानी सवयी प्रमाणे विरोध सुरु केला.आवघड आणि सोप्याचा वाद सुरु झाला.सोप्या सुविधा युक्त शाळेत  चिकटून  बसलेल्या आमच्या बांधवांना वस्ती उठण्याच्या भितीने घाम फुटला.आपली शाळा आवघड क्षेञात यावी यासाठी आनेकांनी वरिष्ठ पातळीवर वशिलेबाजी सुरु केली आहे.आता तर आवघड क्षेञात काम करऩारे शिक्षक सोप्या  क्षेञात काम करणाऱ्या शिक्षक बांधवांना हाड वैरी वाटू लागलेत.

स्व:च्या तालुक्यात (होम ब्लॉकमधे) काम करणाऱ्या शिक्षकांचा तर बीपी खालीवर होऊ लागला. पानपट्टीवर, हॉटेलात , शाळेत, केंद्रात, ट्रेन मध्ये एकच चर्चा "कसं हो सर? मला दहा वर्षे झालीत. मी जातोय काय तालुक्याबाहेर",मी उडतोय काय?. आहो गुरूजी तुम्हाला तुमच्याच जिल्ह्यात इतर तालुक्यात जाण्याची व तेथे गेल्यावर होणार्या असुविधेची एवढी काळजी वाटते तर स्वत:च्या जिल्ह्यापासून शेकडो किलोमिटर अंतरावर, परजिल्ह्यात दहा ते पंधरा वर्षापासून सेवा करणाऱ्या शिक्षकाच्या जिंदगीची काय अवस्था झाली असेल? सर्व प्रस्थापीत संघटना एकत्र येऊन या नविन शासन निर्णयाला विरोध करून आपला तालुका वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. बदली अर्ज भरु नका म्हणुन आवाहण करत अहात. सेल्फीच्या वेळीहि आपण किती सेल्फीस झाला होता हे आवघ्या महाराष्ट्राने पाहिले. सेल्फीची कुल्फी करून टाकलीत. तेव्हा आम्ही तरुण शिक्षकांनी तुमचा विचार केला आणि तुम्हाला आम्ही पाठींबा दिला सेल्फी काढली नाही. तो निर्तणय शासनाने मागे घेतला ,आमचे वरिष्ठ शिक्षक बांधव या कामातून सुटले याचा आम्हाला आनंद वाटला.तसेही सेल्फी काढणे आणि अपलोड करणे आमच्यासाठी कठिण नव्हते.आनेक वर्ष पर जिल्ह्यात व दूर्गम भागात काम केल्यानंतर हा बदलीच्या निर्णयाने थोडे हायसे वाटले परंतू तुम्ही यावेळीहि सेल्फीस निघालात. आता पुन्हा  बदली नविन जिआर च्या विरोधात तुम्ही एकवटलात याचीहि तुम्ही वाट लावणारच यात तिळमात्र शंखा नाही.कारण तुम्ही प्रस्थापित अहात.अन स्वार्थी अहात.तुमच्यावर विशेष करुन जून्या लोकांवर वेळ येते तेव्हा तुम्ही प्रखर विरोध करता.कधितरी तरुण शिक्षकांचाही विचार करा.

        दहा वर्षापुर्वी जर तुम्ही सर्व संघटनांनी मिळून डिसीपिएस पेन्शन योजनेला प्रखर विरोध केला असता तर आज शेकडो डिसिपिएस धारक मयत शिक्षकांचे कुटूंब उघड्यावर पडली नसती.डिसीपिएस योजनेला ज्याप्रमाणे तत्कालिन सरकार जबाबदार आहे तेव्हढ्याच प्रमाणात प्रस्थापित शिक्षक संघटनाही जबाबदार आहेत.डिसीपिएस चा निर्णय होत असताना तुम्ही मुग गिळून गप्प बसलात.कारण तुम्हाला काही फरक पडणार नव्हता.तुम्हाला जुनी पेन्शन मिळतेच ना.आज हजारो तरुण शिक्षकांचे जगण्याचे वांदे झालेत.घर चालवावे की डिसीपिएस चे हप्ते भरावेत हा प्रश्न पडला आहे.अकाली निधन झालेल्या शिक्षकांचे कुटूंबीय आक्रोश करत आहेत.शासनाकडून कसलिही मदत मिळत नाही. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी २००५ नंतरचे शिक्षक मोर्चे आंदोलन करत आहेत.तुम्ही माञ मजा पाहत अहात.फोटो पुरते सहभागी होता अन स्वत:च्या नावाने बातम्या देता.किती सेल्फीसपणा हा! डिसिपिएस च्या बाबतीत तुमच्याकडून अपेक्षा करणे आम्ही सोडलेच आहे परंतु बदल्यांच्या बाबतीतही तुम्ही किती स्वार्थीपणा करत अहात हे आम्ही पाहत आहोत. poetddl.blogspot.com

  बदल्यांचा नविन जिआर आला आणि तुम्ही सवयी प्रमाणे तांडव सुरु केले. पाच-पन्नास किमीवर जाण्याची आपणास इतकी भिती वाटत असेल तर चार-पाचशे किमीवर असलेल्या शिक्षकांची काय हालत झाली असेल याची कल्पना आपल्या संघटनांना का येत नाही?तुम्हाला केंद्र,तालुका बदलताना भिती वाटते तर वर्षानुवर्षे गाव व कुटूंबापासुन दूर पर जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या शिक्षकांची काय हालत आशेल? त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात तुम्ही कधि आवाज उठवलात? ते का माणसं नाहीत? जिल्हा बदलीचे जाऊद्या हो पण तुम्हाला केंद्र बदलायची पण भिती वाटते,हे हश्यास्पद आहे. सोप्या क्षेञातील आपलेच काही बांधव तर शाळा नाववर केल्या सारखे वागत आहेत.म्हणे आम्ही शाळेची प्रगती केली डिजीटल केली,आम्ही गेल्यावर शाळेची प्रगती खुंटेल?का होईल अशे? तुम्हच्या जाग्यावर येणारे शिक्षक तुमच्यापेक्षा कामसू असतिल तुम्ही असा का नाही विचार करत. काही वर्ष आवघड क्षेञातिल शाळेवरही काम करुन पहा, डोंगर दऱ्याचिही हवा खाऊन पहा.तुमच्या हूशारिचा डोंगर दऱ्यातिल,पाड्यावरिल लेकरांनाही जरासा लाभ मिळूद्या.आम्ही डोंगर दऱ्यात,पाड्यावर काम करणारे तुमचेच बांधव आहोत.जरा आमचाही विचार करा.आम्ही तुम्हाला अस्पृश्य का?काही लोकांना तर आम्ही आवघड जागेवरचे दूखणे वाटायला लागले आहेत.आवघड क्षेञात काम करऩारे  जवळ ९०% शिक्षक हे २००५ नंतर लागलेले आणि पर जिल्ह्यातिल आहेत.आणि  तरुण तंञस्नेही आहेत.आधक प्रयत्न करुन दूर्गम भागातिल शाळा व विद्यार्थांची प्रगती हेच त्यांचे ध्येय आहे.ऊन वार पवसात पायपिट करुन शाळा नावारुपाला आणली.कधिच तक्रार केली नाही. या शिक्षकांना सिनियर  शिक्षकांविषयी नेहमीच आदर आहे.त्यांनाही वाटते की वरिष्ठ शिकांनी  सुखाने नोकरी करावी,त्यांना  सोईच्या शाळा मिळाव्यात.परंतू ही एक  चांगली संधि आली असताना तुमच्या पोटात का दूखते. हे संघटनेवाले लोक कधि तरुण शिक्षकांसाठी लढले का?डिसीपिएस योजनेला कधि विरोध केला का?

     तुमच्यावर वेळ येते तेव्हा तुम्ही भांडता,स्वत:ची सोय तेव्हढी पाहता.तुमच्यासाठी मोर्चे आंदोलनात आम्हाला पुढे करता.निर्णय बदलण्यासाठी वाट्टेल ते करता. प्रत्येक चांगल्या निर्णयाला विरोध करता.का  जिव्हाळा वाटावा तुमच्याविषयी आम्हाला? २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांसाठी आजपर्येंत तुम्ही काय केले? किती दिवस आमचा वापर करुन घेणार अहात. जिवघेण्या समस्या प्राधान्याने न घेता क्षुल्लक समस्यांना वज्राची ताकद लावताना पाहून पेन्शनग्रस्त व बदलीग्रस्त शिक्षक किती व्यथीत होतो याची आपणास बहुतेक कल्पना नसावी. कल्पना असतीतर नक्की त्याचा विचार आपण केला असता. आपण सगळे शिक्षक जमातीचे. शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढनाऱ्या प्रत्येक संघटनेचा आपल्याला अभिमान असायलाच हवा. माञ तुम्ही आमचा वापर करुन घेता अन आमच्या प्रश्नांकडे दूर्लक्ष करता. जिवघेण्या आजाराने ग्रस्त रूग्नाला तातडीचा उपचार देण्यापेक्षा खरूज,नायटा,गंडेरिया झालेल्यांना सुपरस्पेशॅलीटी उपचार देणे कितपत योग्य आहे? तुम्ही जर अशेच करत राहिले आणि तरुण शिक्षकांच्या समस्या नजरे आड केल्या तप एक माञ नक्की प्रस्थापित संघटनांनो २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांकडे जास्त काळ दूर्लक्ष कराल तर पुढच्या पाच दहा वर्षात आम्हीच असू तेव्हा तुमची दूकानदारी नक्कीच बंद होईल.

   तुम्हाला 'सेल्फीस'म्हणन्याची वेळ आमच्यावर का आली जमलच तर जरा विचार करा.

      मिञहो,अशा सेल्फीस संटनांपासुन सावध रहा,यांना थारा देऊ नका,,,पाहूया यांचे मोर्चे अन अंदोलने कशे यशस्वी होतात?

....दत्ता ढाकणे -बावीकर

ब्लॉगर

बीड/पालघर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस