एका शिक्षकाची डायरी!-....आदर बिदर,समज गैरसमज!

.....आदर बिदर,समज गैरसमज!

  (या लेखाचा कोणतीही व्यक्ती किवा संस्था व समाजाशी वैयक्तीक संबंध नाही.असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

    ....मग हळूहळू मी आदरानबिदरांन वागण्याची सवय कमी केली आणी मला फार हलक आणी मोकळ वाटायला लागल.कारण बारकाईन आजूबाजूला बघताना मला हे लक्षात आल की आपल्या पेक्षा वयाने व पदाने मोठी आसलेली सर्वच माणस आजिबातच आदर दाखवायच्या लायकिची नसतात.आनेक वयस्कर माणसे मग ती नात्यातली  आणि खात्यातली आणि समाजात उजळ माथ्याने वावरणारी व मोठ्या पदावर असणारी संपूर्णपणे कर्तृत्वशुन्य आणि झापड लावून विचार करणारे पारंपारिक ठक असतात.काहिजन महामुर्ख असतात,काहिजन,लाचखोर,काहीजन पापी वासनेचे असतात काहीजन क्रुर असतात. केवळ ते त्यांच्या नशिबाने आपल्या आधि जन्मले व वरच्या पदावर पोहचले म्हणून त्यांना आदर का दाखवायचा? काहीच गरज नाही.
     तुम्ही जर नोकरी करत असाल  आ णि जर प्रायव्हेट सेक्टर मध्ये असाल तर नोकरी टिकविण्यासाठी  आणि प्रमोशन साठी इच्छा नसताना तुम्हाला वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आदराबिदराने वागाव लागत.काही कर्मचारी  आपला कामचूकारपणा लपविण्यासाठी वरिष्ठांशी आस्खलितपणे आदराने वागतात,चमचेगिरी करतात.
दैनंदिन जिवनात अशि माणसे रोज भेटतात.
    मी एक शिक्षक आहे. मला शिक्षण क्षेञ व शिक्षकाविषयी कमालिचा आदर .लहानपणिपासून थोरामोठ्यांचा आदर करण्याच बाळकडूच मिळाल.शिक्षक म्हणुन नोकरी लागल्यानंतर वरिष्ठाशि एक प्रकारे भितीयूक्त आदर मनात होता.आमच्या शालेय शिक्षण विभागात मॉनिटरिंग करणाऱ्या आधिकाऱ्यांची एक चैन आसते. शिक्षक- मुख्याध्यापक-केंद्रप्रमुख-विस्तार आधिकारी-गटशिक्षणाधिकारी-शिक्षणाधिकारी या प्रकारे.म्हणजे मी शिक्षक सर्वात खालच्या स्तरावर,आणि ग्राउंड लेव्हल वर काम करणारा,विद्यार्थी व शाळेविषयी बांधिलकी असणारा . केंद्रप्रमुखांपासुन ते गटशिक्षणाधिकाऱ्या पर्येंत सर्वच अधिकारी पदाने,शिक्षणाने,ज्ञानाने(अपवादात्मक),वयाने मोठे.यांच्या बद्दल माझ्या मनात कमालिचा आदर होता.शिक्षणा सारख्या पविञ क्षेञात काम करणारे आपले वरिष्ठ निश्चितच ज्ञानी आणि प्रमाणिकपणे काम करणारी हि थोर माणसे! त्यांना मी आदर्श माणत होतो. यांच्यापासून मी चार हात दुरच होतो.आपले काम आणि आपण भले हा माझा शिरस्ता होता.
     परंतू काही दिवसानंतर माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला.माझा आदर बिदर गळुन पडला. शिक्षण क्षेञ किती भ्रष्टाचार व लाचखोरीने बरबटलेले आहे हे मला समजले.आमचे एक तालूक्याचे आधिकारी महाशय खिशात ऑर्डरी घेऊन फिरायचे बदल्यांचा बाजार मांडला होता.शाळेच्या आंतरानूसार भाव ठरलेला असायचा.आमचे आनेक शिक्षक बांधव त्यांच्यापुढे शेळीसारखे शेपुट घालून बसायचे , माणसांच्या नसानसात किती लाचारी भरलेली असते हे तेव्हा मला कळले.उद्याची पिढी घडविणारा  शिक्षक येव्हढा स्वार्थी अन लाळघोटा असु शकतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. हे एक उदाहरण  वानगिदाखल पुरेशे आहे.खालपासुन वरपर्येंत लाचखोरी आणि भ्रष्टाचार इथेही आहेच.अशा प्रकाराने काही शिक्षक जे व्रतस्थ होऊन सेवा करतात ते हतबल होऊन यापासून चार हात दूर राहतात तर  काही त्या व्यवस्थेचा भाग बनून जातात.
       शिक्षणक्षेञ पविञ आसले तरि काही अपप्रवृतींनी हे क्षेञ मलिन केले आहे.काहिंना तर कवडीची आक्कल नसते.इथे रजा घेण्यापासुन ते बदल्या पर्येंत लाचखोरी चालते. प्रमाणिक लोकांची इथे कमतरता नाही परंतू एक टक्के लाचखोर आणि चमचेगिरी करणारे लोक सध्या वरचढ होताना दिसत आहेत.यांना विद्यार्थी,शाळा  हिताचे देणेघेणे नसते.स्वतःचे खिशे भरणे आणि कातडी बचाव धोरण हा यांचा आजेंडा.आमचे काही वरिष्ठ तर नूसत्या पाट्या टाकायचे काम करतात. एक शिक्षक म्हणून हे मनाला पटत नाही.
    मला इथे आनेक प्रमाणिक आणि व्यवसायावर निष्ठा आसणारे आनेक शिक्षक आणि वरिष्ठ आधिकारी भेटले त्यांचा खरोखरच आदर्श घ्यायला हवा.ते कधि प्रकाशझोतात येत नाहीत. त्यांच्या विषयी मला आजही आदर आहे. मागिल काही दिवसात माझे आनेक समज गैरसमज दूर झाले. काही लोक लायकी नसताना आपल्याकडून आदर सन्मानाची अपेक्षा करतात.केवळ ते आपल्यापेक्षा वयाने व पदाने मोठे आहेत म्हणून.अशा लबाड लोकांचा आदर आपन का करायचा.शिक्षकांनी अशा नालायक लोकांना धडा शिकवायला हवा.यांना नघाबरता यांच्याशी टिट फॉर टँट वागायला हव. परंतू हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तूम्ही तुमच्या कर्तव्याशी प्रमाणिक असाल.
    आपल्यापेक्षा वरिष्ठ(वयाने व पदाने) सगळेच लोक ज्ञानी व प्रमाणिक असतात हा गैरसमज दूर झाला  आणि मी आदराने बिदराने वागायच सोडून दिले.परंतू प्रमाणिक लोकांबद्दल माझा आदर आजही टिकून आहे.

Datta Dhakane-Bavikar 

Teacher,Blog Writer
-पालघर
Poetddl.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी तिरंगा बोलतोय....

अॅक्सिडेंटल हॉलिडेज...!

डेमॉस्थेनिस