आमच्या गावातील शाळा टिकायला हव्यात

            गावातिल शाळा टिकविण्याचा व दर्जेदार करणारण्या निर्धार

          सफाळे-  ग्रामिण भागात आमच्या मुलांना गावातिल जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय दुसरा पर्याय नाही.आमच्या गावातील शाळा आता कात टाकत आहेत.मुलांना चांगले गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळत आहे.आमच्या गावातिल शाळा डिजीटल होत आहेत.मुलांना कॉम्पुटरवर शिकायला मिळत आहे.आमची मुल विविध कार्यक्रमात व खेळात नंबर काढत आहेत,आमच्या मुलांसाठी शिक्षक मेहनत घेत आहेत. यामुळे  आमच्या गावातिल शाळा टिकविण्यासाठी व दर्जेदार करण्यासाठी आम्ही शाळेला व शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करणार असा निर्धार व्यवस्थापन समिती सदस्यांनी व्यक्त केला. निमित्त होते शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण  कार्येशाळेचे.
      पालघर जिल्हा परिषद आयोजित शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्येक्रम नुकताच  जि.प.शाळा डोंगरीपाडा (नावझे ) केंद्र पारगाव ता.पालघर येथे पार पडला.या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पालघर तालुक्यातिल १२ मॉडेल स्कुलची निवड करण्यात आली आहे.त्या अंतर्गत डोंगरी पाडा शाळेत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.  नवघर,पारगाव व दहिसर तर्फे मनोर या तिन केंद्रातिल ४० शाळांमधिल जवळ जवळ अडिचशे व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य तशेच या तिन केंद्रातिल प्रत्येक शाळेतिल प्रमुख शिक्षक/सचिवांनी या कार्येशाळेत सहभाग घेतला होता.या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सौ.कविता राऊत,केंद्र प्रमुख  राजेंद्र संखे,प्रशिक्षण समन्वयक डी.के.संखे यांनी  शाळेच्या भौतिक व गुणवत्ता विकासामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची भुमिका व कर्तव्य आणि अधिकार  याविषयी  उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिक्षक नितीन राऊत , दत्ता ढाकणे,अश्विनी सोगले यांनीही आपले विचार व्यक्त केले व शाळेची शैक्षणिक प्रगती डोळ्यासमोर ठेऊन शाळा व्यवस्थापन समितीला सर्वतोपरी सहकार्ये करण्याची सर्व शिक्षकांच्या वतिने हमी दिली. या प्रसंगी डोंगरीपाडा शाळेतील शिक्षिका अश्विनी सोगले व अंजली विकास जाधव  यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे व शिक्षक राजन गरूड यांच्या बोलि भाषेतुन शिक्षण या शैक्षणिक साहित्याचे  प्रदर्शन भरविण्यात आले होते.
       या कार्यक्रमाला नवघर केंद्र प्रमुख मिनाक्षी नेमाडे,सरंपच विद्या लाबड,उपसरपंच रणजित ठाकूर तशेच पालक,ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिक्षिका अश्विनी सोगले व अंजली विकास जाधव व पारगाव केद्रातिल शिक्षकांनी  उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस