बिड जिल्ह्यातिल जनतेला 'ग्राम विकास'नको आहे का!

                मागासलेपणाच्या सवयीमुळे बिड जिल्ह्यातिल जनतेला 'ग्रामविकास' नको आहे का!

                                                                                            ब्लॉगर- दत्ता ढाकणे-बावीकर

         काल टि.व्ही वर निवडणुकांचे निकाल पाहत असताना 'ग्रामविकास मंञी पंकजा मुंढे यांचा राजिनामा', ही ब्रेकिंग न्युज कानावर पडली.क्षणभर विश्वास बसला नाही परंतु पंकजा ताईंचा हताश व उद्विग्न चेहरा पाहून बिड जिल्ह्यातिल जनतेबरोबरच राज्यातिल करोडो लोक जे  मुंढे साहेबांच्या विचारांना मानतात त्यांना अनपेक्षित धक्का बसला.राजिनाम्याचे वृत्त ऐकुन बिड जिल्ह्यातिल सामान्य युवक युवति जे नोकरी-धंद्या निमीत्त पर जिल्ह्यात राहतात परंतु ज्यांना आपल्या जिल्ह्याचा विकास हवा आहे त्या प्रत्येक सामान्य तरुणांच्या मनात माञ एक प्रश्न निर्माण झाला  'मागासलेपणाच्या सवयीमुळे बिड जिल्ह्यातिल जनतेला 'ग्रामविकास नको आहे का? Poetddl. blogspot.com
      हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे,इंग्रजा नंतर रजाकाराच्या जाचातुन सुटल्यानंतर  प्रबळ राजकिय नेतृत्वा अभावी आणेक दशकं मागास व विकासापासुन कोसो दूर राहिल्यानंतर बिड जिल्ह्यातिल जनतेला स्व.गोपिनाथराव मुंढे साहेबांच्या रुपाने समर्थ व प्रबळ राजकिय लोकनेता लाभला होता.मुंढे यांचा राजकिय पटलावर उदय होण्याआधि बिड जिल्ह्याला नव्वदच्या दशका आगोदर आनेक लोक प्रतिनिधी लाभले परंतु सरंमंजायी वृत्तीमुळे स्वता:च्या परिवारापलिकडे त्यांना काहि दिसलेच नाही.भोळ्याबाबड्या,मागास जनतेला अंधारात ठेवुन त्यांनी संस्थाने थाटली.कसला विकास आणि कसली लोकशाही?गुंडगिरी व पैशाच्या व जातीच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जायच्या.पोटाची खळगी भरण्यापलिकडे लोक विचार करत नव्हते.मजुरी अन लाचारी रक्तात भिनली होती.फेकलेल्या टुकड्यावर जगण्याची सवय लागली होती.सुख सविधा,व विकास हे शब्द ऐकायलाही मिळत नव्हते.अशा काळात गोपिनाथराव मुंढे साहेबांचा उदय झाला.जिल्ह्यतिल विकासापासुन वंचित व र्षानुवर्ष मागास व लाचारित जिवन जगत असलेल्या जनतेला त्यांनी राजकिय व लोकशाहिच्या दृष्टीने जागृत केले.ऐतिहासिक संघर्ष याञा काढली.प्रस्थापित व भ्रष्टाचारी व गुंड प्रवृत्ति विरोधात आवाज उठवला.सत्तेच्या बळावर जनतेला लुबाडणाऱ्या लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा जनते समोर आणून जिल्हा वासियांचा स्वाभिमान जागृत करुन संघटित केले.राज्यात सत्ता परिवर्तन केले.गोरगरिब,मजुर,ऊसतोड करणाऱ्या सामान्य जनतेच्या हतात सत्तेच्या चाव्या दिल्या.जातिपातीच्या राजकारणाला मुठमाती देऊन गरिब वंचित समाजातिल आनेक युवकांना सरपंच पदापासुन ते मंञी पदं दिली.उपमुख्यमंञी असताना मुंढे साहेबांनी जिल्ह्यात विकासाचे पर्व सुरु केले.ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशि हेटाळणी होत असलेल्या बिड जिल्ह्यात साखर कारखाने सुरु केले.गोरगरिबांच्या लेकरांना नोकऱ्या मिळवून दिल्या.शिष्यवृत्ती योजना सुरु केल्या.कोणत्याही आंदोलन व लढ्याशिवाय वंजारी समाजाला आरक्षण मिळवून दिले.ग्रामिण भागाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी आनेक योजना सुरु केल्या.विकाल करताना कधि जातपात मानली नाही,ग्रामिण भागातिल जनतेला ताठमानेने जगण्याची प्रेरणा दिली.आनेक वर्ष सत्तेच्या बाहेर राहूनही लोकसेवेला वाहून घेतले.जनतेला आधार दिला,स्वप्न दिली.कधि भेदभाव केला नाही.व लोकनेते पदाला पोहचले.गोपिनाथ मुंढे ही व्सक्ती न राहता एक विचार झाले.आनेक संघर्षा नंतर योगायोगाने पुन्हा सत्ता मिळाली दोन हजार चौदा साली केंद्रात ग्रामविकास मंञीपद मिळाले.आणि पुन्हा एकदा बिड जिल्ह्याला चांगले दिवस येणार होते.साहेबांनी बिड जिल्ह्यातिल  ग्रामिण भागाच्या विकासासाठी मोठी योजना आखली होती. परंतु जिल्ह्याच्या नशिबात विकास नव्हताच. नियतिने मुंढे साहेबांना हिरावुन नेले.सामान्य जनता पोरकी झाली.बाप गेल्यासारखे जनतेला दु:ख  झाले.आवघा महाराष्ट्र हळहळला.बिड जिल्हा पुन्हा पोरका झाला,मागासलेपण व लाचारी अन मजुरी नशिबी लिहीलेलीच होती.जिल्हा पुन्हा २५ वर्ष मागे गेला.
     आता विकास नशिबी नाही व सर्वसमावेशक नेतृत्वही नाही अशे वाटत असतानाच.जनतेचे मन एका स्ञि शिवाय कोण समजू शकणार होते.आणि जनतेला सावरण्यासाठी,त्यांचे आश्रु पुसण्यासाठी एक रणरागिनी पुढे सरसावली.'मी जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही,गेलेली सत्ता पुन्हा जनतेच्या पायावर आणुन ठेविन,गोपिनाथ मुंढे हे नाव जगाला विसरु देणार नाही,सामान्य जनतेची मी आई होईल.अशि गर्जना करत पंकजा गोपिनाथ मुंढे यांनी हताश झालेल्या जनतेला सावरले.पुन्हा संघर्ष याञा काढली.गावोगावी जाऊन जनतेला दिलासा दिला.मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द दिला.अल्पावधितच मोठे संघटन ऊभा केले.आहोराञ मेहनत घेऊन गेलेली सत्ता पुन्हा जनतेला मिळवून दिली.दिलेला शब्द खरा केला.ग्रामविकास,जलसंधारण व महिला व बालविकास या सारखे महत्त्वाची खाति मिळविली आणि जिल्ह्यासहित राज्यभर विकास कामाचा धडाका सुरु केला.poetddl. blogspot.com
        दोन अडिच वर्षाच्या कालावधितच बिड जिल्ह्यातिल ग्रामिण भागात हजारो किमी.च्या रस्त्याची कामे केली.जिल्ह्यातुन राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी मिळवून दिली.साठ वर्षापासुन खितपत पडलेला जिव्हाळ्याच्या रेल्वे मार्गाला दोन वर्षात दिड हजार कोटी रुपये मिळवून दिले.जिल्ह्यातिल शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर करुन दिला.जलयुक्त शिवार योजनेतुन ग्रामिण भागात अभुतपूर्व हरित क्रांती घडवून आणली.मागेल त्याला शेततळे दिले.कुपोषन मुक्ती साठी आमृत आहार योजना सुरु केली.गोर गरिब वंचितांच्या लेकरांना पोष्टीक आहार सुरु केला.महिला सशक्तीकरणासाठी विशेष प्रयत्न केले.बचत गटाला चालणा द्ण्यासाठी विशेष पँकेज देऊ केले.जिल्ह्यातिल अतिरीक्त शिक्षकांचा प्रश्न सोडवून त्यांचे संसार पुन्हा उभे केले.बहिन खासदार डॉ.प्रितमताईंने जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक अशे आरोग्य शिबीर भरवुन आनेकांना नविन जीवन दिले.दोघी बहिणिंनी जिल्ह्यात विकास गंगा सुरु केली.सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन करोडो रुपयांच्या योजना सुरु केल्या.लोकनेते मुंढे साहेबांच्या स्मरणार्थ भव्यदिव्य गोपिनाथ गडाची निर्मीति केली.विविध तिर्थ क्षेञांच्या विकासासाठी करोडो रुपये मंजुर केले.भगवान गड,नारायन गड,गहिनीनाथ गडांच्या विकासाला प्राधान्य दिले.राजकारण ,समाजकारण व भक्तीमार्गाची सांगज घालून जिल्ह्या एक नविन सर्वसमावेशक विकासाची परंपरा सुरु केली.जिल्ह्यातिल जनतेला दुसऱ्याकडे हात पसरावे लागु नये म्हणुन विकासाला प्राधान्य दिले.ऊसतोड मजुरांच्या कल्यानासाठी गोपिनाथ मुंढे यांच्या नावाने महामंडळ सुरु केले.आणि हतातील कोयता काढून पुस्तक देण्याची शपथ घेतली.विकास कामाबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या सुख दुखात सहभागी होऊन त्यांना प्रेरणा दिली,दिलासा दिला.मुंढे साहेबांचे ग्रामिण विकासाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आहोराञ मेहनत घेतली आणि अल्पावधितच रणरागिनी लोकनेत्या म्हणुन मान्यता मिळविली.बिज जिल्हा,मराडवाडा  व राज्यातिल गोरगरिब,वंचित बहूजन समाज ताईंच्या पाठीमागे खंबिरपणे उभा राहिला.भगवान गडावरुन आपली जनशक्ती दाखवुन प्रस्थापित व विरोधकांना घाम फोडला.ओबिसीच्या नेत्या म्हणुन पुढे आल्या.
        येव्हढे सारे काही घडत असताना,जिल्हा व राज्याचे नेतृत्व करत असताना स्वत:च्या घराकडे माञ किंचीत दुर्लक्ष झाले.सर्वसमावेशक विकास करत असताना भ्रष्टाचाराला थारा दिला नाही.आणि वैयक्तीक कामांपेक्षा सर्व जनतेच्या हिताला प्राधान्य दिले.वैयक्तीक कामे होत नसल्याने आणि काळे धंदे बंद केल्यामुळे आणेक लोक दुखावले गेले.लोकांच्या वैयक्तीक आशा-आकांक्षा वाढत गेल्या त्या पुर्ण न झाल्यामुळे आणि स्वपक्षातिल विरोधकांमुळे जिपच्या निवडणूकित स्वत:च्या परळी मतदार संघात आणि जिल्ह्यात म्हणावे तशे यश मिळाले नाही.परळी मतदार संघात तर एकही जागा जिंकता आली नाही.याचे दुख आणि उद्विग्नतेतुन ताईंनी राजिनामा देण्याचे टोकाचे पाऊल उचलले. म्हणजे लोकांना विकास नको आहे.फक्त वैयक्तीत स्वार्थापोटी काही लोक विकासभिमुक नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचे पाप करत आहेत.
संपुर्ण राज्यातिल जनता विकासाला मतदान करते आणि बिड जिल्हा वैयक्तीक स्वार्थ आणि जातिपातिच्या बूरसटलेल्या विचारांना कवटाळून बसला आहे.जे मुंढे साहेबांच्या बाबतित घडले तेच पुन्हा घडत आहे.साहेबांचे नेतृत्व देशभरात मान्यता पावत असताना जिल्ह्यातिल जनतेने माञ साहेबांनाही पुर्णपणे कधि कौल दिला नाही.यामुळे बिड जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही.आणि सत्तेपासुन जनतेला दूर रहावे लागले,विकासापासुन वंचित रहावे लागले.आणि आजही तेच घडत आहे.पंकजाताई मुंढे यांची राज्यात क्रेज आहे.बहूजनांचे विकासभिमूक तरुण नेतृत्व म्हणुन त्या पुढे येत आहेत.त्यांच्या शब्दाला समाजात वजन आहे.साहेबांचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.त्यांच्या नेतृत्वात बिड जिल्हा प्रगती करत आहे.चोविस तास जिल्ह्याच्या विकासाचाच विचार करत असतात.तरिही या उद्विग्नतेतून हताश होऊन नेतृत्वाला राजिनामा देण्याची वेळ येते,हे फक्त बिड जिल्ह्यातच घडू शकते.कारण आम्हाला मागासलेपणाची सवय जडलेली आहे?आम्हाला गुलामी व लाचारी करण्याची सवय लागली आहे?आम्हाला विकास नको आहे?, आम्हाला विकासाचे वावडे आहे?.अशावेळी मनात एक प्रश्न निर्माण होतो,बिड जिल्ह्यातिल व परळीच्या जनतेला ग्राम विकास नको आहे का? लेकसभेला व विधान सभेच्या वेळी भरभरुन दिलेत आणि आता सत्तेची विकासाची फळ खाण्याची वेळ आली तेव्हा हा आत्मघातकी पणा का? poetddl.blogspot.com
     बिड जिल्ह्यातील व परळीच्या या जनतेला विचारावेशे वाटते की,पंकजा ताईंचे काय चुकले?एक स्ञि असुन सुद्धा स्वत:चा संसार वाऱ्यावर सोडून जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतले ही चूक आहे का?भ्रष्टाचार व काळे धंद्याला थारा दिला नाही,सर्वसमावेशक विकासामुळे तुमची वैयक्तीक कामे केली नाहीत ही चूक आहे का? जरा स्वत:च्या मनाला विचारा.आणखी किती दिवस दूसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणार अहात? आपल्या रक्तात मागासलेपण,ऊसतोडणी,लाचारी अन मजूरी भिनलेली आहे त्यामुळेच तुम्हाला विकासाचे सुख नको आहे का?इतर जिल्ह्याकडे जरा पहा,डोळ्यावरची झापड काढा.किती दिवस टूकड्यावर जगणार अहात.स्वाभिमान जागा करा.बाटली अन हडकाच्या टुकड्यासाठी स्वाभिमान गहान ठेवू नका.तुम्हाला दारिद्र्याचा व नेतृत्वाचा शाप आहे का? तुमचे नेतृत्व तुमच्या सर्वांगिन विकासाचा विचार करत असताना तुम्ही हात बळकट करायला हवेत,तुम्ही तर पाय खेचताय.बिड जिल्ह्याचे वैशिष्ट्य 'उसतोड कामगारांचा जिल्हा'अशे जेव्हा कानावर पडते तेव्हा तुम्हाला लाज नाही का वाटत? की पश्चीम महाराष्ट्रात जावून उस तोडताना अभिमान वाटतो? काही लोक तुमची दिशाभूल करत आहेत.ज्यांनी शहर लुबाडली व आणि पुणे,पिंपरी चिंचवड मध्ये स्वत:चे पाणिपत करुन घेतले त्यांची किती दिवस गुलामी करणार अहात? बुडत्याला साथ देऊन वाटोळे करुन घेऊ नका.आपल्या लेकराबाळांच्या भविष्याचा विचार करा व सक्षम विकास करणाऱ्या नेतृत्वाला साथ द्या,हात बळकट करा.पंकजा ताईच्या रुपाने जिल्ह्याला मुख्यमंञी पद मिळेल हे लक्षात ठेवा.हे नेतृत्व संपले तर तुमच्या पुढील पिढ्यांना पुन्हा बारामतिची गुलामी करावी लागेल हे माञ नक्की.
             ब्लॉगर-          दत्ता ढाकणे-बावीकर
                                  Poetddl.blogspot.com
                                  9867062398
   
   

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस