१४ डीसेंबर "आक्रोश" न्याय हक्कासाठी!

१४ डीसेंबर "आक्रोश" आपल्या न्याय हक्कासाठी!

स.न.वि.वि...
   महाराष्ट्रातील तमाम शिक्षक व कर्मचारी बांधवांना सप्रेम नमस्कार!
मिञहो! जुनी पेन्शन मिळावी यासाठी राज्यातील तमाम शिक्षक,कर्मचारी बंधु भगिनी जिवाचे रान करत असताना आम्ही मागिल काहि दिवसात येवढे थंड का होतो हे कळत नाही.सध्या थंडीचे दिवस आहेत पण वातावरण म्हणावे तेव्हढे थंड नाही तरिही आम्ही चादर पांघरुन घेतली होती,आम्ही झोपेत आसलो आसतो तर ते ठिक होते पण आम्ही झोपेचे सोंग घेतले होते याचा आम्हाला मनस्वी खेद वाटत आहे.
   जुनी पेन्शन मिळावी यासाठी आपले बांधव ''आक्रोश'' करत असताना आम्ही मुग गिळून गप्प का आहोत? आम्हाला  आमच्या भविष्याची चिंता नाही काय?लढणारे लढतिल , त्यांना मिळाले तर आपल्यालाही मिळेल हि वृती आम्ही स्वीकारली काय? आमचे काहि dcps धारक बांधव अकाली संसार,मुलबाळ उघड्यावर सोडून गेलीत.त्यांच्या दु:खाचा आक्रोस पाहून आमचे मन व्याकुळ होत नाही काय? का आमच्या संवेदनाच बोधट झाल्यात? का आम्ही बांगड्या भरल्यात? ( आता हे अशे बोलता येनार नाही कारण आमच्या भगिनी या लढ्यात आग्रेसर होताना दिसत आहेत) हे अशे आनेक प्रश्न मनाला सतावत आहेत. आम्ही येवढे बेफिकीर का झालो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
     मिञहो!मनावरचे सर्व मळभ दुर सारुन आम्ही आता खडबडुन जागे झालो आहोत.लढण्यासाठी,नवा इतिहास निर्माण करण्यासाठी.आमच्या बांधवांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही आता लढनार आहोत.आमच्या भविष्यासाठी,निवृती नंतरचे जिवन सुरक्षीत करण्यासाठी.मिञहो! तुम्ही लढतच अहात आम्ही तुम्हाला सांगणे योग्य वाटत नाही.तरिही कळकळीचे अवाहन करतो की या सामिल व्हा.
   मिञहो!dcps  हटवुन जुनी पेन्शन लागु व्हावी यासाठी 'जुनी पेन्शन हक्क कृती समिती/संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यात आंदोलनाने जोर धरला आहे.येन थंडीच्या दिवसात वातावरण गरम झाले आहे.राज्यातिल सर्वच जिल्ह्यात मोर्चे, निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाला धार मिळत आहे.
   मिञहो! लढल्या शिवाय काहीच मिळत नाही हे आपन जानताच.म्हणुन आपल्याला लढायचे आहे.आपल्या संघटनेचे कार्यकर्ते आगोदर पासुनच कामाला लागले आहेत.त्यांना आपन साथ द्यायला हवी.आपल्याला कामे भरपुर असतात तरिही हे आपले स्वत:चे कार्य आहे त्यात आपला सहभाग हवाच.
    मिञहो! नागपुरला हिवाळी आधिवेशन हेत आहे.याचे औचित्य साधून आपन १४ डीसेंबर या दिवशी आपल्या न्याय मागणिसाठी "आक्रोश ''मोर्चा काढत आहोत.ही आपली शक्ती आणि एकता दाखवुन देण्यासाठी हि एक मोठी संधी आहे.शासनाला जागे करण्यासाठी आपन आगोदर जागे व्हायला हवे.तरच शासन आपल्या मागणिचा विचार करेल.
   मिञहो! आपल्याला लढायला हवं,एकञ येवुन आक्रोश आंदोलन यशस्वी करायला हवं.तरच आपला प्रभाव पडेल .तर आणि तरच आपन उभे केलेले कार्य आणि आपली संघटना तग धरुन राहिल.जर आपल्या आंदोलनाचा फज्जा उडाला तर संघटनेचा पोरखेळ होईल.काहि प्रस्थापित संघटना आगोदरच आपल्यावर दात खात आहेत.आपली एकता आणि संघटन त्यांना पाहवत नाही.मिञहो! आम्ही आपनास कळकळीचे आवाहन करतो की १ दिवस फक्त १ दिवस आपन आपल्यासाठीच वेळ काढून ''आक्रोश'' आंदोलनात सहभागी व्हा आणि आपल्या मिञांनाही सहभागी होण्यास प्रवृत करा.येरवी आम्ही तुमच्यावर सक्ती करणार नाही.आपल्याच हतात आहे आपलेच आंदोलन यशस्वी करणे.हे आंदोलन यशस्वी झाले तर आपली जुनी पेन्शन ची मागणि लवकरच मान्य होईल.आपली शक्ती पाहून शासनाला योग्य निर्णय घ्यावाच लागेल.
  मिञहो! आम्ही तर लढतच आहोत तुम्ही ही साथ द्यावी हि विनंती.
१४ डीसेंबर विसरु नका "आक्रोश" आपल्या न्याय हक्कासाठी,
so! be united fight and achieve..,एकञ या लढा मिळवा.
Help/join जुनी पेन्शन हक्क कृती समिती/संघटन to help you.
    
   आपलाच शिक्षक मिञ
श्री.दत्ता ढाकणे-बावीकर
पालघर प्रशिद्धी प्रमुख
जुनी पेन्शन हक्क कृती समिती/संघटना

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस