राजकिय क्रिकेट.....झेडपी मनपा ट्वेन्टी ट्वेन्टी.......

   १.            राजकिय क्रिकेट.....!    

     झेडपी मनपा ट्वेन्टी ट्वेन्टी
     विधानसभा वन्डे आहे
     लोकसभेच्या कसोटी आधि
     सध्या रंगित तालिम आहे
कोण होईल क्लीन बोल्ड
कोण रन आऊट
कोण करिल फटकेबाजी
कोणाची गुगली अन कोणाची विकेट
      कोण धुरंधर,कोण नवखे
      कोण 'लंबी रेष का घोडा'आहे
      कोण कागदि वाघ
      कळेल कोण किती पाण्यात आहे
कोण एक नंबर कोण दोन नंबर
कोण मोठा अन कोण लहान आहे
नोटबंदि की नसबंदी
कळेल कोणाची हवा आहे
      कोण होईल मॅच विनर
       अन कोणाचे पाणिपत होईल
       हा राजकिय सामना आहे
       याचा निर्णय जनताच घेईल
कोणावर लागेल बोली
कोण आगोदर फिक्स आहे
हा एमपीएल सिजन २०१७
सर्व खुर्चीचा खेळ आहे

दत्ता ढाकणे-बावीकर.......✍

२.   सीजन इलेक्शनचा

इलेक्शनचा सीजन हा
लढाई खुर्चीची आहे
आता नाहीतर कधिच नाही
सुगिचा हा काळ आहे
पळवापळविचा खेळ येथे
नाराजांचा उत आहे
टिकीटासाठी चमचेगिरी
पुढाऱ्यांचा बाजार आहे
एक म्हणतो गद्दार
एक म्हणतो ह्रदय परिवर्तन
गल्ली ते दिल्ली गोंधळ
टिकीटासाठी काय पनं
घोडेबाजार तेजित येथे
जो तो बोली लावतो आहे
कालचा निष्ठावंत
आज गद्दाराच्या यादित आहे
आश्वासनांचा पाऊस
कार्यकर्यांची माञ चंगळ आहे
प्रचाराच्या धुळवडीत
जनचा बिचारी हैरान आहे
सत्तेचा खेळ हा
पुढाऱ्यांचा जुगार आहे
लोकशाहीच्या नावाने
शिमग्याआधी बोंबाबोंब आहे
विकासाचे गोंडस नाव
घरभरणी सुरु होते
जनतेला वाली नाही
यांची माञ लालेलाल असते
कोठे कसला विचार नाही
तत्वांची होळी आहे
एकमेकांचे वस्ञहरण
राजकारण याचे नाव आहे

दत्ता ढाकणे-बावीकर
सफाळे-पालघर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Principles of Outstanding Classroom Management

The Rage of young Teachers and Government Employees.