तरुणांनो आपले मत विकू नका!

    मतदारांनो आपले मतं विकू नका!

    ग्रामपंचायतिच्या निवडणुका जाहिर झाल्या तशे ग्रामिण भागातिल वातावरण तापू लागले आहे.पारावर,चावडीवर व चौकाचौकात गप्पांचे फड रंगु लागले आहेत.'गावचा सरपंच कोण होणार? आमदार -खासदारकिच्या निडणूकिपेक्षाही ग्रामपंचायतिच्या निवडणुकिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.गावा गावात निडणुकिचा जोर शिगेला पोहचला आहे.याला कारण म्हणजे या वर्षिच्या ग्रामपंचायतिच्या निवडणुक खऱ्या अर्थाने वेगळ्या आहेत.एक तर सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतून होणार आहे आणि गावातिल जनतेचा कौल कोणत्या नेत्याच्या व पार्टीच्या बाजूने आहे हे समजणार आहे. ग्रामपंचायतिला सक्षम करण्यासाठी व ग्रामिण भागाचा विकास करण्यासाठी  करोडो रुपये अनुदान मिळणार आहे.यामुळे गावाचा कारभारी आपण व्हावे यासाठी गावातल्या पुढाऱ्यांनी चंग बांधला आहे.हौसे नवसे गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत. सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतुन होणार असल्यामुळे गावातिल जनता कोणाच्या बाजूने आहे याचा निकाल लागणार आहे.यामुळे कधि नव्हे येव्हढे महत्व  यावर्षि निवडणुकिला  प्राप्त झाले आहे. 
        गावातिल जनता आपल्याच बाजूने आहे' हे दाखविण्याची नामी संधि या निमित्ताने गावच्या पुढाऱ्यांना व राजकिय पक्षांना मिळणार आहे. यामुळे साम,दाम दंड,भेद या ञिसुञीचा सर्रास वापर होणार आहे.ओल्या पार्ट्याचे तर गावा गावात 'धाबे' दणानले आहेत,हौसफुल आहेत.गावा गावातिल युवा नेते,दादा,भैया,आण्णा,मामा सगळे सरपंच हेण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.राजकिय पक्ष,विकास आघाड्या,परिवर्तन पँनल ,आमुक तमूक सगळे गाव ताब्यात घेण्यासाठी मतदारांच्या पाया पडू लागले आहेत.या निवडणुकिच्या हंगामात खरी कसोटी लागणार आहे ती म्हणजे मतदारांची.नेमक मतं द्याव कुणाला? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.गावची निवडणुक म्हणजे 'घर एक पार्ट्या आऩेक' असा प्रकार असतो.एका पार्टीत दादा तर दुसऱ्या पार्टीत ताई,एकिकडे बाप तर दूसरिकडे पोरगं, एकिकडे मावशी तर दुसरिकडे मामी,एका पँनलमध्ये भावकी तर दूसऱ्या पँनलमध्ये नातेवाईक, नेमकं मतदान करावे तरि कुणाला? हा यक्ष प्रश्न मतदारांसमोर असतो.मग मतदान जवळ येईल तशे सुरु होतात हेवे दावे,राडे,फोडा फोडी अन पळवा पळवी.घरा घरात आणि गल्लोगल्लीत भांडणं. फुकटचा तमाशा,रोज बिना तिकीट लोकांचे मनोरंजन.शेंबड्या पोरापासुन तर टेकलेल्या म्हताऱ्या पर्येंत सगळीकडे राजकारण,'हा' कोणत्या पार्टीचा 'तो' कोणत्या पार्टीचा.  गावात चार चौघात बोलताना आनेक नजरा संशयाच्या नजरेने पाहत असतात.मिञ,नातेवाईक इत्यादींसोबत बोलण्याची तर चोरीच झाली आहे.बोलताना दिसला की हा फुटलारे! याच्याकड जरा लक्ष ठेवा.या निवडणुकिच्या काळात माणसांकडे माणूस म्हणून पाहिलच जात नाही.आपल्या पार्टीचा आशेल तर तो आपला नाहीतर विरोधक! मग तो सख्खा भाऊ का आशेना.गावातिल पुढाऱ्यांना हेच हवे असते .आपसात भांडण लावायची अन आपली पोळी भाजायची. पार्टीला मत नाही केले तर याचा बांध फोड त्याचा बांध फोड.घराघरात भांडण लावून द्यायची. परंतु जनतेने जागृत असायला हवे.निवडणुका येतील व जातिल आपले नातेवाईक,मिञ भावकीशि उगाच वैर घेऊ नका.जात पात धर्म पंथ या गोष्टी घरापुरत्या मर्यादित ठेवा.सोशल मिडीयांसारख्या धारदार अस्ञाचा विधायक समाजपयोगी कार्यासाठी वापर करा.तुमची कमजोरीचा गैरफायदा घेऊन गावचे पुढारी तुम्हाला मोठ्या संकटात ढकलत आहेत.
           अशा परिस्थितीत मग मतदान करावे तरि कुणाला? या निमित्ताने मतदारांना व विशेषत: युवा पिढीला आवाहण करावेशे वाटते की, मतदान करताना जरा आपल्या भविष्याचा विचार करा.स्वातंञ्य मिळून सत्तर वर्ष उलटले तरिही जर तुमच्या गावात विज पाणी रस्ते या पायाभूत सुविधांच्या अश्वासनावरच निवडणुका लढवल्या जात असतिल तर हे लोकशाहित मतदार म्हणून आपलेच आपयश आहे.वर्षानुवर्ष गावाचि सत्ता उपभोगून जर गावात साध्या पायाभूत सुविधा देऊ न शकणाऱ्या लोकांना आपण मतदानच का करतो? जरा नगर पुणे जिल्ह्यातिल गावे पहा,आणि आपण कुठे आहोत आजुनही  पांदीतचं! फक्त पाचशे-हजार च्या नोटेपायी व दारु व मटनाच्या तुकड्या पायी आपण आपले बहूमुल्य मत गहान टाकतो? हीच का आपली लोकशाही? अदन्यानी, असुशिक्षित लोकांचे  सोडा परंतु आपण शिकलेले लोक स्वत:ला बुद्धीजिवी समजतो आणि मतदान करताना माञ बुद्धी गहान ठेवतो.याला काय म्हणावे? युवा पिढी तर कुठे भरकटत चालली समजत नाही. गावातिल आनेक तरुण अभ्यास आणि आपले करियर सोडून दादा व भैयांच्या मागे उदो उदो करत फिरत असतात.आपला पोरगा शिकून काहितरी दिवा लाविन या आशेने इकडे बाप शेतात मर मर राबतो.पण पोराला कींमत नाही.पार्टी झोडायला मिळाली की हा पठ्ठ्या खुश. गावातिल युवकांनी आपले कौशल्य व शक्तीचा अपव्यय टाळून विधायक कार्य करण्याची गरज आहे.वाढति लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी यामुळे भविष्यात तरुण वर्गाला खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.काम धंदा मिळत नसल्यामुळे आणेक तरुण भरकटलेल्या आवस्थेत दिसत आहेत.म्हणुनच होऊ घातलेल्या ग्रामपंचायतिच्या निमित्ताने युवक युवतिने भविष्याचा विचार करायला हवा.पारंपारिकतेला फाटा देऊन नवतरुणांना संधि द्या .गावा गावात आनेक युवक आपल्या गावाचा विकास करण्यासाठी मेहनत घेत आहेत.त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे.नविन स्वप्न व आपल्या गावाला नवि दिशा देण्याची जिद्द आहे.अशा व्यक्तीला आपला सरपंच म्हणून निवडा. आजपर्येंत गावच्या पुढाऱ्यांनी जातीपातीचे घाणेरडे राजकारण करुन  गावाला लुटले आहे.अशा ठगांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे.
    युवकांनो जरा आपल्या गावाच्या विकासाचा विचार करा.गावात शेती असुनही तुमचे दादा, मामा काका पोट भरण्यासाठी गाव सोडून गेलेत.आनेक गाव ओस पडली आहेत.आयुष्यभर लोकांची मजूरी अन कोयता काय सुटत नाही.गावात विज,पाणी,रस्ते रोजगार निर्मीती झाली असती तर लोकांवर गाव सोडण्याची वेळच आली नसती. शेती आहे पण विज व पाणी नाही,कसा जगेल शेतकरी? पावसाळ्यात भरपुर पाऊस पडतो,परंतु जलसंधारणाची कामे होत नाहीत.आलेल्या  योजना जिरवल्या जातात.सगळ्या योजना कागदावर.गरिब व गरजू लोकांना वेळेवर मदत मिळत नाही.शिक्षण, आरोग्य ,रोजगार या गोष्टींचा तर गावात पत्ताच नाही.झेडपिची शाळा माञ तेव्हढी सुरु,तिचीहि अवकळाच. पश्चिम महाराष्ट्रातिल आनेक गावे सुजलाम सुफलाम झाली आहे.गावे सर्व सुविधांनी युक्त आहेत.लोकांना गाव सोडून जाण्याची गरज नाही.आपल्या गावाचाही असा विकास होऊ शकणार नाही का? होईल परंतु,आपल्या गावाचा व आपल्या पुढच्या भविष्याचा विचार आपण करत नाही . निवडून दिलेल्या पुढाऱ्यांनी पाच वर्षात काय दिवे लावले याचा आम्ही जाब विचारत नाही.कारण आम्ही लाचार होतो,बाटली व मटनापायी.आम्ही आमचे अमुल्य मत विकतो.मग कशे सुधारेल गाव.ग्राम विकास समोर ठेवून शासनाने आनेक योजना सुरु केल्या आहेत.गावाची प्रगती होऊन पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यासाठी करोडो रुपयाचे अनुदान ग्रामिण भागात मिळणार आहे.या योजनांची आंमलबजावनि गाव पातळीवर प्रामाणिकपणे  झाली तर गाव टिकेल गाव सुधरेल. तुमच्या गावाचा विकास तुमच्याच हतात आहे.
      मतदार बंधुभगिनिंनो गावाची प्रगती करायची आशेल,गावावर प्रेम आशेल तर यावेळी विकासाला मत द्या.तात्पुरता विचार न करता आपल्या भविष्याचा पुढच्या पिढीचा विचार करा.ग्रामिण भागात काम धंदा मिळत नाही म्हणून आनेक तरुणांनी आपलं गाव सोडलं आहे.गाव ओस पडत चालली आहेत. आज आम्ही गावाला मुकलोय तशे तुम्हीहि मुकाल.गाव सोडण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते.गावच्या पुढाऱ्यांना शिकली सवरलेली लोक गावात नकोच असतात.अशिक्षित लोकांवर दिर्घकाळ राज्य करता येत, सगळ्या योजना घरातच. भावकित,जाती-जातीत, भावा-भावांमध्ये ,बाप-लेकांमध्ये भांडण लावून द्यायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची. योजना कागदोपञी दाखवून पैसे लुटायचे.आणि तोच  पैसा पुन्हा पुढच्या निवडणूकित वापरायचा,मत विकत घ्यायची,पुन्हा पाच वर्ष बिनघोर.मागच्या सत्तर वर्षापासुन हाच प्रकार राजरोसपणे सुरु आहे.गाव लुटला जात आहे.
     गावचे पुढारी मताची भिक मागायला आता तुमच्या दारात येतिल.कसल्याही अमिषाला व भुलथापांना बळी पडू नका.आपले मत विकू नका.गावाची प्रगती,सुरक्षितता,आपले व आपल्या पुढच्या पिढीचा विचार करुन मतदान करा.जो उमेदवार शिकलेला आहे,गावाच्या विकासाची दूरदृष्टी आहे,जो आपल्या माता भगिनिंचे संरक्षण करण्यास सक्षम आहे, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो अशा व्यक्तीला आपला सरपंच निवडा. मतदानाचा हक्क बजवा.तुमच्या एका मतात गाव बदलण्याची ताकत आहे. मतदानाचा मिळालेला अधिकार तुमच्या मुक्तीचे साधन आहे.मिळालेले मुक्तीचे साधन जर तुम्ही पैशावारी विकाल तर तुमच्या सारखे आत्मघातकी,गावद्रोही,देशद्रोही तुम्हीच.

                                           ----दत्ता ढाकणे-बावीकर
                                               poetddl.blogspot.com
                                                 9867062398

        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस