पीएमजी एकदा येऊन जा....

      पीएमजी एकदा येऊन जा...

उदंड झाले परदेश दौरे
पीएमजी एकदा येऊन जा...
इंडिया साठी बरेच आणले
भारतालाहि काही देऊन जा...
बराच झाला विमान प्रवास
अन बरेच भेटले व्यापारी
एकदा आम्हा शेतक-यांनाही भेटून जा...
दुष्काळात होरपळनारं
माझ शेतही एकदा पाहून जा
जमलच तर एकदा दुबार पेरणि करुन जा....
ऐकलय तुम्ही करोडो वाटलेत
शिल्लक आसतिल तर
माझ सावकारी कर्ज तेव्हड फेडून जा...
पुष्कळ झाल्या मनाच्या बाता
चर्चा तर निष्फळ झाल्या
नूसत्या चहाने का पोट भरतं?
जमलंच तर थोडसं विष देऊन जा...
मेक इन इंडिया चे दिले नारे
काळ्या धनाचे घबाड आनले?
माझ्या गावातही एखादा प्रकल्प देऊन जा....
भूसंपादनाची काळजी नको
आख्ख वावर
फ्री मध्ये घेऊन जा...
गोळ्या घालायची तर गरजच नाही
आमच्या आत्महत्या पाहून जा...
जमलच तर
तुम्हीही एखाद्या झोपडीत जेऊन जा
भिति नाही मरनाची
काळजी वाटते लेकरांची
माझ्या झोपडीलाही
एखादे डीजिटल लॉकर देऊन जा...
जाता जाता
अनाथ पोरकी लेकर पाहून जा
डोळ्यात आसवं आणायची गरज नाही
फक्त एकच करा
तुमच्या त्या "अच्छे दिना''चे काय झाले
तेव्हडचं लोकांना सांगून जा.....

कवि--दत्ता ढाकणे बावीकर
शिक्षक ,पञकार -पालघर
९८७६०६२३९८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Principles of Outstanding Classroom Management

The Rage of young Teachers and Government Employees.