Writers View! ...पञकार स्वस्थ बसू देत नाही!

Writers View!मनमोकळ! ....पञकार स्वस्थ बसू देत नाही.

    शिक्षकी पेशात असुनही समाजातिल विदारक, अन्यायकारी,चिड आणणाऱ्या गोष्टी पाहून माझे मनं मला स्वस्थ बसू देत नाही. विद्यार्थांना ज्ञानदानाचा वसा तर घेतलाच आहे परंतु समाज्यात  सामाजिक,राजकिय व शैक्षणिक जागृती करण्यासाठी खारिचा वाटा उचलावा यासाठी मागिल आनेक वर्षा पासुन मी लेखणी झिजवित आहे.तसा बालपणापासुनच परखडपणा,आन्याविरोधात चिड आणि हळवेपणा यामुळे कविता लिहीण्याचा छंद लागला.कोणिही गुरु नाही किंवा,कवितेचा वारसा नाही.मला परिस्थितीने कवि बनविले.जे मनाला भावले ते कागदावर उतरविले.समाज्यात घडलेल्या घटना माझ्या हळव्या मनावर घाव घालत होत्या आणि मी लिहीत होतो.गावचा परिसर,शेती,नाते संबंध,माणसांच्या निरनिराळ्या तऱ्हा यावर आनेक कविता लिहील्या.आगदी नववित शिकत असताना बिड आकाशवानिवर कविता वाचनाचे दोन कार्यक्रम झाले.त्या काळात मला दिड हजार रुपये मिळाले होते. ते माझ्यासाठी खुप मोठे होते.आणि तेव्हापासुन लोक मला कवि म्हणायला लागले.तो पर्येंत मी कवि आहे हेच मला माहित नव्हते. अधून मधून मी कथाही लिहायला लागलो.एकदा माझ्या आईचे व भावाचे भांडण लिहून काढले.आणि त्या कथेला नाव दिले 'आमरस'.दोन दिवसानंतर तेच भांडण सर्वांना वाचून दाखविले तर घरातिल व शेजारचे सर्वच ढसा ढसा रडत होते.तेव्हा माझा एक चुलत भाऊ तो म्हणाला 'आरे तु खुपच प्रभावी लिहीतोस तुझ्या शब्दात जादू आहे'. आपण काहितरी लिहीतोय आणि लोकांना ते भावतय हे समजल्यावर मी कविते सोबत कथाही लिहायला लागलो.
    पुढे शिक्षणासाठी गाव सोडाव लागल.२००५ साली मुंबईला आलो.डि.एड चे शिक्षण घेत असतानाच जिवनाला एक नवे वळण मिळाले.शिक्षक होण्यासाठी डि.एड करत होतो आणि झालो पञकार.कारण मन स्वस्थ बसू देत नव्हते.अभ्याबरोबरच कविता व लेखही लिहीत होतो.मिञाच्या मदतिने एका नवोदित संपादकाला माझे लेखन शैली आवडली आणि मला थेट संपादकिय लिहीण्याची वॉफर मिळाली.आवाहण मोठे होते.नवि मुंबई सारख्या महानगरात पञकाकिता करणे आणि संपादकिय लेखन करणे धाडसाचे आणि आवाहणात्मक काम होते.परंतु मनात विश्वास होता, आणि काहितरी करुन दाखविण्याची जिद्द होती.आवाहण स्विकारले आणि झालो पञकार.त्या काळी आणेक विषयावर लेखन केले.आगदी कमि वयात म्हणजे बाविसाव्या वर्षी मी संपादक झालो.माझ्यासाठी हा अनूभव आनंददायी अन अनपेक्षीत होता.एकिकडे डि.एड चे कॉलेज अन एका बाजूला पञकारिता.दोन्हीही महत्वाचे.आगदी धावपळ होत होती. डि.एड इंग्रजी माध्यमात शिकत होतो.मी पास होईल की नाही अशे खुद्द माझ्या शिक्षकांनाच गँरंटी नव्हती.कारण आम्ही वॉन्टेड विद्यार्थी होतो.पण लक्ष माञ विचलित नव्हते.अभ्यास करत होतो हे माझ्या शिक्षकांना काय ठाऊक.आणि मी कॉलेज मधून दूसरा आलो.सर्व प्रध्याप पाहतच राहिले.कारण मनात जिद्द होती.जे ठरवले ते मिळवायचेच.त्या काळातच प्रति विषयी प्रिती ही जुळली होती.परंतू तो विषय जरा वेगळा आहे.
    पुढे पञकारितेत नाव होत गेले.आणि एका इंग्रजी दैनिकात चांगल्या पगाराची ऑफर मिळाली.आणि त्या वर्तमानपञात पञकारिता करु लागलो.तेव्हा आमचा ढंग निराळाच होता.हतात कँमेरा अन डायरी.खुप लिहीले आनेक गंभिर विषयावर लेखन केले.भट नावाचे संपादक लाभले खुप शिकायला मिळाले.ऱाजकीय,सामाजिक,कला क्षेञातिल आणेक मोठ्या लोकांना भेटण्याचा योग आला.गोपिनाथ मुंढे,आर.आर.पाटील,राज ठाकरे,नितीन गडकरी,गणेश नाईक,अशोक सराफ,निवेदिता सराफ,प्रविण दवणे,मंगेश पाडगावकर,सुनिल सेट्टी.अक्षय कुमार इत्यादी मोठ्या लोकांना प्रत्यक्ष भेटता आले.मुंढे साहेबांनी पाठीवर ठेवलेला हात आजही लिहीण्याचे बळ देत आहे.मुंबईने खुप काहि शिकविले.प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीक कशे स्त:ला सावरावे याचे भान दिले.निर्भीडता शिकलो.पञकारितेचे आणेक धडे मिळाले.आणि इंग्रजीही शिकलो.आनेकदा वादही ओढले.परंतू प्रमाणिकपणे काम केले.आता डि.एड संपले होते अन मुंबईत मन रमले होते.पञकारिता ऐन भरात होती.परंतू नियतिला हे मंजूर नव्हते.पुन्हा एकदा जिवनाला नवे वळण मिळाले.माझी आई 'बाई' आम्हाला सोडून गेली.आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झालो.बाप तर पाहिलाच नव्हता परंतु बाईच आमच्यासाठी बाप होती.दुःखाचा डोंगर कोसळला.मुंबई सोडून बावीला-गावी जावे लागले.बाई गेली,आता पुढे काय? सर्वांनी हट्ट धरला तू पञकारिता सोड शिक्षकाची नोकरी कर.आपली सरकारी नोकरी बरी ती हक्काची अन कायमची भाकरी असते.शिक्षक हो लग्न कर आणि सुखाने रहा.बंधू व बहिणींच्या हट्टा खातर नाईलाजाने पञकारिता सोडावी लागली.आणि मी शिक्षक झालो.पालघरला आलो.लग्न झाले.
   नोकरी छानपैकी सुरु आहे.संसार सुखाचा आहे.कविताही अधून मधून लिहीतो.माञ पञकारितेचा किडा माञ वळवळ करतोच.आमच्या शिक्षण क्षेञातही बऱ्याच चांगल्या अन वाईट गोष्टी घडतात.त्या जगासमोर येत नाहीत.मी माझ्या संपर्काच्या माध्यमातून आनेक शिक्षक व शालेय उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे काम करत आहे.आनेकदा अनागोंदी सुरु असते.त्यावर प्रखड लिखान करण्याचा मानस आहे.मर्यादा येतात परंतू अन्याय सहन होत नाही.मनाला खटकले ते लिहीतो.मनमोकळ करण्यासाठी ब्लॉग सुरु केलाय.माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी सामाजिक,शैक्षणिक व राजकिय विषयांवर परखडपणे लिहीत आहे.विविध दैनिकात लेखन सुरु आहे.वाचकांना माझे लेख आवडतात.महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून वाचकांचे फोन येतात.शिक्षक आहे पण माझ्यातला पञकार मला स्वस्थ बसू देत नाही.पाहूया पुढे काय होतय ते.बरचं काही सांगायचं आहे,वेळोवेळी भेटत राहूच.

    ब्लॉगर-दत्ता ढाकणे-बावीकर
poetddl.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Principles of Outstanding Classroom Management

The Rage of young Teachers and Government Employees.